फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन टेस्ट मॅचची सीरिज 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली असून भारतीय खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकेनं (Cricket South Africa) त्यांची टीम जाहीर केली आहे. ही टेस्ट सीरिज सुरू होण्यापूर्वी क्रिकेट साऊथ आफ्रिका अडचणीत आले आहे. या बोर्डाचा डायरेक्टर ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आणि हेड कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांची नोकरी धोक्यात आली आहे. या दोघांवरही सध्या निलंबनाची टांगती तलवार (Smith Boucher in Trouble) आहे.

का आहे धोका?

क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या बैठकीत सोशल जस्टीस आणि नेशन बिल्डिंग (SJN) समितीच्या रिपोर्टवर चर्चा होणार आहे. या समितीने स्मिथ आणि बाऊचरसह दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्सवर (AB de Villiers) खेळाडूंमध्ये रंगभेद केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्मिथ आणि बाऊचर या दोघांना भारत विरुद्धच्या सीरिजपूर्वी त्यांच्या पदावरुन निलंबित केले जाऊ शकते.  

या समितीचा रिपोर्ट जाहीर होतात दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. डीव्हिलियर्सनं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळलेत. तर स्मिथ या रिपोर्टच्या कायदेशीर बाजू तपासत आहे.

ICC च्या कायदेशीर समितीचे माजी अध्यक्ष आणि या प्रकरणातील स्मिथचे वकील डेव्हिड बेकर यांनी SJN समितीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘या रिपोर्टमधील अनेक गोष्टी या निराधार आहेत. त्यामुळे SJN समितीच्या विश्वासर्हतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे.’ असे बेकर यांनी म्हंटले आहे.

SJN समितीचा रिपोर्ट काय?

SJN समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिन पॉल अ‍ॅडम्सच्या (Paul Adams) रंगावरून खेळाडूंनी शेरेबाजी केली. त्याला टार्गेट करत मैदानात आणि मैदानाच्या बाहेर गाणे गाण्यात बाऊचरचा सहभाग होता, हा ठपका ठेवण्यात आला आहे. बाऊचरने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त (Smith Boucher in Trouble) केला आहे.

दक्षिण आफ्रिका टीमचा माजी कॅप्टन असलेल्या ग्रॅमी स्मिथवर विकेट किपर थामी सोलेकिलेनं (Thami Tsolekile) जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप केला आहे. बाऊचर रिटायर झाल्यानंतर स्मिथनं आपला विकेट किपर म्हणून विचार केला नाही. त्या काळात सुरुवातीला डिव्हिलियर्स विकेट किपर बनला आणि नंतर क्विंटन डी कॉकला पदार्पणाची संधी देण्यात आली, असा आरोप सोलेकिलेनं केला (Smith Boucher in Trouble) आहे.

‘मला संधी मिळू नये म्हणून डी व्हिलियर्स विकेट किपर बनला’, आफ्रिकेच्या खेळाडूचा गंभीर आरोप

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू डीव्हिलियर्सवरही या समितीनं ठपका ठेवलाय. 2015 साली भारत दौऱ्यावर गेलेल्या टीममधील सदस्य खाया झोंडो (Khaya Zando) याने डीव्हिलियर्सवर आरोप केलाय. या दौऱ्यात जेपी ड्यूमिनी जखमी झाला होता. त्यावेळी झोंडोचा पर्याय उपलब्ध असूनही डीव्हिलियर्सनं दक्षिण आफ्रिकेतून डीन एल्गरला बोलवाले अशी तक्रार झोंडोने केली आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीमधील एका सदस्यानेही एल्गरच्या निवडीसाठी दबाव टाकल्याचं मान्य केले आहे.

6 वर्षांपूर्वीची धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचं कारण?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: