
टीम इंडियाने 2012 साली जिंकलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा सदस्य स्मित पटेल (Smit Patel) याने बीसीसीआयच्या (BCCI) क्रिकेट पद्धतीला रामराम केला आहे. तो आता अमेरिकेत क्रिकेट खेळणार आहे. त्याचबरोबर जगभरातील T20 लीगमध्ये खेळण्याचा त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तो आता आगामी कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेत खेळणार असून बार्बोडस ट्रायडेंट्सनं त्याला कराराबद्ध केले आहे. स्मित सध्या अमेरिकेत असून त्याने बीसीसीआयच्या (BCCI) क्रिकेट सिस्टिममधून बाहेर पडण्याचा निर्णय (Smit Patel quits BCCI) जाहीर केला आहे.
कोण आहे स्मित पटेल?
टीम इंडियाने उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याच्या कॅप्टनसीमध्ये 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. स्मित त्या टीममधील विकेट किपर –बॅट्समन होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये 226 रनचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 97 झाली होती. त्यानंतर त्याने उन्मुक्त चंदसोबत पाचव्या विकेट्ससाठी नाबाद 130 रनची पार्टरनरशिप केली. यामध्ये स्मितचा वाटा 62 रनचा होता. त्यांच्या पार्टरनरशिपमुळेच टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता.
‘अंडर 19 वर्ल्ड कप कॅप्टनसह अनेक जण अमेरिकेत क्रिकेट खेळण्यास उत्सुक’
चार टीमकडून खेळला स्मित
स्मित पटेल मुळचा गुजरातचा. त्याने 2012 साली गुजरातकडून पदार्पण केले. पण, गुजरातच्या टीममध्ये पार्थिव पटेल (Parthiv Patel) हा सीनियर विकेट-किपर बॅट्समन असल्याने त्याला फार संधी मिळाली नाही. स्मितने संधीच्या शोधात गुजरातनंतर गोवा, त्रिपुरा आणि बडोदा या टीमचा प्रवास केला.
स्मित यावर्षी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत शेवटची भारतीय क्रिकेटमधील स्पर्धा (Smit Patel quits BCCI) खेळला. बडोद्याकडून खेळताना त्याने 5 मॅचमध्ये 38.60 च्या सरासरीने 184 रन काढले. यामध्ये दोन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.
स्मितने एकूण 55 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 39.49 च्या सरासरीनं 3278 रन काढले आहेत. यामध्ये 11 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याचबरोबर 43 लिस्ट ए मॅचमध्ये त्याच्या नावावर 32.47 च्या सरासरीने 1234 रन आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 2 सेंच्युरी आणि 8 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर T20 क्रिकेटमध्ये त्याने 28 मॅचमध्ये 708 रन काढले आहेत.
ग्रीन कार्ड होल्डर
28 वर्षांच्या स्मितचे सर्व कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आहे. त्याने देखील 2010 पासून बराच काळ अमेरिकेत घालवला आहे. त्याच्याकडे ग्रीन कार्ड देखील आहे. त्यामुळे तो अमेरिकेत कायमस्वरुपी राहू शकतो आणि तिथे कामही करु शकतो.
स्मित अमेरिकेतील मुख्य क्रिकेट लीगसाठी देखील करारबद्ध झाला आहे. मात्र त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्यासाठी (Smit Patel quits BCCI) आणखी 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.