फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सेंच्युरियन टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. या टेस्टचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी विकेट्सचा पूर आला. टीम इंडियाच्या 8 तर दक्षिण आफ्रिकेच्या 4 अशा 12 विकेट्स झटपट पडल्या. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या या पिचवर टीम इंडियाचा मुख्य बॉलर जसप्रीत बुमराहनं लंगडत (Bumrah injured in Centurion Test) मैदान सोडल्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

काय घडला प्रकार?

सेंच्युरियन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. मोठा स्कोअर करण्याचं भारतीय टीमची योजना आफ्रिकन बॉलर्सनी धुळीला मिळवली. टीम इंडियानं उर्वरित 7 विकेट्स फक्त 49 रनमध्ये गमावल्या. भारताची पहिली इनिंग 327 रनवर संपुष्टात आली.

दक्षिण आफ्रिकेची सुरूवात देखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहनं आफ्रिकन कॅप्टन डीन एल्गरला (Dean Elgar) पाचव्या बॉलवर आऊट केले. बुमराहनं एल्गरला कोणतीही संधी दिली नाही. त्याच्या बॅटला लागलेला बॉल विकेट किपर ऋषभ पंतनं पकडला.

बुमराह त्याची सहावी ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरमधील पाचवा बॉल टाकताना त्याचा उजवा पाय दुखावला. बुमराहाला इतका त्रास होत होता की तो मैदानातच बसला. ते पाहून टीम इंडियाच्या फिजिओने तातडीनं मैदान गाठलं आणि त्यांनी बुमराहाला सोबत नेले. त्यानंतर काही वेळानं बुमराहच्या उजव्या पायाला पट्टी लावलेली (Bumrah injured in Centurion Test) दिसली.

टीम इंडियाला धक्का

भारतीय टीमचा प्रमुख बॉलर असलेल्या बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजलेलं नाही, पण त्याने अचानक मैदान सोडल्यानं टीम इंडियाच्या योजनांना धक्का बसला आहे. त्याने मैदान सोडले त्यावेळी पिच फास्ट बॉलर्सना साथ देत होते. बुमराहनं देखील एक विकेट घेतली होती. चार फास्ट बॉलर्ससह या टेस्टमध्ये उतरलेल्या टीम इंडियाला अनुकूल वातावरणात बुमराहनं मैदान सोडल्यानं धक्का बसला आहे.

बुमराहची दुखापतीवर (Bumrah injured in Centurion Test) मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. श्रेयस अय्यर त्याच्या जागेवर सध्या फिल्डिंग करत आहे.

टीम इंडियाचा मेन बॉलर

बुमराहनं 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानं तीन टेस्टच्या त्या सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतरच्या तीन वर्षात तो भारतीय टेस्ट टीमचा मुख्य बॉलर बनलाय. विदेशातील अनेक महत्त्वाच्या विजयात बुमराहच्या बॉलिंगचे महत्त्वाचे योगदान आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजसाठी फ्रेश राहावे म्हणून बुमराहला (Bumrah injured in Centurion Test) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली होती.

IND vs SA : 3 भारतीय ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत केले दमदार पदार्पण

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: