फोटो – ट्विटर, मिरर स्पोर्ट्स

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वादानं लॉर्ड्स टेस्ट गाजली. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) अँडरसनची परीक्षा घेणारे बाऊन्सर त्याच्या अंगावर टाकले होते. त्यानंतर अँडरसननं सर्व इंग्लंड टीमला हाताशी धरत बुमराहला शेकवण्याचा प्रयत्न केला. या वादाचं बुमराह आणि टीम इंडियानं जोरदार उत्तर दिलं. भारतीयांनी मैदानातील कामगिरी उंचावली. त्याने इंग्लंडचा 151 रननं पराभव झाला. भारतीय खेळाडूंचा द्वेष करण्याची, त्यांना शिवीगाळ करण्याची जेम्स अँडरसनची सवय (James Andeson vs Team India) ही जुनीच आहे.

नॉटींघम टेस्ट, 2014

टीम इंडियाच्या या दौऱ्यात नॉटिंघम टेस्टमध्ये पावसामुळे इंग्लंडचा पराभव टळला. 2014 साली या मैदानावर झालेली टेस्ट (India vs England, Nottingham Test 2014) अँडरसनच्या उद्दाम वर्तनानं गाजली होती. या टेस्टमध्ये अँडरसननं टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) धक्काबुक्की केली होती.

नॉटींघम टेस्टच्या दुसऱ्या दिवशी लंचनंतर ड्रेसिंग रुममध्ये जाताना जेम्स अँडरसननं जडेजाला मागून जोराने धक्का दिला, अशी तक्रार टीम इंडियानं केली होती. आयसीसीच्या नियमानुसार ही लेव्हल 3 ची तक्रार (James Andeson vs Team India) होती. इंग्लंडच्या मॅनेजमेंटनं ही तक्रार फेटाळत जडेजाविरुद्ध तक्रार केली.

ड्रेसिंग रुमच्या परिसरात सीसीटीव्ही नसल्यानं अँडरसनंच फावलं. आयसीसीनं त्याची निर्दोष मुक्तता केली. उलट जडेजाला लेव्हल 1 च्या अंतर्गत दोषी ठरवत त्याच्या मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम कापण्याचे आदेश दिले होते. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) यानं स्वत: ही धक्काबक्की पाहिली होती. तो या प्रकरणाचा साक्षीदार होता. आयसीसीच्या या निर्णयावर आणि अँडरसनच्या वर्तनावर त्यानं नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई टेस्ट, 2016

जेम्स अँडरसननं 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीला चार वेळा आऊट केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी विराट टीमचा कॅप्टन बनला होता. तो त्या सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्मात होता. विशाखपट्टण टेस्टमध्ये सेंच्युरी आणि हाफ सेंच्युरी, मोहाली टेस्टमध्ये हाफ सेंच्युरी तसंच मुंबई टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावत विराटनं अँडरसन आणि कंपनीला त्रस्त केले होते.

विशेष म्हणजे त्या सीरिजमध्ये विराटला एकदाही आऊट करण्यात अँडरसनला अपयश आले होते. पत्रकारांनी अँडरसनला विराटच्या बॅटींगबद्दल प्रश्न विचारला तेव्हा, ‘विराट चांगला बॅट्समन आहे, पण त्याची कमतरता लपली जाते.’ अशी टीका केली होती.

अँडसनची ही टीका आर. अश्विनला (R. Ashwin) चांगलीच लागली होती. मुंबई टेस्टमध्ये अँडरसन बॅटींगला आल्यावर अश्विननं त्याबाबत अँडरसनला जाब विचारला (James Andeson vs Team India) होता. विराटनं मध्यस्थी करत अश्विनला अधिक बोलण्यापासून रोखलं.

टीमवर्क! 11 जणांची एकत्र कमाल, इंग्रजांच्या अंगणात भारताचा दणदणीत विजय

लॉर्ड्स टेस्ट, 2021

जेम्स अँडरसन आता 39 वर्षांचा आहे. तो सध्या कदाचित भारताविरुद्धची शेवटची टेस्ट सीरिज खेळत आहे. या शेवटच्या सीरिजमध्येही त्याची भांडण करण्याची सवय सुटलेली नाही. टीम इंडियाच्या इनिंगमध्ये विराट कोहली बॅटींग करत असताना तो पिचवर बागडत होता. त्यावेळी विराट कोहलीनं त्याला जागेवरच ‘हे तुझे घर नाही’. या शब्दात सुनावले.

जसप्रीत बुमराहनं अंगावर बाऊन्सर टाकलेलं अँडरसनला आवडलं नाही. शेवटच्या दिवशी बुमराह बॅटींगला आला तेव्हा त्यानं मार्क वूडला हाताशी धरुन याचा बदला घेण्याचा प्रयत्न (James Andeson vs Team India) केला. त्यामुळे बुमराह तसंच टीम इंडिया चांगलीच डिवचली गेली. त्यानंतर जे घडलं ते सर्वांनाच माहिती आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: