फोटो – ट्विटर, आयसीसी

दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याची (India vs South Africa) टीम इंडियाची प्रतीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 7 विकेट्सनं विजय मिळवला. त्याचबरोबर सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर जवळ आलेलं सीरिज विजयाचं स्वप्न (India Lost SA Series) पुन्हा एकदा भंग पावलं. भारतीय क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात गेल्या 29 वर्षातील सर्वात मोठी संधी गमावल्याची सल कायम राहणार आहे.

रहाणे-पुजाराचा फ्लॉप शो

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना काही वर्षांपूर्वी गरज नसताना टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्या चुकीचे टीम मॅनेजमेंट अद्याप प्रायश्चित घेत आहे. ही सीरिज सुरू होण्यापासून (खरं तर त्याही आधीपासून) त्यांच्या जागेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरीही टीम मॅनेजमेंटनं सर्व पर्यायांवर फुली मारत या दोघांना संपूर्ण सीरिज संधी दिली. त्याची मोठी किंमत टीम इंडियाने मोजली आहे.

अजिंक्य रहाणेने या सीरिजमधील 6 इनिंगमध्ये 136 रन केले. प्रत्येक सीरिजनंतर सरासरी कमी होण्याची त्याची परंपरा यंदाही सुरू होती. त्याने 22.66 च्या सरासरीने हे रन केले आहेत. पुजाराची आकडेवारी तर आणखी खराब आहे. भारतीय क्रिकेटची वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने या सीरिजमधील 6 इनिंगमध्ये 20.66 च्या सरासरीने 124 रन केले आहेत.

आफ्रिकेची जास्त मदत

टीम इंडियाची 29 वर्षांनंतर आफ्रिकेत सीरिज जिंकण्याची मदार ज्या राहाणे आणि पुजारावर होती, त्यापेक्षा जास्त मदत दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी केली आहे. विश्वास बसत नसेल तर पुढील आकडेवारी (India Lost SA Series) पाहा

सेंच्युरियनमध्ये झालेल्या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया विजयी झाली. यामध्ये पुजाराने 0 आणि 16 तर अजिंक्यने 48 आणि 20 रन काढले. त्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी 19 आणि 27 रन अतिरिक्त दिले. आफ्रिकेच्या बॉलर्सनी दोन्ही इनिंगमध्ये पुजारापेक्षा आणि एका इनिंगमध्ये अजिंक्यपेक्षा जास्त हातभार टीम इंडियाच्या स्कोअर कार्डला लावला.

पुजारा-रहाणेच्या प्रेमामुळे 4 जण होत आहेत म्हातारे

शेवटच्या 2 टेस्टमध्ये काय झाले?

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजाराने 3 आणि 53 तर अजिंक्यने 0 आणि 58 रनचे योगदान दिले. त्या टेस्टमध्ये आफ्रिकेच्या बॉलर्सनी 16 आणि 33 रन अतिरिक्त दिले. जोहान्सबर्गमधील पहिल्या इनिंगमध्ये आफ्रिकन बॉलर्सनी भारताच्या दोन्ही अनुभवी बॅटरना मागे टाकले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र दोघांनीही सरस खेळ केला.

केपटाऊनमधील तिसऱ्या आणि निर्णायक टेस्टमध्ये (India Lost SA Series)  तर परिस्थिती आणखी बिघडली. या टेस्टमध्ये पुजाराने 43 आणि 9 तर अजिंक्यने 9 आणि 1 रन काढले. तर आफ्रिकन बॉलर्सनी 13 आणि 28 अतिरिक्त रनचे योगदान दिले. निर्णायक टेस्टमध्ये अनुभवी बॅटरच्या योगदानाची सर्वाधिक गरज टीम इंडियाला होती. प्रत्यक्षात त्यांनी निराशा केली. शेवटच्या निर्णायक इनिंगमध्ये दोघेही फ्लॉप ठरले.

संपूर्ण सीरिजच्या एकत्रित आकडेवारीचा विचार केला तर पुजाराने 124 आणि अजिंक्यने 136 रन काढले. तर आफ्रिकन बॉलर्सनी 136 अतिरिक्त रन दिले आहेत. आफ्रिकन बॉलर्सनी पुजारापेक्षा जास्त आणि अजिंक्यच्या बरोबरीने टीम इंडियाच्या स्कोअरमध्ये योगदान दिले आहे. पण, भारतीय बॅटींगचा एकूण विचार करता आफ्रिकन बॉलर्सनीच टीम इंडियाला जास्त मदत केली आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेअतिरिक्त रन
पहिली टेस्ट0 आणि 1648 आणि 2019 आणि 27
दुसरी टेस्ट3 आणि 530 आणि 5816 आणि 33
तिसरी टेस्ट43 आणि 99 आणि 113 आणि 28
एकूण124136136

उंटावरची पाठीवरील शेवटची काडी?

कमकुवत मिडल ऑर्डर हे टीम इंडियाचे गेल्या दोन वर्षांमधील मोठं दुखणं आहे. यापूर्वी ओपनर्सचा भक्कम खेळ आणि लोअर ऑर्डरने केलेला प्रतिकार आणि फास्ट बॉलर्सची कामगिरी यामुळे ही बाजू झाकली गेली. या सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा नव्हते. त्यामुळे मिडल ऑर्डर आणखी उघडी पडली. त्याचा परिणाम पराभवात झाला आहे.

टीम इंडियाला आफ्रिकेत सीरिज जिंकण्याची गेल्या तीन दशकातील सर्वोत्तम संधी यंदा होती. ती आपण गमावली आहे. हा पराभव (India Lost SA Series) नव्या बदलासाठी उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरणार का? हा प्रश्न आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: