फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या 5 टेस्टच्या सीरिजमधील दुसरी टेस्ट लॉर्ड्स मैदानावर होत आहे. क्रिकेट विश्वात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडचं (Lords) वेगळंच महत्त्व आहे. या मैदानात टेस्ट सेंच्युरी करत येथील बोर्डावर नाव कोरण्याचं स्वप्न प्रत्येक बॅट्समनचं असतं. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग आणि जॅक कॅलीस या दिग्गजांना ते शेवटपर्यंत जमलं नाही. दिलीप वेगंसरकर (Dilip Vengsarkar) यांनी लॉर्ड्सवर तीन टेस्ट सेंच्युरी केल्या आहेत. सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) पदार्पणातच इथं सेंच्युरी झळकावली. राहुल द्रविडची (Rahul Dravid) पदार्पणातील सेंच्युरी 5 रनननं हुकली. त्यानंतर लॉर्ड्सच्या बोर्डावर नाव येण्यासाठी त्याला त्याच्या शेवटच्या इंग्लंड दौऱ्यापर्यंत वाट पाहावी लागली. या सर्व दिग्गज बॅट्समनच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरनं लॉर्ड्सवर (Ajit Agarkar Lords Century) सेंच्युरी झळकावली आहे. या सेंच्युरीला आता 19 वर्ष उलटली आहेत, तरीही ही सेंच्युरी क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आहे.

बॉम्बे डक

मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये अजित आगरकरची ओळख ही चांगला बॅट्समन अशी होती. तो पुढचा सचिन तेंडुलकर समजला जात असे. कांगा लीगमध्ये त्याच्या कोचनं त्याला फास्ट बॉलिंगवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर आगरकरचं क्रिकेट करिअर बदललं. पुढचा सचिन तेंडुलकर होण्याऐवजी पुढचा कपिल देव होण्यावर त्यानं लक्ष केंद्रीत केलं.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेत आगरकरनं क्रिकेट विश्वात ओळख निर्माण केली होती. पण 1999-2000 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला ‘बॉम्बे डक’ हे नाव मिळालं. या दौऱ्यातील पहिल्या इनिंगमध्ये 19 रन काढल्यानंतर आगरकरनं 0,0,0,0 आणि 0 रन काढले. या पाचपैकी चार वेळा तर तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. त्याच्या या सातत्यामुळेच त्याला बॉम्बे डक हे नाव मिळाले.

मुंबईकर अजित आगरकरच्या भन्नाट स्पेलपुढे कांगारुंनी पत्कारली होती शरणागती!

सरासरी होती 7.47

अजित आगरकर लॉर्ड्स टेस्टमधील चौथ्या इनिंगमध्ये बॅटींगला येण्यापूर्वी त्याची सरासरी होती 7.47. त्याने 18 इनिंगमध्ये 127 रन केले होते. यामध्ये 8 वेळा तो शून्यावर आऊट झाला होता. 19 व्या इनिंगमध्ये त्याने थेट 109 रन (Ajit Agarkar Lords Century) काढले.

लॉर्ड्स टेस्टमध्ये हरभजन सिंगच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला होता. अनिल कुंबळेनं 6 विकेट्स घेत लॉर्ड्सवर स्पिन बॉलर्सना मदत मिळते हे दाखवून दिलं होते. त्यामुळे त्या टेस्टमध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या आगरकरची निवड ही नक्कीच टीकेचा मुद्दा ठरली असती. पण, लॉर्ड्स टेस्टच्या शेवटच्या दिवशी हे सर्व चित्र बदललं.

आधी लक्ष्मण नंतर नेहरा

टीम इंडियाला लॉर्ड्स टेस्टमध्ये मॅच जिंकण्यासाठी चौथ्या इनिंगमध्ये 568 रनचं आव्हान होतं. वासिम जाफर आणि राहुल द्रविडच्या हाफ सेंच्युरीनंतरही आगरकर आठव्या नंबरवर बॅटींगला आला तेव्हा भारताची अवस्था 6 आऊट 170 होती. चौथ्या दिवसाच्या अखेरीस आगरकर 28 आणि लक्ष्मण 38 रन काढून नॉट आऊट होते.

पाचव्या दिवशी चांगलं ऊन असल्यानं लॉर्ड्सचं पिच बॅटींगसाठी सोपे झाले होते. आगरकर-लक्ष्मण जोडीनं याचा फायदा घेतला. विजयाचं टार्गेट खूप लांब असले तरी त्यांनी शरणागती पत्कारण्यास नकार दिला.

आगरकर-लक्ष्मण जोडीनं 7 व्या विकेटसाठी 126 रनची पार्टनरशिप केली. लक्ष्मण 74 रन काढून आऊट झाला. त्यानंतर पुढच्या सहा ओव्हरमध्ये अनिल कुंबळे आणि झहीर खानही परतले. आता आशिष नेहरा (Ashish Nehra) हा 11 व्या नंबरचा बॅट्समन आगरकरच्या मदतीला आला. आगरकर तेव्हा 60 रनवर खेळत होता.

इंग्लंडविरुद्ध ‘या’ रेकॉर्ड्सची भारतीयांना संधी, पॉन्टिंगला मागं टाकत कोहली करणार इतिहास

नेहराची साथ, आगरकरचा पराक्रम

नेहरा मैदानात उतरला तेव्हा 60 रनवर खेळणाऱ्या आगरकरला आपण सेंच्युरी पूर्ण करु असे वाटले नव्हते. इंग्लंडचा कॅप्टन नासिर हुसेननं आक्रमक फिल्डिंग लावली. तरीही चिवट नेहरा आणि सेट झालेल्या आगरकरनं त्याला दाद दिली नाही. चांगल्या बॉलचा आदर आणि खराब बॉलचा समाचार हे कसलेल्या बॅट्समनचे तंत्र वापरत आगरकरनं रन काढण्यास सुरुवात केली.

नेहराच्या मदतीनं त्यानं टेस्टमधील पहिली सेंच्युरी (Ajit Agarkar Lords Century) ती देखील लॉर्ड्सवर झळकावली. आगरकरच्या सेंच्युरीनंतर नेहरानं देखील हात मोकळे केले. त्यानं फ्लिंटॉफला मारलेला सिक्स लॉर्ड्स मैदानाच्या बाहेर गेला. आगरकर-नेहरा जोडीनं शेवटच्या विकेटसाठी 63 रनची पार्टनरशिप केली. नेहरा अखेर 54 बॉलमध्ये 19 रन काढून आऊट झाला. आगरकर 190 बॉलमध्ये 16 फोरसह 109 रन काढून नॉट आऊट राहिला.

पराभव टळला नाही पण…

आगरकरची सेंच्युरी टीम इंडियाचा मोठा पराभव टाळू शकली नाही. पण सेहवाग, द्रविड, सचिन, लक्ष्मण आणि गांगुली या दिग्गज बॅट्समनच्या टीममध्ये आठव्या क्रमांकावर आलेल्या आगरकरनं कुणाच्याही कल्पनेत नसताना सेंच्युरी झळकावली.

लॉर्ड्सच्या सेंच्युरी बोर्डावर नाव असलेल्या विनू मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या भारतीयांच्या यादीमध्ये ‘बॉम्बे डक’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अजित आगरकरचंही (Ajit Agarkar Lords Century) नाव आहे. जे आजही सर्वांच्या ठसशीत लक्षात राहणारं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: