फोटो – ट्विटर, प्रियांक पंचाल

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजमधून आऊट झाला आहे. रोहितला मुंबईत सराव करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो 16 डिसेंबरला टीम इंडियासोबत आफ्रिकेला रवाना होणार नाही. बीसीसीआयने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. रोहितच्या जागी प्रियांक पंचालची (Priyank Panchal) टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील मोठ्या अनुभवाच्या आधारे त्याला ही संधी मिळेली (Who is Priyank Panchal?) आहे.

रोहितला दुखापत कशी झाली?

रोहित शर्माचे स्नायू दुखावल्यामुळे (hamstring injury) तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये खेळणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्माला मुंबईमध्ये सराव करताना पहिल्यांदा हाताला दुखापत झाली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील स्टेडियमवर रोहित सराव करत होता. त्यावेळी त्याच्या हाताला पहिल्यांदा दुखापत झाली.

ही दुखापत सुरूवातीला अधिक गंभीर नव्हती. त्यामुळे त्याने सराव तसाच पुढे सुरू ठेवला. पण, हे दुर्लक्ष त्याला महाग पडले. सराव करतानाच रोहितचे स्नायू दुखावले आणि तो दक्षिण आफ्रिका सीरिजमधून आऊट झाला. रोहित शर्माला पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीमध्ये दुखापतीमुळे महत्त्वाची सीरिज खेळता येणार नाही.

कोण आहे प्रियांक पंचाल?

गुजरात क्रिकेट टीमचा आधारस्तंभ असलेला प्रियांक वयाच्या 13 व्या वर्षापासून स्पर्धात्मक क्रिकेटचं मैदान गाजवत (Who is Priyank Panchal?) आहे. 13 व्या वर्षीच 15 व्या वर्षाच्या खालील पॉली उम्रीगर करंडक स्पर्धेत पदार्पण केले. त्या स्पर्धेच्या दोन सिझनमध्ये खेळल्यानंतर तो 16 वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत गुजरातकडून खेळला. 2008 साली त्याला विजय हजारे स्पर्धेत पहिल्यांदा संधी मिळाली. महाराष्ट्राविरुद्धच्या पदार्पणातील मॅचमध्येच त्याने सेंच्युरी झळकावली होती.

टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा सीरिजमधून आऊट!

गुजरातचा आधारस्तंभ

वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धा तसेच विजय हजारे ट्रॉफीत दमदार खेळ केल्यानंतर प्रियांकची पुढची पायरी ही अर्थातच रणजी स्पर्धा होती. त्याने वयाच्या 18 व्या वर्षीच 2008 साली ओपनिंग बॅटर म्हणून गुजरातकडून पदार्पण केले. 2016-17 चा रणजी सिझन प्रियांकच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला.

त्या सिझनमध्ये गुजरातकडून रणजी स्पर्धेत ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा प्रियांक हा पहिला बॅटर (Priyank Panchal New Pujara) ठरला. त्याने संपूर्ण सिझनमध्ये 87.33 च्या सरासरीनं सर्वात जास्त 1310 रन काढले. यामध्ये 5 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरीचा समावेश होता. गुजरातने त्या सिझनचे विजेतेपद पटकावले. गुजरातच्या त्या विजेतेपदात प्रियांकच्या या विक्रमी कामगिरीचे (Who is Priyank Panchal?) मोठे योगदान होते.

दमदार कामगिरी

31 वर्षांचा प्रियांक हा गेल्या 13 वर्षांपासून रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे. 2016-17 साली झालेल्या रणजी स्पर्धेनंतर त्यानं मागं वगळून पाहिलेलं नाही. तो त्यानंतर सातत्याने प्रत्येक स्पर्धेत रन काढत आहे. त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आजवर 24 सेंच्युरी आणि 25 हाफ सेंच्युरी असून त्यानं 45.52 च्या सरासरीनं 7,011 रन काढले आहेत.

गुजरात, इंडिया रेड या टीमचं त्यानं देशांतर्गत स्पर्धेत नेतृत्त्व केले आहे. इंग्लंड विरुद्ध या वर्षी झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याची स्टँडबाय म्हणून निवड झाली होती. इतकंच नाही तर टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी इंडिया A टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली गेली होती. या दौऱ्य़ावरील टीममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता. तरीही निवड समितीने प्रियांकला कॅप्टन केले होते. दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये त्याला संधी मिळणार असल्याचे ते संकेत होते. पण, निवड समितीने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या टीममध्ये त्याचे नाव नव्हते. अखेर, रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने प्रियांकसाठी (Who is Priyank Panchal?) टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: