
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये (India tour of England) वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) निवड झाली आहे. तामिळनाडूच्या 21 वर्षांच्या या ऑल राऊंडरकडून टीमला मोठी अपेक्षा आहे. सुंदरनं ब्रिस्बेन टेस्टमध्ये अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून 4 टेस्टमध्ये त्यानं 3 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. सुंदरचे क्रिकेट करियर घडवण्यात त्याचे वडील एम. सुंदर (M. Sundar) यांचा वाटा आहे. त्यांनी (Sundar Father) सध्या चेन्नईतील राहतं घर सोडलं आहे. याचं कारण देखील तितकंच भावनिक आहे.
सुंदरकडून अपेक्षा
वॉशिंग्टन सुंदर हा ऑस्ट्रेलियात नेट बॉलर म्हणून गेला होता. प्रमुख बॉलर जखमी झाल्यानं त्याला ब्रिस्बेन टेस्टमध्ये अक्षरश: ढकलण्यात आलं होतं. त्यानं पहिल्याच इनिंगमध्ये शार्दुल ठाकूरसोबत सातव्या विकेटसाठी 123 रनची पार्टरनरशिप केली. त्या इनिंगमध्ये सुंदरनं 62 रन काढले. ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला लढण्यासाठी तयार करण्याचं काम शार्दुल- सुंदर पार्टरनरशिपनं केलं.
सुंदरचा बॅटींगमधील फॉर्म हा भारतामध्ये देखील कायम होता. इंग्लंड विरुद्ध चेन्नईत झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये प्रमुख बॅट्समननं निराशा केल्यानंतरही सुंदरनं नाबाद 85 रन काढले. तर अहमदाबाद टेस्टमध्ये त्यानं नाबाद 96 रनची खेळी केली. लोअर ऑर्डरमधील एक चांगला बॅट्समन असलेल्या सुंदरकडून टीमला मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सुंदरला टेस्टमधील पहिल्या सेंच्युरीसाठी आता इंग्लंड खुणावत आहे.
शार्दुल ‘सुंदर’ खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा ‘ टीम पेन’
वडिलांनी घर सोडलं
सुंदरची अपेक्षेप्रमाणे इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. त्याची निवड झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी (Sundar Father) चेन्नईतील राहतं घर सोडलं आहे. त्यांनी हे घर सुंदरवर किंवा घरातील कोणत्या सदस्यावर रागवल्यामुळे सोडलेलं नाही. तर मुलाच्या काळजीसाठी, मुलाला इंग्लंड दौऱ्यात जाण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये म्हणून सोडलं आहे.
एम. सुंदर हे आयकर विभागात अधिकारी आहेत. त्यांना या कामासाठी आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस ऑफिसमध्ये जावं लागतं. चेन्नईमध्ये सध्या कोरोना व्हायरस पेशंट्सची संख्या भरपूर आहे. सुंदरच्या वडिलांना या काळात घराच्या बाहेर जावे लागते. आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे मुलाला कोरनाचा धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी घर सोडून दुसरिकडं राहण्याचा निर्णय घेतला आहे. टीममध्ये निवड झालेल्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यास त्याला इंग्लंड दौऱ्यावर नेणार नसल्याचं बीसीसीआयनं (BCCI) यापूर्वीच जाहीर केलं आहे.
सुंदरच्या वडिलांनी या विषयावर ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना सांगितलं की, “वॉशिंग्टन आयपीएल खेळून घरी परतल्यापासून मी दुसरिकडं राहत आहे. माझी बायको आणि मुलगी वॉशिंग्टन सोबत राहतात. कारण, त्या घराच्या बाहेर पडत नाहीत. मला आठवड्यातील काही दिवस ऑफिसला जावं लागतं. माझ्यामुळे वॉशिंग्टनला कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. मी त्याला सध्या फक्त व्हिडीओ कॉलवरच पाहतो.”
‘सूत्रांच्या नावावर काहीही लिहू नका,’ चुकीच्या बातम्या छापणाऱ्यांना भुवनेश्वर कुमारनं सुनावलं
इंग्लंडमध्ये खेळण्याची तीव्र इच्छा
वॉशिंग्टन सुंदरची 2018 साली इंग्लंड दौऱ्यातील वन-डे आणि T20 सीरिजसाठी निवड झाली होती. त्यावेळी त्याला ट्रेनिंगच्या दरम्यान दुखापत झाल्यानं एकही मॅच न खेळता भारतामध्ये परत यावं लागलं. होतं. “इंग्लंडमधील लॉर्ड्स आणि अन्य ऐतिहासिक स्टेडियमवर खेळण्याची सुंदरची तीव्र इच्छा आहे. त्याला हा दौरा कोणत्याही कारणामुळे मिस करायचा नाही,’’ असं त्याच्या वडिलांनी म्हंटलं आहे.
कोणताही क्रिकेटपटू घडण्यासाठी त्याला त्याच्या घरच्यांची मिळालेली साथ ही नेहमीच महत्त्वाची असते. फक्त क्रिकेटपटूच नाही तर आपलं मुल यशस्वी व्हावं यासाठी त्याचे आई-वडिल सर्व प्रकारचे कष्ट करण्यासाठी तयार असतात. सुंदरच्या वडिलांचा (Sundar Father) हा निर्णय देखील याचं एक सर्वात ताजं उदाहरण आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.