फोटो – बीसीसीआय

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार घडला. न्यूझीलंडचा स्पिनर एजाज पटेलनं एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स (Ajaz Patel 10 Wickets in an innings) घेतल्या. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हा प्रकार तिसऱ्यांदा घडला आहे. सर्वात प्रथम इंग्लंडचे जिम लेकर (Jim Laker) आणि नंतर टीम इंडियाचे अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी ही कामगिरी केली हे सर्वांना माहिती आहे. एजाजच्या निमित्तानं त्याची अनेकदा उजळणी देखील झाली आहे. पण, राहुल द्रविड आणि जवागल श्रीनाथ या भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गजांचे देखील एका इनिंगमध्ये 10 विकेट्स या कामगिरीशी खास कनेक्शन (Dravid-Srinath connection) आहे.  

तिसऱ्यांदा घडला प्रकार

एजाज पटेलनं मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया विरुद्ध एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. या टेस्टमध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच आहे. तर जवागल श्रीनाथ मॅच रेफ्री आहे. या दोघांचीही मुंबई टेस्टमध्ये महत्त्वाची भूमिका असल्यानं ते देखील एजाजच्या ऐतिहासिक कामगिरीचा (Dravid-Srinath connection) घटक बनले आहेत.

टीम इंडियाचा पहिला अस्सल ‘फास्ट’ बॉलर!

कुंबळे सोबत मैदानात

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 1999 साली झालेल्या दिल्ली टेस्टमधील चौथ्या इनिंगमध्ये अनिल कुंबळेनं 10 विकेट्स घेतल्या होत्या. अनिल कुंबळेनं हा पराक्रम केला तेव्हा द्रविड आणि श्रीनाथ हे टीम इंडियाचे सदस्य म्हणून दिल्लीच्या मैदानात होते.

राहुल द्रविडनं त्या इनिंगमध्ये कुंबळेच्या बॉलिंगवर मुश्ताक अहमदचा कॅच पकडला होता. तर जवागल श्रीनाथनं सर्वात मोठी मदत केल्यानंच कुंबळेला हा रेकॉर्ड करता आला. कुंबळेच्या 9 विकेट्स झाल्यानंतर श्रीनाथनं जाणीवपूर्वक खराब ओव्हर टाकली. श्रीनाथनं त्या ओव्हरमध्ये बॅटर्सपासून सतत लांब बॉल टाकले. त्यामुळे अखेर अंपायरला टेस्ट मॅचमध्ये वाईड बॉल द्यावा लागला होता. एका इनिंगमधील 10 विकेट्स या ऐतिहासिक प्रसंगाचं साक्षीदार होण्याचा प्रसंग द्रविड-श्रीनाथ जोडीसाठी (Dravid-Srinath connection) दुसऱ्यांदा घडला होता.

आणखी एकदा साक्षीदार

द्रविड आणि श्रीनाथ जोडी आणखी एकदा या ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार आहे. ती मॅच 2001 साली झाली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात सर्वात अलिकडच्या काळात एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा प्रकार त्या मॅचमध्ये झाला होता.

ती मॅच होती दक्षिण विभाग विरुद्ध पूर्व विभाग (South Zone vs East Zone) दुलिप ट्रॉफी स्पर्धेतील ती मॅच त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये झाली होती. या मॅचमध्ये द्रविड दक्षिण विभागाच्या टीमचा कॅप्टन होता. त्याच्या टीममध्ये एस. श्रीराम, व्हीव्हीएस लक्ष्मण, विजय भारद्वाज, सुनील जोशी, व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथ हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज होते.

या सर्व दिग्गजांचा समावेश असूनही दक्षिण विभागाची टीम पहिल्या इनिंगमध्ये 113 रनवर ऑल आऊट झाली. याचे कारण म्हणजे ओडिशा आणि टीम इंडियाकडून खेळलेला फास्ट बॉलर देवाशिष मोहंती (Debasis Mohanty) याने त्या इनिंगमध्ये 19 ओव्हर्समध्ये 46 रन देत सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये द्रविड आणि श्रीनाथ यांच्या विकेटचाही समावेश होता. भारतीय क्रिकेटमधील त्या ऐतिहासिक मॅचचेही द्रविड आणि श्रीनाथ सदस्य आहेत.

द्रविड-श्रीनाथ यांच्या टीम विरुद्ध पहिल्यांदा बॉलरने 10 विकेट्स घेतल्या. त्यानंतर द्रविड-श्रीनाथच्या टीममधील बॉलरनं 10 विकेट्स घेतल्या. आता ही जोडी मैदानाबाहेरील घडामोडीमध्ये एकत्र आल्यानंतरही त्यांना एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याच्या पराक्रमाचे साक्षीदार (Dravid-Srinath connection) बनले आहेत.

द्रविडच्या गावातील सेहवागचा वीरूसारखा खेळ, सर्व टार्गेट केले फेल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: