फोटो – ट्विटर, आयसीसी

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये 4 वर्षांपूर्वी टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India tour of South Africa) केला होता. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. टीम इंडियानं ती सीरिज गमावली. पण, नव्या भारतीय टीमचा प्रवास याच दौऱ्यातून सुरू झाला. विराटने स्वत: आघाडीवर राहात त्या दौऱ्यात टीमच्या बॅटींग नेतृत्त्व केलं होतं. त्यानंतरच्या काळात ऑस्ट्रेलियामध्ये दोनदा मालिका विजय आणि इंग्लंडमध्ये आघाडी घेऊन टीम इंडिया पुन्हा दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. या सीरिजमधील पुढील 3 आठवडे विराट कोहलीच्या भवितव्यासाठी निर्णायक (Make or Break for Virat) ठरणार आहेत.

आहे मनोहर तरी…

फक्त आकडेवारीचा विचार केला तर भारतीय टीमसाठी हे वर्ष चांगले गेले आहे. ब्रिस्बेन, लॉर्ड्स आणि ओव्हल यासारख्या आव्हानात्मक ग्राऊंडवर टीम इंडियानं या वर्षात विजय मिळवलेला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे आजवर कधीही एकाच वर्षात घडले  नव्हते. अगदी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुंबई टेस्टमध्ये भारतीय टीमनं न्यूझीलंडचा मोठा पराभव केला आहे.

या सर्व कामगिरीनंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाचा पराभव झाला.  विराट कोहलीच्या कॅप्टनसीवरील हा एक मोठा डाग आहे. त्यातच यावर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचाही भर टाकली तर कॅप्टन विराटच्या यशाच्या ‘मनोहर’ आकडेवारीमागे लपलेली ‘उदास’ परिस्थिती समोर येते.

बॅटर म्हणून परीक्षा

इंग्लंडमध्ये 2014 साली झालेल्या सीरिजनंतर विराट कोहलीचा फॉर्म सध्या सर्वात खराब परिस्थितीमध्ये सध्या आहे. त्याने मागील 23 इनिंगमध्ये 26 च्या सरासरीनं 599 रन केले आहेत. या कालावधीत त्याने 5 हाफ सेंच्युरी झळकावल्या असून यापैकी एकाही हाफ सेंच्युरीचं त्याला सेंच्युरीत रूपांतर करता आलेलं नाही.

विराट मागील 23 इनिंगमध्ये अनेकदा इनिंगच्या सुरूवातीलाच धक्कदायक पद्धतीनं आऊट झाला आहे. तर काही वेळा संपूर्ण रंगात आलाय अशी खात्री झाल्यावर त्यानं त्याच्या दर्जाला न शोभणाऱ्या पद्धतीनं विकेट गमावली आहे. विराटच्या कारकिर्दीमधील खराब कालखंड कधीतरी संपेल असा प्रत्येकाला विश्वास आहे, पण हा कालखंड जितका लांबेल तितकी त्याच्याबद्दल असलेली सर्वांची सहनशक्ती कमी होईल, याची विराटला नक्कीच जाणीव (Make or Break for Virat) आहे.

2 वर्ष, 50 मॅच आणि 20 संधी…. इन्तहा हो गई इंतजार की!

टीमचा भार पेलणार?

टीम इंडियाचा या वर्षातील सर्वात बेस्ट बॅटर रोहित शर्मा (Rohit Sharma) या टेस्ट सीरिजमध्ये खेळणार नाही. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बराच काळापासून मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरलेत. यापैकी पुजाराची टीममधील जागा नक्का मानली जात आहे. अजिंक्यबद्दल ती खात्री देता येत नाही.

श्रेयस अय्यर पहिल्यांदाच भारताबाहेर टेस्ट खेळेल. तर हनुमा विहारी (संधी मिळाली तर) मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करेल. या परिस्थितीमध्ये विराटकडं आघाडीवर राहत भारतीय बॅटींगचा भार पेलण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

विशेषत:  टीम इंडियाची ‘आऊट ऑफ टच’ मीडल ऑर्डर भारत दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकणार की नाही, हे ठरवणार आहे. त्या मीडल ऑर्डरला प्रेरणा देण्याचं काम कॅप्टन विराटनं मोठी खेळी करत केलं तर हा दौरा त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट (Make or Break for Virat) ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पेपर अवघड

टीम इंडियाला यंदा दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकण्याची मोठी संधी आहे. या टीममध्ये डिव्हिलियर्स, ड्यू प्लेसिस, स्टेन, मॉर्केल, फिनलँडर सारखे दिग्गज खेळाडू नाहीत. हेड कोच राहुल द्रविडच्या काळातील स्मिथ, अमला, कॅलीस, पोलॉक, डोनाल्ड या दिग्गजांची आफ्रिकन टीम आता इतिहासजमा झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. या वर्षातील सर्वात यशस्वी बॉलर या सीरिजमधून बाहेर पडलाय.

या सर्व परिस्थितीनंतरही दक्षिण आफ्रिकेचा पेपर टीम इंडियासाठी सोपा नाही. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या ग्रीन टॉपवर भारतीय टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सर्व टेस्ट खेळणार आहे. यापैकी सेंच्युरियन तर आफ्रिकन फास्ट बॉलरचं आवडतं मैदान आहे. यजमान टीमनं इथं 26 पैकी 21 टेस्ट जिंकल्या आहेत. डेल स्टेननं या मैदानात 59 विकेट्स घेतल्या आहेत. तर कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) नावावर या मैदानात आजवरील 5 टेस्टमध्ये 35 विकेट्सची नोंद आहे.

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात 4 जणांचा मोठा अडथळा, घरच्या मैदानात वाढवणार विराटची डोकेदुखी

भारताच्या अस्थिर बॅटींग ऑर्डरची परीक्षा घेण्यासाठी पुरेसा दारूगोळा दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलिंग युनिटकडे आहे. मैदानातील खराब फॉर्म आणि मैदानाबाहेरची अस्थिर परिस्थिती यामुळे बॅकफुटवर असलेल्या विराटला टार्गेट करण्याचा प्रयत्न आफ्रिकन बॉलर या सीरिजमध्ये करणार हे नक्की आहे. विराट कोहली या सर्वामधून बाहेर पडण्यासाठी आगामी तीन आठवडे बॅटर आणि कॅप्टन म्हणून कसा खेळतो?  यावर त्याच्या कारकिर्दीची पुढील दिशा (Make or Break for Virat) अवलंबून असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

    

error: