फोटो – ट्विटर

ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये हरवल्यानंतर टीम इंडियानं इंग्लंडला ओव्हल टेस्टमध्ये (India vs England, Oval Test) पराभूत केलं आहे. गेल्या 50 वर्षात भारतीय टीमला एकदाही ओव्हलवर जिंकता आले नव्हते. पण ही टीम इतिहासाच्या ओझ्यात दडपणारी नाही, तर नवा इतिहास घडवणारी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पाचव्या दिवशी बॅटींगला मदत करणाऱ्या पिचवर 10 विकेट्स हातामध्ये असूनही इंग्लंडला मॅच जिंकणं सोडा वाचवणंही जमलं नाही. दोन प्रमुख फास्ट बॉलर्सना विश्रांती देऊनही टीम इंडियानं 157 रननं दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयामध्ये 3 गोष्टी निर्णायक ठरल्या (How India Won Oval Test) आहेत.  

शार्दुलची ऑल राऊंड कामगिरी

दुखापतीनंतर टीममध्ये परतलेल्या शार्दुलसाठी (Shardul Thakur) ओव्हल टेस्ट सर्वात खास ठरली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 7 आऊट 127 अशी टीमची अवस्था झाली होती. या अडचणीच्या प्रसंगी सर्व शार्दुलनं इंग्लिश बॉलर्सवर प्रतिहल्ला केला. त्यानं 36 बॉलमध्येच 57 रन काढले. इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात फास्ट हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक रन करणाऱ्या ओली पोपला (Ollie Pope) त्यानं आऊट करत मजबूत आघाडी घेण्याच्या स्वप्नात असलेल्या यजमानांना जागं केलं.

असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

शार्दुलनं दुसऱ्या इनिंगमध्येही हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं ऋषभ पंतसोबत केलेल्या शतकी पार्टनरशिपमुळे मॅच टीम इंडिया हरणार नाही, हे निश्चित झालं. तर बॉलिंगमध्ये रोरी बर्न्सला आऊट करत इंग्लंडची जमलेली जोडी फोडली. त्यानंतर या सिझनमध्ये ड्रीम फॉर्ममध्ये असलेल्या जो रूटला (Joe Root) उखाडलं आणि इंग्लंडची शेवटची आशा संपुष्टात आणली.

या कामगिरीमुळे शार्दुल ठाकूर हा हार्दिक पांड्याचा समर्थ पर्याय आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं उत्तर लगेच देणं हे घाईचं ठरेल, पण फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर काय फरक घडवू शकतो हे समजण्यासाठी शार्दुलची कामगिरी सर्वांनी लक्षात ठेवावी (How India Won Oval Test) अशी आहे.

रोहितसाठी ‘तो’ दिवस आला

ते कधीतरी होणार हे सर्वांनाच माहिती होतं. याच दौऱ्यात होणार असा अनेकांना विश्वास होता. लॉर्ड्समध्ये ती संधी थोडक्यात हुकली. अखेर ओव्हलमध्ये ती प्रतीक्षा संपली. टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मानं (Rohit Sharma) अखेर विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली आहे. पहिल्या इनिंगमध्ये झटपट आऊट झाल्यानंतर रोहितनं दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकावत टीम इंडियाच्या मोठ्या स्कोअरचा पाया रचला.

रोहित शर्मानं या खेळीत पहिले 50 रन करण्यासाठी 145 बॉल घेतले. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सावध खेळ करण्याचा संयम असल्याचं त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. त्याच्या याच संयमीवृत्तीनं त्यानं चेन्नई टेस्टमध्ये फिरत्या पिचवर सेंच्युरी झळकावली होती. आता इंग्लंड दौऱ्यातही तो टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॅट्समन आहे. विराट कोहलीची सेंच्युरीची प्रतीक्षा लांबली आहे. मिडल ऑर्डर फार फॉर्मात नाही. अशा परिस्थितीमध्ये भारतीय बॅटींगचा भार रोहितनंच त्याच्या भक्कम खांद्यावर पेलला (How India Won Oval Test) आहे.

फास्ट बॉलिंगचे पॉवर हाऊस

इंग्लंड दौऱ्यात पहिल्याच दिवशी फास्ट बॉलिंगचे एकमेव आशास्थान जायबंदी झाल्यानंतर कॅप्टनला विकेट किपिंगचे ग्लोज उतरवून बॉलिंग करावे लागण्याचे दिवस आता संपले आहेत. उलट आता टीम इंडिया सीरिजचा निर्णय ठरवणाऱ्या महत्त्वाच्या टेस्टमध्ये दोन प्रमुख बॉलर्सना विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकते. भारताच्या बाहेर टीम इंडियाच्या विजयात आघाडीवर असलेल्या फास्ट बॉलर्सनी ओव्हल टेस्टमध्येही सर्व फॅन्सच्या आशा पूर्ण केल्या आहेत.

टीमवर्क! 11 जणांची एकत्र कमाल, इंग्रजांच्या अंगणात भारताचा दणदणीत विजय

गेली 18 महिने फर्स्ट क्लास क्रिकेटपासून दूर असणाऱ्या उमेश यादवनं (Umesh Yadav) टीममध्ये येताच या टेस्टमध्ये 6 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहनं पाचव्या दिवशी इंग्लंडचा पराभव निश्चित करणारा स्पेल टाकला. ओली पोप आणि जॉनी बेअरस्टोच नाही तर श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणारे इंग्लंडचे प्रेक्षकही बुमराहनं टाकलेले ते दोन बॉल विसरणार नाहीत. त्यामुळेच बॅटींगसाठी सोप्या समजल्या जाणाऱ्या ओव्हलच्या पिचवर इंग्लंडला 50 वर्षांनी टीम इंडियानं पराभूत केलं.

किंग्स्टन, जोहान्सबर्ग, मेलबर्न, लॉर्डस, ब्रिस्बेन आणि आता ओव्हल भाराताच्या बाहेर मिळवलेल्या या सर्व ऐतिहासिक विजयात फास्ट बॉलर्सचं योगदान सर्वाधिक आहे. वेस्ट इंडिजचं युग मागंच संपलं. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया नाही तर भारत हे आता फास्ट बॉलर्सचं पॉवर हाऊस आहे, हे ओव्हल टेस्टमध्ये (How India Won Oval Test) पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: