फोटो , बीसीसीआय

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा टेस्ट सीरिजमधून (Rohit Sharma ruled out of South Africa test series) बाहेर पडला आहे. रोहित शर्माला मुंबईत सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार नाही.

रोहित शर्माच्या जागी प्रियांक पंचालचा (Priyank Panchal) टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. गुजरातचा ओपनर प्रियांककडे राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा मोठा अनुभव आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टीम इंडिया A चा तो कॅप्टन होता. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन कोण असेल? याबबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. या दौऱ्यापूर्वीच अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागी रोहितची व्हाईस कॅप्टन (Rohit Sharma ruled out) म्हणून नियुक्ती झाली होती.

रोहित शर्मा वन-डे दौऱ्यात खेळणार का? हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्याच्या दुखापतीचे स्वरूप निश्चित झाल्यावर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. रोहितची दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टीम इंडिया 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यावेळी टीमसोबत रोहित जाणार नाही. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील 2 टेस्टच्या सीरिजसाठी रोहितला विश्रांती देण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेतील वाट खडतर…

भारतीय टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वन-डे मॅचची सीरिज खेळणार आहे. यामधील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी सुरू होईल. टीम इंडियाला आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या दौऱ्यात ही परंपरा मोडण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल, पण या प्रयत्नांना रोहितच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे.

टीम इंडियाने गेल्या काही वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये मिळवलेल्या यशात रोहित शर्माच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. रोहितला ओपनिंगला पाठवण्याची टीम मॅनेजमेंटची चाल यशस्वी ठरली होती. इंग्लंड दौऱ्यातील ओव्हल टेस्टमध्ये रोहितने टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 127 रनची खेळी केली होती. रोहितनं टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय उपखंडाच्या बाहेर झळावलेली ही पहिलीच सेंच्युरी होती. रोहितनं इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 52.57 च्या सरासरीने 368 रन केले होते. कोरोनामुळे इंग्लंड सीरिजमधील शेवटची टेस्ट होऊ शकली नाही. ही सीरिज स्थगित झाली तेव्हा टीम इंडियाकडून सीरिजमध्ये सर्वाधिक रन रोहितच्याच नावावर होते.

रोहितनं 3 वर्षांमध्ये पलटवली बाजी, टीकाकारांना गप्प करत बनला नंबर 1

कोण असेल ओपनर?

रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानं आता केएल राहुल (KL Rahul) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) ही जोडी टीम इंडियाच्या इनिंगची सुरूवात करेल. इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्स टेस्टमध्ये सेंच्युरी करणाऱ्या राहुलला न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली होती. तर मयांक अग्रवालनं न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई टेस्टमध्ये 150 रनची दमदार खेळी करत टीम इंडियातील जागेवर दावेदारी सादर केली होती. रोहित जखमी झाल्यानं ही जोडी पहिल्या टेस्टमध्ये ओपनिंग करेल. त्याचबरोबर आता प्रियांक पंचाल हा आणखी एक पर्याय टीम इंडियाकडे आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: