फोटो – ट्विटर

टीम इंडियासाठी 2022 ची सुरूवात धक्कादायक झाली. भारतीय क्रिकेट टीममधील सर्वात फिट खेळाडू असलेला विराट कोहली (Virat Kohli)  दुसऱ्या टेस्टसाठी मैदानात उतरला नाही. कोहलीची पाठ दुखावल्यामुळे तो या टेस्टमधून बाहेर आहे. त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) या टेस्टमध्ये टीमची कॅप्टनसी करत आहे. तर हनुमा विहारीला (Hanuma Vihari) टीममध्ये संधी देण्यात आली आहे. विराटच्या जागेवर टीम मॅनेजमेंटची पहिली चॉईस हनुमा विहारी नाही तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer Issue) होता.

अय्यर का होता चॉईस?

श्रेयस अय्यरनं न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने कानपूरमधील पहिल्याच टेस्ट इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी केली. श्रेयसनं कानपूर टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 52 च्या सरासरीनं रन करणाऱ्या श्रेयसला मुंबई टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्याच्या जागेवर (Shreyas Iyer Issue) अनुभवी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) खेळवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला.

4 वर्ष एक फोटो दाखवून श्रेयसला दिली वडिलांनी प्रेरणा, अखेर झाली स्वप्नपूर्ती

…..जोहान्सबर्गमध्ये काय झालं?

जोहान्सबर्गमधील दुसऱ्या टेस्टमध्ये विजयी कॉम्बिनेशनमध्ये बदल करण्याचा कोणताही विचार टीम मॅनेजमेंटचा नव्हता. पण, विराट कोहलीची पाठ दुखावल्यामुळे टीममध्ये बदल करणे भाग पडले. विराटच्या जागेवर न्यूझीलंड सीरिजमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयसचे नाव सर्वात आघाडीवर होते.

पण, श्रेयस अय्यरचा पोटदुखीमुळे टीम निवडताना विचार करण्यात आला नाही. बीसीसीआयनं जारी केलेल्या वक्तव्यातून ही माहिती देण्यात आली आहे. विराट आणि श्रेयस दोघेही टेस्ट खेळण्यासाठी अनफिट असल्यानं (Shreyas Iyer Issue) हनुमा विहारीची प्लेईंग 11 मध्ये निवड करण्यात आली.

दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाला धक्का, विराट कोहली आऊट

वर्षभरानंतर पुनरागमन

टीम इंडियाने 2021 साली झालेली वर्षीतील पहिली टेस्ट कठीण परिस्थितीमध्ये ड्रॉ केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये झालेली ती टेस्ट ड्रॉ करण्यात विहारीचे मोठे योगदान होते. विहारीनं पाठदुखीची पर्वा न करता 161 बॉलमध्ये नाबाद 23 रन काढले होते. विशेष म्हणजे त तब्बल 237 मिनिटे (3 तास 57 मिनिटे) विहारी मैदानात ठाण मांडून होता.

विहारीला या ऐतिहासिक खेळानंतर पुन्हा एकदाही टीममध्ये संधी मिळाली नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे विहारीची निवड अपेक्षित होती. पण तरीही त्याचा विचार झाला नव्हता. त्यावेळी नंतर त्याचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंडिया A टीममध्ये समावेश करण्यात आला.

विहारीला आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी पाठवण्यात आले असे सांगण्यात आले होते. विहारीनं त्या सीरिजमध्ये चांगला खेळ करत दावेदारी देखील सादर केली होती, पण सेंच्युरियन टेस्टमध्ये पुन्हा एकदा त्याची उपेक्षा करण्यात आली. अखेर जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विहारीला अगदी अनपेक्षितपणे (Shreyas Iyer Issue) संधी मिळाली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: