फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट रविवारपासून (26 डिसेंबर) सुरु होत आहे. या टेस्टपूर्वीच्या काही दिवसात भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्यात घडामोडी घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टेस्ट सीरिजसाठी टीम जाहीर करताना वन-डे टीमला नवा कॅप्टन जाहीर करण्यात आला. या विषयावर क्रिकेट विश्वातून वेगगेळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी (Boxing Day Test) द्रविड मैदानात उतरला. त्याने कॅप्टनच्या मुद्यावर (Dravid on Captain) उत्तर दिलं आहे.

का निर्माण झाला प्रश्न?

वन-डे टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड झाली आहे. T20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीनं या प्रकारातील कॅप्टनसी सोडली. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सीरिजसाठी रोहित टीमचा कॅप्टन बनला. विराटनं टेस्ट प्रमाणेच वन-डे टीमची कॅप्टनसी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

निवड समितीने विराटकडून वन-डे टीमची कॅप्टनसी काढून घेतली आणि रोहितची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे व्हाईट बॉल आणि रेड बॉल प्रकारात दोन स्वतंत्र कॅप्टन टीम इंडियाला मिळाले आहेत. यापूर्वी देखील भारतीय क्रिकेटमध्ये हा प्रकार घडला आहे. (अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी) तसेच (विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी) पण त्यावेळी या दोन्ही पैकी एका कॅप्टननं दुसऱ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विराट – रोहितच्या बाबतीत तो प्रकार नसल्यानं हा भारतीय क्रिकेटमधील विशेष प्रकार आहे.

रोहित शर्माशी संबंध ते सौरव गांगुलीचे वक्तव्य विराट कोहलीने दिले 5 मोठ्या मुद्यांवर स्पष्टीकरण

काय म्हणाला द्रविड?

राहुल द्रविडला हेड कोच या नात्याने दोन्ही कॅप्टनसोबत काम करावं लागणार आहे. त्यामुळे या विषयावरील त्याची भूमिका काय आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवड समितीच्या या निर्णयानंतर द्रविड पहिल्यांदाच मीडियाला सामोरा गेला. त्यामुळे तो या विषयावर काय बोलतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

द्रविडने अखेर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘हे माझं काम नाही. निवड समितीचं काम आहे. मी खेळाडूंशी खासगी पातळीवर काय चर्चा केली ते कधीही सार्वजनिकपणे सांगणार नाही.’ या शब्दात द्रविडने या प्रश्नाचं उत्तर (Dravid on Captain) दिलं आहे.  

अजिंक्य रहाणेबद्दल म्हणाला…

टीम इंडियाचा अनुभवी बॅटर अजिंक्य रहाणे सध्या फॉर्मात नाही. रहाणेनं मागील वर्षी बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर 2021 मध्ये लॉर्ड्स टेस्टवरील हा सेंच्युरीचा अपवाद वगळता रहाणे फेल गेला आहे. त्यामुळे टेस्ट टीमच्या व्हाईस कॅप्टन पदावरूनही त्याला दूर करण्यात आले आहे.

राहुल द्रविड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शोधणार 3 दिग्गजांना पर्याय, कोण ठरेल यशस्वी?

राहुल द्रविडने या पत्रकार परिषदेत रहाणेसंबंधीच्या प्रश्नालाही उत्तर दिले. ‘त्याच्याबरोबरचा (अजिंक्य रहाणे) संवाद पॉझिटिव्ह झाला आहे. त्याने या आठवड्यात प्रॅक्टीस केली असून तो चांगल्या टचमध्ये आहे.’ असे द्रविडने स्पष्ट (Dravid on Captain) केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: