फोटो, ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या 5 टेस्टच्या सीरिजमधील (India vs England Test Series 2021) 2 टेस्ट संपल्या आहेत. नॉटींघम टेस्टमध्ये पावसाचा अडथळा आला नसता तर या सीरिजमध्ये सध्या टीम इंडिया 2-0 नं आघाडीवर असती. सध्या भारतीय टीमकडं 1-0 अशी आघाडी आहे. लॉर्ड्स टेस्टमधील पराभवानंतर ही सीरिज वाचवण्यासाठी इंग्लंड टीम हेडिंग्ले टेस्ट (India vs England Third Test) जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर दुसरिकडं हेंडिग्ले टेस्ट जिंकली तर टीम इंडिया ही सीरिज गमावणार नाही, हे नक्की होईल. त्यामुळे या महत्त्वाच्या टेस्टमध्ये टीम इंडिया कोणत्या 11 जणांना संधी देते ते महत्त्वाचे आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं अनुभवी स्पिनर आर. अश्विनला खेळवणे आवश्यक (Why Ashiwn Must Be Played In Third Test) आहे. 

कुणाच्या जागी संधी मिळणार?

सध्याच्या टीम इंडियामधील सर्वात जास्त टेस्ट विकेट्स घेणारा बॉलर असूनही अश्विनला पहिल्या दोन टेस्टमध्ये संधी मिळालेली नाही. आता लॉर्ड्स टेस्ट जिंकल्यानंतर विजयी टीममधील कुणाच्या जागी अश्विनचा समावेश करावा हा मुख्य प्रश्न आहे.

टीम इंडियानं या सीरिजमधील दोन्ही टेस्टमध्ये 4 फास्ट बॉलर्स खेळवले आहेत. विराट कोहलीनं संपूर्ण सीरिज 4 फास्ट बॉलर्ससह खेळणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये टीम इंडियाला याचा फायदाही झाला आहे. आता तिसऱ्या टेस्टमध्येही टीम इंडिया 4 फास्ट बॉलर्ससह खेळणार हे नक्की आहे. त्यामुळे अश्विनचा टीममध्ये समावेश हा फक्त रवींद्र जडेजाच्या जागी (Ravindra Jadeja) समावेश होऊ शकतो. अश्विला जडेजाच्या जागी खेळवण्यात यावं याची 3 मुख्य कारणं आहेत.

Explained: रवीचंद्रन अश्विन का आहे स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड?

अश्विनला खेळवण्याचं पहिलं कारण

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सनी चांगली कामगिरी केलीय. पण जडेजानं टीममधील एकमेव स्पिनर म्हणून निराशा केली आहे. जडेजानं नॉटिंघम टेस्टमध्ये 16 आणि लॉर्ड्स टेस्टमध्ये 28 अशा एकूण 44 ओव्हर्स बॉलिंग केली आहे. पण यामध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही.

त्यापूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही (WTC Final 2021) जडेजाला फक्त 1 विकेट मिळाली होती. जडेजानं या सीरिजमध्ये 143 च्या सरासरीनं फक्त 1 विकेट्स घेतली आहे. टीम इंडियाच्या मुख्य स्पिनरसाठी ही गोष्ट नक्कीच भूषणवाह नाही. अश्विननं या सीरिजमध्ये एकमेव टेस्ट (WTC Final 2021) खेळली असून त्यामध्ये त्यानं 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर पहिल्या टेस्टपूर्वी त्या मॅचमध्ये त्यानं 7 विकेट्स  घेतल्या आहेत. त्यापैकी 6 विकेट्स त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये घेतल्या होत्या. त्यामुळे बॉलिंगमधील विचार करता अश्विन तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणे आवश्यक (Why Ashiwn Must Be Played In Third Test) आहे.    

अश्विनला खेळवण्याचे दुसरे कारण

लॉर्ड्स टेस्टमध्ये चौथ्या दिवशी मोईन अलीनं चांगले बॉल वळवले होते. त्यानं चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा या दोघांना चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये आऊट केले होते. त्या टेस्टमध्ये जडेजाला बॉल वळवण्यात फार यश आले नाही.

हेंडिग्ले टेस्टमध्येही शेवटच्या दोन दिवसांमध्ये बॉल वळेल असा अंदाज आहे. फिरत्या पिचवर तर अश्विन हा टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर आहे. त्याचा अनुभव आणि अलिकडच्या काळात भारताबाहेरही केलेलं सातत्यपूर्ण प्रदर्शन याचा विचार करता अश्विनला तिसऱ्या टेस्टमध्ये खेळवणे आवश्यक आवश्यक (Why Ashiwn Must Be Played In Third Test) आहे.

अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद

अश्विनला खेळवण्याचे तिसरे कारण

रवींद्र जडेजाची बॅटींग ही त्याला खेळवण्याचे मुख्य कारण होती. जडेजाकडं सिनिअर बॅट्समनला साथ देण्याची आणि त्यानंतर तळाच्या बॅट्समनला सोबत घेऊन खेळण्याची कला आहे. त्यानं या सीरिजमध्ये बॅटींगमध्ये चांगली कामगिरी केलीय. टीम इंडियाचं शेपूट आणखी मोठं होऊ नये म्हणून जडेजाला अश्विनच्या जागी संधी मिळाली आहे.

या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या लोअर ऑर्डरनं चांगली बॅटींग केली आहे. बुमराहनं दोन्ही टेस्टमध्ये दीर्घकाळ बॅटींग केली. लॉर्ड्स टेस्टमध्ये बुमराह-शमी जोडीनं नवव्या विकेटसाठी 89 रनची पार्टनरशिप करत मॅचचं चित्र बदललं. त्यामुळे लोअर ऑर्डरचा जडेजावरील भार कमी झाला आहे. जडेजाशिवाय लोअर ऑर्डर चांगलं खेळू शकते का हे पाहण्याची हेंडिग्लेमध्ये चांगली संधी आहे.

त्याचबरोबर अश्विनचा बॅटींगचा अनुभवही दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 5 सेंच्युरी आहेत. त्याचबरोबर त्यानं या वर्षातील पहिल्या टेस्टमध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच वाचवण्यासाठी दिलेली यशस्वी झुंज कोणताही भारतीय क्रिकेट फॅन विसरणार नाही. अश्विनला हेंडिग्ले टेस्टमध्ये का खेळवावं याचं हे तिसरं कारण (Why Ashiwn Must Be Played In Third Test) आहे.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: