भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar trophy) जिंकायची असेल तर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) लवकर आऊट करणे आवश्यक आहे. मागील सीरिजमध्ये स्मिथ हा बॉलची छेडछाड केल्याप्रकरणी एक वर्षांची बंदी भोगत होता. या बंदीवासानंतर परतल्यानंतर स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्याने रन्स केलेत. स्मिथच्या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाला प्रतिष्ठेची ॲशेस सीरिज (Ashes Series 2019) जिंकता आली होती. भारताविरुद्धही स्मिथचा जबरदस्त रेकॉर्ड आहे.

स्मिथची भारताविरुद्धची टेस्टमधील आकडेवारी

टेस्ट10
इनिंग20
रन्स1429
सरासरी84.05
सर्वोच्च192
100/507/3

( वाचा : ॲडलेडच्या आठवणी : वीरेंद्र सेहवागनं सहा तास संयमी खेळून टाळला होता भारताचा पराभव!)

ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या टीममध्ये स्टीव्हन स्मिथनं भारताविरुद्ध सर्वात जास्त रन्स केले आहेत. स्मिथने 10 टेस्टमधील 20 इनिंगमध्ये तब्बल 84.05 च्या सरासरीने 1429 रन्स केले आहेत. यामध्ये तीन हाफ सेंच्युरी आणि सात सेंच्युरींचा समावेश आहे. 192 हा स्मिथचा भारताविरुद्धचा सर्वोच्च स्कोअर आहे.

ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध खेळताना स्मिथची आकडेवारी आणखी बहरते.

टेस्ट4
इनिंग8
रन्स 769
सरासरी128.16
सर्वोच्च192
100/504/2

( वाचा : ‘स्मिथला कॅप्टन केले तर टीम चांगला खेळ करेल’, ऑस्ट्रेलियाच्या व्हाईस कॅप्टनचं मत )

स्मिथनं भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात 4 टेस्टमध्ये 128.16 च्या सरासरीने 769 रन्स केले आहेत. स्मिथनं या चार टेस्टमध्ये चार सेंच्युरी झळकावल्या असून दोन हाफ सेंच्युरी देखील झळकावल्या आहेत. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळलेल्या आठपैकी फक्त दोन इनिंगमध्ये स्मिथने 50 पेक्षा कमी रन्स काढले आहेत.

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध जिंकलेल्या टेस्ट मॅचमध्ये स्मिथचे योगदान आणखी मोठे आहे.

टेस्ट3
इनिंग6
रन्स511
सरासरी127.75
सर्वोच्च162*
100/503/1

स्मिथने भारताविरुद्ध खेळलेल्या 10 पैकी तीन टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. या तीन टेस्टमधील सहा इनिंगमध्ये स्मिथने 127.75 च्या सरासरीने 511 रन्स काढले आहेत. यामध्ये तीन सेंच्युरी आणि एका हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

( वाचा : कॅप्टनसीच्या प्रश्नावर स्मिथ म्हणाला…)

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय बॉलर्सवरही स्मिथने वर्चस्व गाजवले आहे.

बॉलररन्सबॉल्सआऊटस्ट्राईक रेट
रवींद्र जडेजा151474431.8
उमेश यादव262389467.3
आर. अश्विन348570361.0
मोहम्मद शमी112145177.2

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय बॉलर्समध्ये रवींद्र जडेजाचीच स्मिथविरुद्धची आकडेवारी समाधानकारक आहे. उमेश यादव, आर. अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्याविरुद्ध स्मिथने 60 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने रन्स जमवले आहेत. तर मोहम्मद शमीने स्मिथला फक्त एकदाच आऊट केले आहे. भारतीय टीममधील नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज या अन्य दोन बॉलर्सनी स्मिथ विरुद्ध अद्याप टेस्टमध्ये बॉलिंग केलेली नाही.

एकूणच भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या स्मिथला रोखण्यासाठी भारतीय बॉलर्स किती यशस्वी होतात यावरच या टेस्ट सीरिजचं भवितव्य बऱ्याच प्रमाणात अवलंबून असणार आहे.

टीप – भारत वि. ऑस्ट्रेलियाया यांच्यात 17 डिसेंबर 2020 रोजी सुरु होणाऱ्या टेस्ट पूर्वीची सर्व आकडेवारी वरील लेखात वापरण्यात आलेली आहे.

* ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: