फोटो – ट्विटर, बीसीसीआय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी वन डे (India vs South Africa) सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टेस्ट क्रिकेट गाजवणाऱ्या आर. अश्विनने तब्बल चार वर्षानंतर टीम इंडियामध्ये कमबॅक केले आहे. अश्विनने जून 2017 मध्ये शेवटची वन-डे मॅच खेळली होती. त्यानंतर तो वन-डे टीमपासून दूर होता. गेल्या वर्षीच त्याची T20 टीममध्ये निवड झाली आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी ऑफ स्पिनरनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या पडत्या काळातील अनुभव (Ashwin on Troublesome Days) सांगितले आहेत.

शेरेबाजीचा शिकार

111 वन डे मॅचमध्ये टीम इंडियाचे (Team India) प्रतिनिधित्व केलेल्या आर. अश्विनने त्याच्या पडत्या काळाबाबत गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट कारकिर्दीमधील खराब काळ सुरू असताना चेन्नईमध्ये मॅच खेळताना शेरेबाजीही ऐकावी लागली. हा संपलाय, याचे इंटरनॅशनल करिअर संपल्यामुळे हा क्लब लेव्हलच्या मॅच खेळतोय, असे टोमणे मला ऐकायला मिळायचे, असे अश्विनने ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ला (R Ashwin Backstage with Boria) या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

हार्दिक पांड्याचा वारसदार तयार करण्याचे काम सुरू, वन डे टीममध्ये नवी एन्ट्री

‘लोकांच्या शेरेबाजीची मला सवय झाली होती. कधी-कधी मला मला यावर हसूही यायचे आणि कधी-कधी तीव्र दु:खही होत असे. परंतु लोक काय विचार करतात याला अर्थ नाही असे म्हणत कोरोना महामारीच्या काळात मी स्वत:चीच समजूत (Ashwin On Troublesome Days) काढायचो. माझ्यात अजून बरेचसे क्रिकेट बाकी असल्याने त्याला न्याय देण्याचा मी निश्चय केला. मी फिटनेस आणि आहारावर लक्ष केंद्रीत केले. दिवसातून दोन वेळा ट्रेनिंग करू लागलो. याचा फायदा मला झाला,’ असे अश्विनने सांगितले.

आयपीएलमधून माघार

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू झाल्यानंतर आर. अश्विनने (Ashwin Returns ODI Team) यातून माघार घेतली. आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु कुटुंबासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. या काळात अश्विनच्या कुटुंबातील अनेक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. अश्विनच्या वडिलांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करावे लागले होते. त्यामुळे अशा संकटाच्या काळात कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी आपण आयपीएलमधून बाहेर पडलो, असे अश्विन म्हणाला.

मार्चमध्ये अश्विनने माघार घेतल्यानंतर पुढे आयपीएलही स्थगित करण्यात आले. अखेर दुबईमध्ये उर्वरित आयपीएल स्पर्धा पार पडली. दुबईत झालेल्या स्पर्धेत अश्विन सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने 13 मॅच खेळल्या आणि 7 विकेट्स घेतल्या.

‘…तसं झालं तर क्रिकेट खेळणे सोडून देईन,’ अश्विनचं मोठं वक्तव्य

अश्विनमुळे वडिलांना जखम

मुलाखतीदरम्यान आर. अश्विन याने लहानपणीचा एक किस्साही सांगितला. अश्विन 12 वर्षांचा असताना एक लीग मॅच खेळण्यासाठी जाणार होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग अगदी भरात होता. पॉन्टिंगच्या पूल शॉटने प्रेरित होऊन अश्विनने देखील घरात तसाच शॉट खेळला. बॉल फ्रिझला आदळला, पण अश्विनच्या हाताताली बॅट सुटली आणि वडिलांच्या नाकावर आदळली. वडील रक्तबंबाळ झाले आणि बॅटही रक्ताने माखली होती, अशी आठवण अश्विनने (Ashwin on Troublesome Days( सांगितली.

वडिलांना टाके घालण्यासाठी रुग्णालयात गेलो आणि लवकर परतलो, कारण मला लीग मॅच खेळण्यासाठी मैदानावर वेळेत पोहोचायचे होते. वडील सर्व वेदना सहन करत मला 20 किलोमीटर दूर असणाऱ्या मैदानावर घेऊन गेले. त्यांनी आणि आईने माझ्यासाठी खूप सहन केलेय, असेही अश्विन म्हणाला.

चार वर्षानंतर कमबॅक

अश्विनने चार वर्षानंतर टीम इंडियाच्या टी-20 संघात कम बॅक (Ashwin Returns ODI Team) केले. वर्ल्डकप 2021मध्ये त्याला पहिल्या दोन मॅचमध्ये संधी मिळाली नाही. मात्र नंतरच्या तीन मॅच तो खेळला आणि 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजमध्ये दोन लढतीत 3 विकेट्स घेतल्या. टी-20 प्रमाणे आता वन डे कमबॅकही गाजवण्यासाठी अश्विन सज्ज आहे.

‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.