फोटो – BCCI

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिज (India vs England)  टीम इंडियाची घोषणा झाली आहे. जवळपास 4 महिन्यांच्या या दौऱ्यासाठी 20 सदस्य आणि 4 स्टँडबाय अशा 24 सदस्यांची निवड झाली आहे. टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळल्यानंतर महिनाभर इंग्लंडमध्ये राहूनच टेस्ट सीरिजची तयारी करणार आहे. याच काळात म्हणजे जुलै महिन्यात भारतीय टीम श्रीलंकेला 3 वन-डे आणि 3 T20 मॅच खेळण्यासाठी जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे (BCCI)  अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये टीम इंडिया इंग्लंडहून श्रीलंकेला जाणं शक्य नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये इंग्लंड दौऱ्यावर न जाणाऱ्या खेळाडूंमधील 16 जणांची टीम (Another Team India) श्रीलंकेला जाणार आहे.

विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यासह प्रमुख अव्वल खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. असं असलं तरी भारताची पर्यायी 16 जणांची टीम देखील तितकीच संतुलित आहे. या टीममध्ये लिमिटेड ओव्हर्सच्या अनेक स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असेल. श्रीलंकेला श्रीलंकेत हरवण्याची क्षमता या टीममध्ये आहे.

कशी असेल दुसरी टीम इंडिया?

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पर्यायी 16 खेळाडूंच्या या टीमचा कॅप्टन (Another Team India)  शिखर धवन (Shikhar Dhawan) असेल. धवन या टीममधील सर्वात अनुभवी खेळाडू असून तो सध्या फॉर्मात देखील आहे. शिखर धवनचा जोडीदार म्हणून पृथ्वी शॉ जाणार हे नक्की आहे. टीममधील ओपनिंगच्या तिसऱ्या जागेसाठी देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात चुरस आहे. पण विजय हजारे ट्रॉफीतील फॉर्म लक्षात घेता पडिक्कलचं पारडं यात जड आहे.

या टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये मुख्य टीमसारखेच आक्रमक खेळाडू असतील. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे श्रीलंकेला जाण्याची शक्यता नाही. श्रेयस नसला तरी सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन आणि मनिष पांडे अशी या टीमची मिडल ऑर्डर असेल. यापैकी इशान किशन आणि संजू सॅमसन हे विकेट किपिंगचे दोन पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर असेल.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे पांड्या बंधू या टीमचे (Another Team India)  ऑलराऊंडर असतील. हार्दिक पांड्या हा लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील भारताचा मुख्य ऑल राऊंडर आहे. तर कृणाल पांड्याला विजय हजारे ट्रॉफीतील चांगल्या कामगिरीमुळे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या वन-डे सीरिजमध्ये संधी मिळाली होती. हार्दिक या टीमचा व्हाईस कॅप्टन असू शकतो.

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, ‘या’ दिग्गजांना वगळलं

बॉलिंगचे पर्याय काय?

भारताचा अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न होणं आश्चर्यकारक होतं. श्रीलंका दौऱ्यात तो असणार हे नक्की आहे. भुवनेश्वरसह नटराजन, नवदीप सैनी आणि दीपक चहर हे चार फास्ट बॉलर्स श्रीलंका दौऱ्यावर जातील. यापैकी एखाद्या बॉलर्सचा फिटनेसचा इश्यू झाला तर जयदेव उनाडकत, कार्तिक त्यागी आणि चेतन सकारिया यांचा विचार होऊ शकतो.

दुसऱ्या टीम इंडियाच्या (Another Team India) स्पिन बॉलिंगची जबाबदारी अनुभवी युजवेंद्र चहल, आयपीएल स्पर्धेत फॉर्मात असलेला राहुल चहर आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यांच्यावर असेल. यापैकी कुणाचा फिटनेस इश्यू झाला तर कुलदीप यादव आणि राहुल तेवातिया हे पर्याय निवड समितीसमोर आहेत.

16 मॅच 1135 रन, अनेक रेकॉर्ड्स! तरीही पृथ्वी शॉ टीममध्ये नाही कारण…

श्रीलंका दौऱ्यासाठी ‘Cricket मराठी’ ने निवडलेली टीम इंडिया

ओपनिंग बॅट्समनशिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल
मिडल ऑर्डरसूर्यकुमार यादव, मनिष पांडे
विकेट किपर संजू सॅमसन, इशान किशन
ऑल राऊंडरहार्दिक पांड्या (व्हाईस कॅप्टन), कृणाल पांड्या
फास्ट बॉलर्सभुवनेश्वर कुमार, नटराजन, नवदीप सैनी, दीपक चहर
स्पिन बॉलर्स युजवेंद्र चहल, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: