फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील केपटाऊन टेस्टचा तिसरा दिवस ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अविस्मरणीय सेंच्युरीमुळे सर्वांच्या लक्षात राहणार आहे. त्याच बरोबर या दिवशी एक वादग्रस्त घटना देखील घडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटींगच्या वेळी हा प्रकार घडला. यावेळी DRS च्या माध्यमातून थर्ड अंपायरने दिलेल्या निर्णायमुळे (Capet Town Test DRS Controversy) भारतीय खेळाडू संतापले. त्यांनी संपूर्ण देशानं टीम इंडियाला हरवण्याचा कट केल्याचा आरोप केला.  

नेमके काय झाले?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टेस्ट ही चुरशीची होत आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतने एकाकी झुंज देत नाबाद सेंच्युरी झळकावली. पंतच्या खेळामुळे टीम इंडियाला टेस्ट मॅच जिंकण्यासाठी 212 रनचे टार्गेट दिले आहे. दक्षिण आफ्रिकेत इतिहासात पहिल्यांदाच सीरिज जिंकायची असेल तर या टार्गेटचे भारतीय बॉलर्सना संरक्षण करावे लागेल.

मोहम्मद शमीने मार्करमला झटपट आऊट करत सुरूवात चांगली केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) आणि पीटरसन यांनी प्रतिकार करण्यास सुरूवात केला. 21 व्या ओव्हरमध्ये अश्विनच्या बॉलिंगवर एल्गर देखील जाळ्यात सापडला.

अश्विनच्या ओव्हरमधील चौथा बॉल बचावात्मक पद्धतीने खेळण्याच्या नादात एल्गारची चूक झाली. तो बॉल पॅडला लागला. टीम इंडियाने केलेले अपिल अंपायर मराय इरासमस यांनी मान्य केले. त्यानंतर एल्गार यांनी या निर्णयाला आव्हान दिले आणि सर्व वाद (Capet Town Test DRS Controversy) सुरू झाला.

  केपटाऊनच्या खडतर परिस्थितीत पंतची सेंच्युरी , टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी

संपूर्ण देशाचा कट!

अश्विनचा बॉल एल्गरच्या पॅडच्या खाली लागला होता.  सामान्यपणे या परिस्थितीमध्ये बॉल स्टंपला लागतो. पण थर्ड अंपायरने बॉल ट्रॅकिंगच्या माध्यमातून व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांना भलतंच दिसलं. बॉल स्टम्पच्या वरून गेला होता. य़ा निर्णायामुळे अंपायर इरासमसह कॉमेंट्री करणारे तज्ज्ञांना देखील धक्का बसला. DRS मुळे एल्गारला जीवदान मिळाले. हा प्रकार घडला तेव्हा एल्गार 22 रनवर खेळत होता. तर आफ्रिकेचा स्कोअर 60 होता.

टीम इंडियाचे खेळाडूंचा संताप या निर्णायमुळे अनावर झाला. त्यांनी केलेली वक्तव्यं स्टंपमधील माईकच्या माध्यमातून सर्व जगाने ऐकली. याची सुरूवात अश्विनने केली. ‘तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी चांगले बहाणे शोधावे लागतील सूपरस्पोर्ट्स’ असा टोला अश्निनने लगावला.

कॅप्टन कोहलीने त्यानंतर पुढे येत स्टंप माईकच्या जवळ जात ब्रॉडकास्टर्सना सुनावले. ‘तुमची टीम (दक्षिण आफ्रिका) बॉलला लकाकी देण्याचा प्रयत्न करते त्यावरही लक्ष द्या. फक्त विरोधी टीमवर देऊ नका. तुम्ही नेहमी इतरांना पकडण्याचा प्रयत्न करता.’ असा टोला विराटने लगावला. 2018 साली ऑस्ट्रेलिया टीमच्या आफ्रिका दौऱ्यात घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात विराटने हे माईकवर सुनावले.

विराटच्या शाब्दिक टोलेबाजीनंतर केएल राहुल देखील मागे राहिला नाही. ’11 खेळाडूंच्या विरुद्ध संपूर्ण देश’ आहे, या शब्दात त्याने या निर्णयावर निराशा व्यक्त केली. टीम इंडियाने केपटाऊन टेस्टमध्ये पराभूत व्हावे यासाठी फक्त टीममधील 11 जण प्रयत्न करत नाहीत. तर मैदानाबाहेरची मंडळी देखील यात सहभागी (Capet Town Test DRS Controversy)  आहेत. हेच यामधून  भारतीय खेळाडूंनी सुचवले आहे.

टीम इंडियावर कारवाई

DRS मुळे मिळालेल्या जीवदानाचा आफ्रिकेने फायदा उठवला. एल्गार-पीटरसन जोडीने शेवटच्या ओव्हर्समध्ये वेगाने रन जमवले. अखेर दिवसातील शेवटच्या बॉलवर बुमराहाने एल्गारला आऊट करत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिका टीम विजयापासून 111 रन तर टीम इंडिया 8 विकेटने दूर आहे.

अंपायरच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त करणे हा आयसीसीच्या नियमानुसार गुन्हा (Capet Town Test DRS Controversy) आहे. त्यामुळे या प्रकरणात टीम इंडियातील कॅप्टन कोहलीसह काही खेळाडूंवर कारवाई होऊ शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: