
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या टेस्टमधील टीम इंडियाच्या विजयावर पावसाचं पाणी पडलं. नॉटिंघममध्ये झालेल्या या टेस्टचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे भारतीय टीमच्या हाताशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) बॉलिंगनं सर्वांना प्रभावित केले. बुमराहनं पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. या यशाचे रहस्य (Bumrah On Notitingham Test) बुमराहनं सांगितलं आहे.
WTC Final मध्ये अपयशी
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) बुमराह अपयशी ठरला होता. त्या टेस्टमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती. बुमराहच्या त्या अपयशावर जोरदार टीका झाली होती. भारतीय टीममध्ये फास्ट बॉलर्सची स्पर्धा चुरशीची आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी बुमराहवर स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव होता.
WTC Final 2021: टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं
काय आहे यशाचे रहस्य?
बुमराहनं नॉटिंघम टेस्टमध्ये कसं यश मिळवलं याचं कारण सांगितलं आहे. ‘प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला फार बदल करावा लागला नाही. मी मानसिकता थोडी बदलली. परिणांमाचा विचार न करता फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे मला क्रिकेटचा आनंद घेता आला.
मी नेहमीच माझ्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. तसेच काही तरी नव्या गोष्टींचा यामध्ये समावेश व्हावा यावर माझा भर असतो. ज्या गोष्टी माझ्याकडं आहेत, त्यासह पुढे जाण्याची माझी नेहमी इच्छा (Bumrah On Notitingham Test) असते.’ असं बुमराहनं यावेळी सांगितले.
‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’
ती तर माझी खासियत!
जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगची शैली ही दुखापतीला निमंत्रण देणारी आहे, त्यामुळे त्यात बदल केला पाहिजे असं मत अनेकांनी यापूर्वी व्यक्त केलं आहे. बुमराहनं त्या आक्षेपावर देखील उत्तर दिले आहे. ‘माझ्याकडं काही वेगळं असेल तर मी त्याचा फायदा उठवला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये शरिराचा खूप कस लागतो. पण, माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट हे सर्वोच्च आहे. एखाद्या तरुण मुलांनी माझा सल्ला विचारला तर टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तरच तुमची ओळख निर्माण होईल, असा सल्ला मी त्यांना देईन, असे बुमराहने सांगितले.
बुमराहनं नॉटिंघम टेस्टमध्ये 10 व्या क्रमांकावर येत 28 रनची उपयुक्त खेळी केली होती. त्या खेळीबद्दलही त्यानं आनंद व्यक्त केला आहे. आम्ही नेट प्रॅक्टीसमध्ये अनेकदा बॅटींगवर भर दिला आहे. त्याचे परिणाम काही वेळा दिसतात (Bumrah On Notitingham Test) काही वेळा नाही.’ असे बुमराहने या इनिंगबद्दल बोलताना स्पष्ट केले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.