फोटो – ट्विटर

जोहान्सबर्ग टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) चुकीच्या पद्धतीने आऊट झाला. त्या टेस्टमधील पराभवाला पंतला जबाबदार धरण्यात आले. माजी क्रिकेटपटूंनी त्याला काढण्याची मागणी केली. 24 वर्षाच्या पंतने यासारख्या अनेक गोष्टी यापूर्वी बघितल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर या सर्व टिकेचा झालाच तर सकारात्मक परिणाम झाला. केपटाऊन टेस्टमध्ये 2 ओव्हर्समध्ये 2 सिनिअर आऊट झाल्यानंतर पंतने त्याच्या स्टाईलने बॅटींग (Pant Cape Town Century) करत टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी निर्माण केली आहे.

दबावात दमदार सुरूवात

केपटाऊन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्याच बॉलवर पुजारा आऊट झाला. एन्गिडीच्या बॉलवर पीटरसननने त्याचा अफलातून कॅच पकडला. पुजारा गेल्यानंतर आणखी एक अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  देखील फार कमाल करू शकला नाही. अजिंक्य फक्त 1 रन काढून रबाडाच्या बॉलिंगवर परतला.

भारतीय टीमची अवस्था 4 आऊट 58 अशी होती, त्यावेळी पंत बॅटींगला आला. तो बॅटींगला आला. टीम इंडियाकडे फक्त 71 रनची आघाडी होती. विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत हे शेवटची स्पेशालिस्ट बॅटरची जोडी मैदानात होती. थोडक्यात त्यावेळी जोहान्सबर्ग टेस्टपेक्षाही अधिक अडचणीमध्ये भारतीय टीम सापडली होती.

पंतच्या चुकीवर विराटला आठवला धोनी, कॅप्टनने केली जाहीर कानउघडणी

पंतचा सकारात्मक खेळ

टीम इंडिया दबावात होती. विराट कोहलीसारखा नैसर्गिक आक्रमक खेळडू ही परिस्थिती ओळखून बचावात्मक पद्धतीने खेळत होता. त्यावेळी पंतने त्याच्या स्टाईलने खेळ करण्यास सुरूवात केली. पंतने जोहान्सबर्गची चूक टाळली, पण त्याच्या स्वभावधर्माच्या अगदी विपरित खेळ केला नाही. त्याने सुरूवातीपासून 90 च्या स्ट्राईक रेटने खेळ केला.

पंत कोहली जोडीने लंचपर्यंत 72 रनची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपमधील 51 रन पंतचे होते. केपटाऊनच्या खडतर पिचवर रबाडा, एन्गिडी, ऑलिव्हर आणि जेन्सन या आफ्रिकेच्या चार फास्ट बॉलर्सनी पंतची अवघड परीक्षा घेतली. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला पंतनं सफाईदार पद्धतीने उत्तर दिले. त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्धची टेस्टमधील पहिली हाफ सेंच्युरी 58 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने लंचपूर्वीच (Pant Cape Town Century) पूर्ण केली.

पंत उभा होता

टीम इंडियाला लंचनंतर मोठा धक्का बसला. एका बाजूने नांगर टाकून बसलेला विराट कोहली 29 रनवर आऊट झाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याची चूक विराटने पुन्हा केली. त्यामुळे त्याच्या संयमी खेळीचा अंत झाला. विराटनंतर अश्विन आणि शार्दुलने देखील फार काळ तग धरला नाही.

दुसऱ्या बाजूने विकेट पडत असूनही पंत थांबला नाही. त्याने हाफ सेंच्युरीनंतर 3 सिक्स लगावले. शार्दुल आऊट झाल्यानंतर त्याने सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली. एक किंवा दोन रन काढण्याची संधी सोडली. ऑलिव्हरच्या एकाच ओव्हरमध्ये दोन फोर (Pant Cape Town Century) लगावले.

टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी?

प्रत्येक बॉलनंतर दबाव…

उमेश यादव आऊट झाला तेव्हा पंत 87 वर खेळत होता. त्यावेळी टीम इंडियाकडे 200 रनची देखील आघाडी नव्हती. पंतने शमीच्या मदतीने ती आघाडी 200 च्या पुढे नेली. आफ्रिकन फास्ट बॉलर्सपासून शमी जास्तीत जास्त दूर कसा राहिल याची त्याने खबरदारी घेतली. 9 बॉल खेळल्यानंतर शमीचा संयम संपला. तो दहावा बॉल खेळण्याच्या नादात कॅचवर आऊट झाला.

शमी आऊट झाला त्यावेळी पंत 94 वर होता. जसप्रीत बुमराह हा अकराव्या क्रमांकाचा बॅटर मैदानात आला होता. जेन्सनच्या बॉलवर पंतचा एक अवघड कॅच तेम्बा बावूमानं सोडला. पंतला आणखी 4 रन मिळाले. प्रत्येक बॉलनंतर दबाव वाढत होता. पंत 99 वर खेळत होता, त्यावेळी तो 90 ते 100 रनच्या दरम्यान 4 वेळा आऊट झाला, अशी माहिती कॉमेंटेटरनी दिली.

…आणि सेंच्युरी!

पंतने ही आठवण करून दिल्यानंतर पुढच्याच बॉलवर एक रन काढत सेंच्युरी पूर्ण केली. टीम इंडियाच्या 195 पैकी 100 रन हे एकट्या पंतचे होते. त्याने 133 बॉलमध्ये त्याची चौथी टेस्ट सेंच्युरी झळकावली. इंग्लंड, ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेतही पंतनं सेंच्युरी झळकावली आहे. टीम इंडियाच्या अनेक दिग्गजांना कधीही जमले नाही ते पंतने वयाच्या 25 वर्ष पूर्ण करण्याच्या आधीच करून दाखवले आहे.

केपटाऊनच्या खडतर पिचवर सेंच्युरी झळकावणारा पंत हा सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझहरुद्दीन आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा चौथा भारतीय (Pant Cape Town Century)आहे. या सर्व रेकॉर्डपेक्षा दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी पंतच्या या सेंच्युरीमुळे टीम इंडियाला मिळाली आहे.

कधीही न विसरता येणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या केपटाऊनमधील 3 अविस्मरणीय खेळी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: