फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या बॅटींगमधील अपयशी मालिका बराच काळ लांबली आहे. अजिंक्यनं 2016 पासून टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त 6 सेंच्युरी केल्या आहेत. इंग्लडचा कॅप्टन जो रूटनं या वर्षात 6 सेंच्युरी झळकावल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये आतापर्यंत लॉर्ड्स टेस्टमध्ये झळकावलेल्या महत्त्वपूर्ण हाफ सेंच्युरीनंतरही अजिंक्यनं फक्त 95 रन केले आहेत. हेडिंग्ले टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये पुजारा आणि विराट आऊट झाल्यानंतर त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. पण तो ती पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याला टीममधून वगळण्याची मागणीनं जोर धरला आहे. इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियात अजिंक्यला 3 जण पर्याय (Options for Ajinkya Rahane) आहेत.

हनुमा विहारी

हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) सिडनी टेस्टमध्ये दुखापतीची पर्वा न करता 161 बॉल खेळून काढले. त्याने आणि आर. अश्विननं किल्ला लढवल्यानंच टीम इंडियाला सिडनीमध्ये पराभव टाळता आला होता. त्यानंतर विहारी अद्याप एकही टेस्ट खेळलेला नाही.

टीम इंडिया 4 फास्ट बॉलर्ससह या सीरिजमध्ये खेळत असल्यानं विहारीला ड्रेसिंग रुममध्ये बसून राहवं लागत आहे. अजिंक्यच्या अपयशामुळे त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते. कोणत्याही क्रमांकावर बॅटींग करण्याची क्षमता असलेल्या विहारीनं 2018 साली ओव्हल टेस्टमध्येच पदार्पण केलं होतं. त्या पदार्पणात त्यानं हाफ सेंच्युरी झळकावली होती. तसंच त्याची ऑफ स्पिन बॉलिंगही उपयुक्त आहे.

सिडनीतील पराभव टाळून टीम इंडियाची द्रविडला वाढदिवशी गुरूदक्षिणा!

सूर्यकुमार यादव

आयपीएल आणि त्यानंतर झालेल्या इंग्लंड, श्रीलंका सीरिज यामुळे सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये चांगलं नाव कमावलंय. त्याचबरोबर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्यही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.

सूर्यकुमारनं 77 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 44.01 च्या सरासरीनं 5326 रन केले आहेत. यामध्ये 14 सेंच्युरी आणि 26 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व गाजवणाऱ्या मुंबईच्या बॅटींग युनीटचा तो महत्त्वाचा भाग आहे. तो सध्या फॉर्मात असल्यानं त्याच्यात आत्मविश्वासही आहे. याच गोष्टीमुळे त्याला टीम मॅनेजमेंटनं इंग्लंडला बोलावून घेतलंय. त्याला संधी द्यावी असं मत सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले भारतीय क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर आणि इंग्लंडमध्ये भरपूर रन करणारे दिलीप वेंगसरकर यांनीही व्यक्त केलंय. या सर्व गोष्टींचा विचार करता सूर्यकुमार यादव हा अजिंक्य रहाणेला ओव्हलवर पर्याय (Options for Ajinkya Rahane) ठरु शकतो.

मयंक अग्रवाल

शुभमन गिल जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) खेळणार हे निश्चित होते. पण पहिल्या टेस्टपूर्वी मयंक जखमी झाला. त्याच्या जागी केएल राहुलला (KL Rahul) संधी मिळाली. राहुलनं पहिल्या दोन टेस्टमध्ये चांगला खेळ केल्यानं त्याची टीममधील जागा पक्की केली.

मयंक अग्रवालनं बहुतेक वेळा ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळ केला आहे. पण टीम इंडिया लांबचा विचार करत असेल तर बॅटींगचं चांगलं तंत्र असलेला मयंक हा मिडल ऑर्डरमध्ये अजिंक्य रहाणेची (Options for Ajinkya Rahane) जागा घेऊ शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: