फोटो – ट्विटर

एबी डीव्हिलियर्स, फॅफ ड्यू प्लेसिस, डेल स्टेन आणि फिनलँडर… टीम इंडिया 3 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती (India Tour Of South Africa) तेव्हा या 4 जणांचा मोठा दरारा होता. आता या चौकडीचा टेस्ट क्रिकेटमधून अस्त झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट टीमला यंदा दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी आहे, असं मानलं जात आहे. विराट कोहलीच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू असले तरी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकन टीमला कमी लेखण्याची चूक कुणी करणार नाही. टीम इंडियाच्या ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजयात 4 दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स (4 South African Players) अडथळा ठरणार आहेत.

डीन एल्गार

दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असलेल्या डीन एल्गारकडं (Dean Elgar) या प्रकारात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. 13 सेंच्युरी आणि 17 हाफ सेंच्युरीसह त्याची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी जवळपास 40 (39.51) आहे. तर घरच्या मैदानावर त्याची आकडेवारी 8 सेंच्युरी आणि 12 हाफ सेंच्युरीस 46.31 इतकी वाढते. त्याशिवाय एल्गारने यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये 45.50 च्या सरासरीनं रन काढले आहेत.

दक्षिण आफ्रिकेची टीम 2019 साली भारत दौऱ्यावर आली होती तेव्हा विशाखापट्टणम टेस्टमध्ये एल्गारनं 160 रनची दमदार खेळी केली होती. त्याचबरोबर भारतीय टीमच्या मागील दौऱ्यातील शेवटच्या इनिंगमध्ये त्याने 86 रन काढले होते. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन या सीरिजमध्ये टीमचं वर्चस्व राखण्यासाठी ‘एल्गार’ करण्यासाठी सज्ज (4 South African Players) आहे.

क्विंटन डी कॉक

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या क्विंटन डी कॉककडे (Quinton de Kock) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) नेटमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये ओपनिंग करणारा डी कॉक टेस्ट क्रिकेटमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळतो. त्याची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी 40 च्या घरात (39.01) इतकी आहे.

डी कॉकनं वयाच्या 21 व्या वर्षा भारताविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सलग 3 सेंच्युरी झळकावल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला आजवर फक्त 1 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरी झळकावण्यात यश आलं आहे. हा रेकॉर्ड या सीरिजमध्ये सुधारण्याचा डी कॉकचा प्रयत्न असेल. भारतीय बॉलर्सना टॉप ऑर्डरला परत पाठवल्यानंतर आफ्रिकेची इनिंग झटपट गुंडाळण्यासाठी डी कॉकचा अडथळा दूर करावा लागेल.

गिलख्रिस्ट, संगकाराचा वारसदार आणि अस्थिर दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा आधारस्तंभ

कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकन बॉलिंग अटॅकचा नेता आणि मॅच विनर कागिसो रबाडा (Kagiso Rabada)  घरच्या पिचवर भारतीय बॅटर्सची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे. रबाडानं आजवर 47 टेस्टमध्ये 213 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाच्या मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रबाडानं फिनलँडरच्या बरोबरीनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

रबाडासाठी यंदा आयपीएल स्पर्धा आणि T20 वर्ल्ड कप साधारण गेले असले तरी टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली झालीय. त्याने या वर्षात 4 वर्षात 16 विकेट्स घेतल्या आहेत. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या आफ्रिकन पिचवर रबाडाचा वेग आणि बाऊन्स एका सेशनमध्ये मॅचचं चित्रं निश्चित करू (4 South African Players) शकतो.

केशव महाराज

स्पिन बॉलर्सना चांगलं खेळण्याचा भारतीय बॅटर्सचा रेकॉर्ड अलीकडच्या काळात चांगलाच खालवला आहे. मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेत हे दाखवून दिलं आहे. केशव महाराजनं या वर्षीतील 5 टेस्टमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. नॉर्खिया सीरिजमधून आऊट झाल्यानंतर तो टेस्ट क्रिकेटमध्ये या वर्षातील सर्वात यशस्वी दक्षिण आफ्रिकन बॉलर आहे.

केशवनं यावर्षी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्टमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो एकूण दुसरा आणि 1960 नंतरचा पहिला दक्षिण आफ्रिकन आहे. त्यामुळे त्याच्या जाळ्यात न अडकण्यासाठी भारतीय बॅटर्सना स्पेशल होमवर्क करून मैदानात उतरावं लागणार (4 South African Players) आहे.

IND vs SA : 3 भारतीय ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत केले दमदार पदार्पण

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: