फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेतील महत्त्वाचा टप्पा असलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजला 26 डिसेंबर रोजी सुरूवात होत आहे. विराट कोहलीला वन-डे टीमच्या कॅप्टनसीपदावरुन काढल्याचा वाद तसेच आफ्रिकेतील ओमिक्रॉनचे संकट यामुळे हा दौरा क्रिकेटबाह्य कारणांमुळे गाजतोय. पण, 26 डिसेंबरपासून या चर्चा मागे पडतील आणि क्रिकेट हा केंद्रबिंदू होईल. टीम इंडियानं आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. पण, 3 भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजमध्ये दमदार पदार्पण (3 Indians Debutant) केले आहे.  

प्रवीण आम्रे (Pravin Amre)

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटवरील बंदी उठल्यानंतर 1992 साली पहिल्यांदाच एखादी टीम तिथं टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती. या बंदीमुळे क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांसाठी आफ्रिकेतील मैदानं तुलनेनं नवी होती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिजमधील पहिलीच टेस्ट ही तेव्हा फास्ट बॉलर्सना मदत करणाऱ्या आणि बॅटर्सची परीक्षा घेणाऱ्या दरबनमध्ये होती.

मुंबईकर प्रवीण आम्रेनं दरबन टेस्टमध्ये पदार्पण केले. आम्रेनी पहिल्या इनिंगमध्ये बॅटींग करण्यासाठी पाऊल ठेवलं तेव्हा टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 38 अशी होती. त्यावेळी आम्रेनी डोनाल्ड, मॅकमिलन, प्रिंगल, शुल्टझ या दक्षिण आफ्रिकेच्या खतरनाक फास्ट बॉलर्सचा सहज पद्धतीनं खेळत सेंच्युरी झळकावली. प्रवीण आम्रेला देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच मानाचा दर्जा का देण्यात येत असे हे त्याने त्या दिवशी दाखवले.

आम्रेंच्या 103 रनच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 277 रन काढले.दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या इनिंगमध्ये 23 रनची आघाडी घेतली. पुढे पावसाचा अडथळा आल्यानं ती टेस्ट ड्रॉ झाली. पण, ‘मॅन ऑफ द मॅच’ चा मानकरी आम्रेच (3 Indians Debutant) ठरला.

5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य, तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट!

वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag)

टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून नाव कमावण्यापूर्वी वीरेंद्र सेहवागने 2001 साली झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मिडल ऑर्डरमध्ये जोरदार पदार्पण केले होते. सेहवागलाही टेस्ट क्रिकेटमधील पहिल्या इनिंगमध्ये आव्हानात्मक वातावरणात मैदानावर यावे लागले होते. तो बॅटींगला आला तेव्हा टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 68 अशी होती.

सचिनसारख्याच (Sachin Tendulkar) दिसणाऱ्या सेहवागनं त्याच्या बरोबरीनं फटकेबाजी करत ‘मास्टर ब्लास्टर’ सोबत चौथ्या विकेटसाठी 220 रनची पार्टनरशिप केली. सेहवागने पहिल्याच टेस्टमध्ये शॉन पोलॉक, जॅक कॅलिस, मखाय एन्टिनी आणि लान्स क्लुसनर या आफ्रिकन बॉलर्सचा सामना करत 105 रन पदार्पण (3 Indians Debutant) काढले.

सचिन-सेहवागच्या सेंच्युरीमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 379 रनचा आव्हानात्मक स्कोअर केला. पण, दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम 237 रनवर आटोपली. दक्षिण आफ्रिकेनं 54 रनचं टार्गेट 9 विकेट्स राखत पूर्ण केले.  

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

सध्याच्या टीम इंडियातील सर्वोत्तम फास्ट बॉलर असलेल्या जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेतच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विदेशात टेस्ट मॅच जिंकण्यासाठी तेव्हाचे कोच रवी शास्त्री यांच्या योजनेचा बुमराह हा मुख्य भाग होता. शास्त्रींच्या सूचनेमुळे बुमराहाची 2017 किंवा 18 मध्ये टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली नव्हती. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया पहिल्यांदा टेस्ट सीरिज खेळण्यासाठी भारतीय उपखंडाच्या बाहेर पडली तेव्हा दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टेस्टमध्ये बुमराहला पदार्पणाची संधी मिळाली.

बुमराहनं पहिल्या इनिंगमध्ये धोकादायक एबी डिव्हिलियर्सची (AB de Villiers) एकमेव विकेट घेतली. हाफ सेंच्युरी पूर्ण करत मोठ्या खेळीकडे वाटचाल करणाऱ्या डिव्हिलियर्सचा धोका (65 रन) त्याने दूर केला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये डिव्हिलियर्स, ड्यूप्लेसी आणि क्विंटन डी कॉक या मिडल ऑर्डरमधील 3 महत्त्वाच्या विकेट्स बुमराहनं घेतल्या.

‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’

टीम इंडियासमोर चौथ्या इनिंगमध्ये 208 रनचं टार्गेट होते. फिनलँडरच्या बॉलिंगपुढे भारतीय टीम 135 रनवर ऑल आऊट झाली आणि दक्षिण आफ्रिकेनं ती टेस्ट 72 रनने जिंकली. केपटाऊनमध्ये 2018 साली झालेल्या त्या टेस्टमध्ये टीम इंडिया पराभूत झाली. पण जसप्रीत बुमराह हा नवा बॉलिंग सुपरस्टार (3 Indians Debutant)  दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला मिळाला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading