फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाची मिडल ऑर्डर गेल्या काही दौऱ्यापांसून सातत्याने अपयशी ठरत आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahnae) यांच्या अपयशावर सातत्याने चर्चा होत आहे. त्याचबरोबर आता ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खराब कामगिरीवरही चर्चा होऊ लागली आहे. पंतच्या कामगिराद्दल कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.  विराटला पंतबद्दल बोलताना (Virat on Pant) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण झाली. त्याने धोनीचे उदाहरण सांगत पंतची कानउघडणी केली आहे.

पंत का रडारवर?

जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पंत शून्यावर आऊट झाला.वास्तविक पंत बॅटींगला आला तेव्हा अजिंक्य आणि पुजारा हे सेट झालेले बॅटर आऊट झाले होते. त्यावेळी पंतने हनुमा विहारीसोबत (Hanuma Vihari) शांतपणे काही काळ खेळून काढणे आवश्यक होते. कारण, तेव्हा विहारी आणि पंत ही टीम इंडियाच्या स्पेशालिस्ट बॅटरची शेवटची जोडी मैदानात होती.

पंतने साफ निराशा केली. तो फक्त 3 बॉल टिकला. कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) बॉलिंगवर त्याने बेजबाबदार फटका लगावला. पंतच्या विकेटनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करण्याची टीम इंडियाची आशा मावळली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यशस्वी कामगिरीनंतर पंतने वारंवार निराशा केली आहे. अहमदाबाद टेस्टमध्ये 101रनची खेळी केल्यानंतरच्या 13 इनिंगमध्ये पंतने केवळ एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे. इतकंच नाही तर त्यापैकी 6 इनिंगमध्ये तर तो 2 अंकी रन देखील करू शकलेला नाही.

पुजारा-रहाणेच्या चर्चेत पंत करतोय पचका, द्रविडचं टेन्शन वाढलं

काय म्हणाला विराट?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्या सीरिजमधील तिसरी आणि निर्णायक टेस्ट केपटाऊनमध्ये होणार आहे. या टेस्टपूर्वी पत्रकारांशी बोलताना विराटने पंतच्या खेळावर त्याचे मत व्यक्त केले.

ऋषभ पंत ज्या पद्धतीचा शॉट मारून आऊट झाला त्याबाबत त्याच्याशी नेट प्रॅक्टीसमध्ये चर्चा झाली आहे. प्रत्येक बॅटरला त्याने काय चूक केली हे माहिती असते. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता शॉट लगावला पाहिजे याची त्याला जाणीव असते.’ असे विराटने (Virat On Pant) सांगितले.

धोनीचे नाव घेत…

विराट कोहलीने त्यानंतर धोनीने दिलेले उदाहरण सांगत पंतची एक प्रकारे कानउघडणी केली आहे. विराट यावेळी म्हणाला, ‘एकदा चूक झाली तर ती चूक पुन्हा करण्यात किमान 7 ते 8 महिने अंतर हवे तरच तुमची कारकिर्द मोठी ठरू शकते, असे धोनीने मला एकदा सांगितले होते.

मी धोनीचा तो सल्ला मानला. त्याप्रमाणे स्वत:चा खेळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांनीच करिअरमध्ये चुका केल्या आहेत. दबावात असो किंवा चुकीचा शॉट खेळून आम्ही चुका केल्या आहेत.’ असे विराटने स्पष्ट केले. पंतकडून चूक झाली आहे, पण त्याची चुकांमधून शिकण्याची नेहमी तयारी असते. तो लवकरच पुनरागमन करेल, असा विश्वास विराटने (Virat On Pant) व्यक्त केला.

टीम इंडियाच्या Next Generation चा सुपरस्टार, भविष्यातील कॅप्टन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: