फोटो – सोशल मीडिया

भारतीय क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर 16 डिसेंबर रोजी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रथेप्रमाणे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यावेळी विराट कोहली काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले होत. विराटने यावेळी रोहित शर्माशी असलेले संबंध ते त्याने कॅप्टनसी सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केलेले वक्तव्य या सर्व विषयांवर स्पष्टीकरण दिले आहे. विराट कोहलीने या पत्रकार परिषदेत कोणत्या 5 महत्त्वांच्या विषयांवर स्पष्टीकरण (Virat Kohli Explanation) दिले ते पाहूया  

वन-डे सीरिज खेळणार का?

विराट कोहली दक्षिण आफ्रिका विरुद्धची टेस्ट सीरिज खेळल्यानंतर ब्रेक घेणार आहे. तो 19 जानेवारीपासून सुरू होणारी वन-डे सीरिज खेळणार नाही. असे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. विराटने ही सर्व चर्चा फेटाळली आहे.

‘मी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी उपलब्ध आहे, आणि यापूर्वी देखील उपलब्ध होतो. मी कोणताही ब्रेक मागितलेला नाही. या प्रकारचे आर्टिकल लिहिणारी मंडळी आणि त्यांच्या सूत्रांना तुम्ही हा प्रश्न विचारा. ती मंडळी विश्वासर्ह नाहीत. मी वन-डे टीमच्या निवडीसाठी उपलब्ध आहे.’ या शब्दात विराटने सर्व अफवांना पूर्णविराम (Virat Kohli Explanation) दिला आहे.

विराट कोहली येणार मीडियासमोर, भारतीय क्रिकेटमधील ‘या’ गंभीर प्रश्नांची मिळणार उत्तरं

कॅप्टनशीप सोडताना काय झाले?

विराट वन-डे टीमची कॅप्टनसी सोडण्यास तयार नव्हता. त्याला कॅप्टनपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली होती. त्याने त्या मुदतीत राजीनामा दिला नाही, त्यामुळे 49 व्या तासाला त्याला निवड समितीने दूर केले असे, मानले जात होते.

विराटने या मुद्यावर स्पष्टीकरण देताना त्याची बाजू मांडली आहे. ‘निवड समितीने त्यांच्या बैठकीपूर्वी दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधला होता. आम्ही त्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीमवर चर्चा केली. ही चर्चा संपत आली असताना त्यांनी मला तू आता वन-डे टीमचा कॅप्टन नसशील असे सांगितले. मी तो निर्णय मान्य केला.’ असे स्पष्टीकरण विराटने दिले आहे.

रोहितशी संबंध कसे आहेत?

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंचे नाते म्हणजे एक दैनंदिन सास-बहू मालिका आहे, असेच सध्या रंगवले जात आहे. विराटने या पत्रकार परिषदेत या विषयावरही त्याची बाजू मांडली आहे.

‘माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतीही समस्या नाही. मी हे गेल्या अडीच वर्षांपासून सांगून थकलो आहे. माझी कोणतीही कृती टीमचं नुकसान करणारी नसेल.’ असे विराट (Virat Kohli Explanation) म्हणाला.

EXPLAINED: रोहित शर्मा यशस्वी कॅप्टन असल्याची 5 प्रमुख कारणं

गांगुलीशी काय चर्चा झाली?

विराट कोहलीला T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस अशी विनंती केल्याचा दावा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केला होता. विराटने या पत्रकार परिषदेत याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाने नवी चर्चा सुरू झाली आहे.

मी T20 टीमची कॅप्टनसी सोडण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा केली. त्यावेळी त्यावेळी बोर्डाने या निर्णयाचे स्वागत केले. मला T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस असे कधीही सांगण्यात आले नाही. मी त्यावेळी वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टसी यापुढेही करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मला या पदावरून हटवायचं असेल तरी आपली तयारी आहे.’ असे त्यांना कळवल्याचा दावा विराटनं केला आहे.

खेळावर काय परिणाम होईल?

क्रिकेट मैदानाच्या बाहेर घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम खेळावर होणार नाही, असे विराटने स्पष्ट केले आहे. ‘बाहेर घडणाऱ्या सर्व गोष्टी या आदर्श नसतात. हे समजून घेतले पाहिजे. माझा पूर्ण फोकस हा क्रिकेटवर आहे. टीमसाठी सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असे विराटने स्पष्ट स्पष्टीकरण (Virat Kohli Explanation) केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading