फोटो – ट्विटर, क्रिकेट साऊथ आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट जोहान्सबर्गमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी चांगल्या सुरूवातीनंतर दक्षिण आफ्रिकेला धक्के बसले. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) आणि किगन पीटरसन जोडीनं सकाळच्या सत्रात 50 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) 3 झटपट विकेट्स घेत आफ्रिकेला लंचपूर्वी बॅकफुटवर ढकलले. यावेळी शार्दुलच्या बॉलवर ऋषभ पंतनं (Rishabh Pant) रासी व्हेन डर डुसेनचा (Rassie van der Dussen) घेतलेला कॅच वादग्रस्त ठरला (Dussen wicket controversy) आहे.

काय घडला प्रकार?

दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगमधील 45 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ती ओव्हर टाकत होता. शार्दुलचा बॉल डुसेनच्या बॅटला लागून मागे गेला आणि पंतच्या हातामध्ये विसावला. टीम इंडियाने केलेले अपिल अंपायर मराय इरासमस यांनी मान्य केले. त्यांनी डुसेनला आऊट दिले.

डुसेन आऊट झाल्यानंतर लगेच लंच टाईमची घोषणा झाली. डुसेननं 17 बॉलमध्ये 1 रन काढला होता. तो आऊट झाल्याने दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 आऊट 102 अशी झाली. त्यानंतर जो रिप्ले दाखवण्यात आला त्यावेळी पंतनं कॅच घेण्यापूर्वी बॉल जमिनीला लागल्याचं रिप्लेमध्ये दिसत होते. त्यामुळे वाद ठरला (Dussen wicket controversy) निर्माण झाला.

लंचमध्ये नाट्य

दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं लंचमध्ये हा रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कॅप्टन आणि मॅनेजर थर्ड अंपायरकडे गेले. थर्ड अंपायरने पुन्हा एकदा ते फुटेज पाहिले. त्या फुटेजमध्ये पंतनं कॅच पडण्यापूर्वी बॉल खाली पडल्याचे कुठेही दिसत नाही, असे थर्ड अंपायरचे मत झाले.

 मैदानावरील अंपायरचा निर्णय नाकारावा असा कोणताही पुरावा न मिळाल्यानं टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul)  याला अपिल मागे घेण्याबाबत विचारणा थर्ड अंपायरनं केली नाही. डुसान आऊट झाल्यानं लगेच लंचमुळे खेळ थांबला होता. त्यामुळे नियमाप्रमाणे पुढचा बॉल टाकण्यापूर्वी निर्णय रद्द करण्याचा अधिकार अंपायरला होता.

थर्ड अंपायरच्या मागणीनंतर राहुलने अपिल मागे घेतलं असतं तर डुसानला पुन्हा खेळायला मिळाले असते, पण तो नॉट आऊट असल्याचा कोणताही पुरावा ठरला (Dussen wicket controversy) थर्ड अंपायरला आढळला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने केलेले अपिल वाया गेले.

अंपायरनं दिले चुकून आऊट, लक्षात आल्यावर झाला ड्रामा! पाहा VIDEO

गावसकरांनी विचारला प्रश्न

दुसऱ्या दिवशी लंचनंतर कॉमेंट्री करत असतानाही हा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar)  यांनी डुसानला प्रश्न विचारला. आपण नॉट आऊट असल्याची खात्री डुसानला होती, तर तो मैदानात का थांबला नाही. त्याच्याकडे DRS द्वारे दाद मागण्याचा अधिकार होता. सध्याच्या क्रिकेटमध्ये कोणताही बॅटर खात्री असल्याशिवाय मैदान स़ोडत नाही. डुसानला इतकी खात्री होती, तर त्याने मैदान का सोडले? असा प्रश्न गावसकरांनी विचारला (Dussen wicket controversy) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: