
लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाकडून पराभूत होताच (India vs England, Lords Test) इंग्लंड टीमवर जोरदार टीका होऊ लागली आहे. लॉर्ड्स हे इंग्लंड क्रिकेटचे घर आहे. त्या मैदानावर यापूर्वी भारतीय टीमला यापूर्वी फक्त दोनदा विजय मिळवता आला होता. पहिल्या इनिंगमध्ये आघाडी, पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला दोन झटपट विकेट्सनंतर वर्चस्व मिळवल्यानंतरही इंग्लंड टीम 151 रननं पराभूत झाली. या खराब कामगिरीमुळे इंग्लंड टीमवर जोरदार टीका होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयन चॅपेलनं तर इंग्लिश टीमच्या (Chappell On Root) जखमेवर मीठ चोळलं आहे.
इंग्लंडनं नियंत्रण गमावलं
लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडनं ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांना झटपट आऊट करत मॅचमध्ये आघाडी घेतली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या दोघांनी जबरदस्त प्रतिकार करत नवव्या विकेटसाठी 89 रनची पार्टरनरशिप केली. शमी (56 नाबाद) आणि बुमराह (34 नाबाद) या दोघांनीही टेस्ट क्रिकेटमधील त्यांचा सर्वोच्च स्कोर नोंदवला. या पार्टनरशिपनंतर इंग्लंडची टीम बॅकफुटवर गेली.
जो रुटनं कॅप्टन म्हणून मॅचवरील नियंत्रण पूर्णपणे गमावलं होतं, अशी टीका चॅपेलनं केली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अॅशेस सीरिजसाठी कॅप्टन म्हणून त्याच्या क्षमतेवरही त्यानं चिंता व्यक्त केली.
टीमवर्क! 11 जणांची एकत्र कमाल, इंग्रजांच्या अंगणात भारताचा दणदणीत विजय
आता कॅप्टन बदलणार का?
इयन चॅपेलनं वाईड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, ‘तो पूर्णपणे हरवला होता. परिस्थिती समजण्याची त्याच्याकडं क्षमता नाही, ही त्याची मुख्य समस्या आहे. इंग्लंडनं स्वत:लाच कॉर्नरमध्ये ढकललं आहे. तो चांगल्या टीमवरुद्ध कॅप्टनसी करण्यासाठी लायक नाही, हे त्यांना यापूर्वीच समजायला हवं होतं.
तुम्ही आता काय करणार? अॅशेस सीरिजपूर्वी कॅप्टन बदलणार का? हा योग्य विचार नाही. तुम्ही कॅप्टन म्हणून त्याची निवड करुन जिंकण्याची संधी कमी केली आहे.’ या शब्दात चॅपेलनं रुटच्या कॅप्टनसीवर (Chappell On Root) आणि त्याची या पदावर निवड करणाऱ्या इंग्लिश बोर्डावर (ECB) टीका केली आहे.
इंग्लंड टीम स्थिर नाही
जो रुटच्या कॅप्टनसीवर टीका केल्यानंतर चॅपलनं इंग्लंडच्या टीमबाबतही मोठा दावा केला आहे. ‘आता ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आता त्यांना इच्छा नसतानाही टीममध्ये बदल करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अॅशेस सीरिजपूर्वी त्यांनी स्थिर व्हायला हवं होतं. पण त्यांची टीम अजिबात स्थिर नाही,’ असा दावा चॅपेलनं (Chappell On Root) केला आहे.
मॅच हातातून निसटताच इंग्रज बिथरले, बुमराहशी केले भांडण, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस सीरिजमधील पहिली टेस्ट 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.