फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ओव्हल टेस्टच्या (India vs England, Oval Test) दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahanae) शून्यावर आऊट झाला. टीम इंडियाला मॅचवर पकड मिळवण्यासाठी आणखी किमान 100 रनची गरज होती. त्यावेळी रहाणे आऊट झाल्यानं टीमला धक्का बसला. या सीरिजमध्ये रहाणेनं टीमला धक्का देण्याची ही पहिलीच वेळ नाही. लॉर्ड्स टेस्टमधील (Lodrs Test) दुसऱ्या इनिंगमध्ये काढलेल्या 61 रनचा अपवाद वगळता रहाणे प्रत्येक वेळी गरज असताना आऊट होऊन टीमला अडचणीत (Rahane need a break) आणलं आहे.

रहणेनं गाठला तळ

अजिंक्य रहाणेनं या सीरिजमध्ये आत्तापर्यंत 7 इनिंगमध्ये 15.57 च्या सरासरीनं 109 रन काढले आहेत. टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन, टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन असलेल्या रहाणेची या दौऱ्यामध्ये खेळलेल्या टीम इंडियात हा लेख लिहित असताना फक्त इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांची सरासरी ही रहाणेपेक्षा कमी आहे. लॉर्ड्स टेस्टमधील हाफ सेंच्युरी वगळता या सीरिजमध्ये त्याला एकाही इनिंगमध्ये 20 रन करता आलेले नाहीत.

रहाणे फॉर्ममध्ये नसल्याचा परिणाम त्याच्या बॅटींगवरही होत आहे. त्यानं जो बॉल एरवी सरळ बॅटनं खेळून काढला असता, त्या बॉलवर तो पटकन मिडविकेटला खेळण्याच्या नादात आऊट झाला. बॅटींगसाठी योग्य असलेल्या पिचवर पहिला अडचणीचा एक तास खेळून काढण्याची तयारी त्यानं दाखवली नाही. तो फक्त 8 बॉल मैदानात होता. त्यामध्येही एकदा तो थोडक्यात वाचला (Rahane need a break) होता.

Love You as a Friend

अजिंक्य रहाणेच्या या खराब खेळानंतर त्याला ट्रोल करणाऱ्या अनेक मीमची बाजारात चलती आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या सर्वच खेळाडूंना या अनुभवातून जावं लागतं. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या या युगात ही टीका, त्यावरील मीम्स हे व्हायरल होण्यासाठी फार वेळ लागत नाही.

अजिंक्य रहाणे खराब फॉर्मनंतरही टीममध्ये खेळतोय. त्याबद्दल त्याला टीका होणं स्वाभाविक असलं तरी त्यावर ट्रोल केल्यापेक्षा त्याला खेळवणाऱ्या टीम मॅनेजमेंटला प्रश्न विचारले पाहिजेत.

खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला वेळ देणं आणि त्याला काहीही करुन खेळवणं यात फरक आहे. टीम मॅनेजमेंटनं रहाणेच्या बाबतीमध्ये ही चूक केली आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात त्याला वेळ देणं आवश्यक होते. त्यावेळी त्याला पहिल्या दोन टेस्टमध्ये ड्रॉप करण्यात आले होते. आता तो अजिबात फॉर्ममध्ये नसतानाही त्याला खेळण्यात येत (Rahane need a break)  आहे.

ओव्हल टेस्टमध्ये तर दोन्ही इनिंगमध्ये रवींद्र जडेजाला त्याच्या आधी खेळवण्यात आले. टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय रहाणेला डिवचण्यासाठी आहे, त्यामुळे तो रन काढायला लागेल या चर्चा ऐकणे म्हणजे ‘I Love as a friend’ हे तुमच्या क्रशकडून ऐकण्यासारखे आहे.

IND vs ENG, Explained: रवींद्र जडेजाला 5 क्रमांकावर खेळवणे योग्य निर्णय आहे कारण…

कुणावरही अन्याय करु नका

अजिंक्य रहाणे हा उत्तम तंत्र असलेला मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे. भारतापेक्षा विदेशात अधिक यशस्वी असलेल्या मोजक्या मंडळींपैकी तो आहे. अगदी आजही मागील काही सततच्या अपयशानंतर त्याची टेस्ट क्रिकेटमधील विदेशातील सरासरी (41.71) ही घरातील सरासरीपेक्षा ( 36.47) पाच ने जास्त आहे. ज्या तंत्राच्या जोरावर तो विदेशात यशस्वी झाला. ते तंत्र अधिक घोटिव करण्यासाठी, त्याच्यावर असलेले मानसिक प्रेशर कमी करण्यासाठी रहाणेला ब्रेकची (Rahane need a break) गरज आहे.  

लॉर्ड्सवर 2014 साली झळकावलेली सेंच्युरी, दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गमध्ये केलेली बॅटींग, ऑस्ट्रेलियात दौऱ्यात विराटच्या अनुपस्थितीमध्ये सांभाळलेली कॅप्टनसी, ऑल आऊट 36 च्या धक्क्यानंतर टीमला नवी दिशा देणारी सेंच्युरी झळकवणारा जिगरबाज म्हणजे अजिंक्य रहाणे आहे. इंग्लंड सीरिजमध्ये रन्ससाठी झगडणारा, बॅटींग करताना कायम टेन्शनमध्ये असणारा आणि आऊट झाल्यानंतर ट्रोलधाडीला नवं खाद्य पुरवणारा व्यक्ती म्हणजे अजिंक्य रहाणे नाही.

टीमसाठी सर्वस्व देणे हाच रहाणेच्या खेळाचा श्वास आहे. फॉर्ममध्ये नसतानाही त्याला खेळवणे हे सध्या बेंचवर बसलेल्या अन्य खेळाडूंवर अन्यायकारक आहेच. पण यामुळे टीम मॅन असलेल्या रहाणेचाही श्वास कोंडत असणार. रहाणेला आता मोकळा श्वास घेण्यासाठी ब्रेकची गरज आहे. त्याला पुढील टेस्टपासून तो ब्रेक दिला (Rahane need a break)  पाहिजे. देशांतर्गत मॅचमध्ये चांगलं खेळून पुन्हा टीममध्ये येण्याचा ऑप्शन त्याच्यसाठी कायमच खुला आहे.

दुर्लक्षित नायक ते ऑस्ट्रेलियातील अद्भुत विजयाचा हिरो

टीम इंडियातील जागेसाठी असलेली स्पर्धा पाहता त्याचं टीममधील कमबॅक हे अशक्य आहे, असा अनेकांचा अंदाज असेल. पण दुखापतग्रस्त टीमला घेऊन ऑस्ट्रोलियात इतिहास रचणाऱ्या माणसासाठी हे आव्हान फार अवघड नक्कीच नसेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: