फोटो- ट्विटर, ब्लॅककॅप्स

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये शेवटपर्यंत रंगलेली कानपूर टेस्ट अखेर ड्रॉ (Kanpur Test Draw) झाली आहे. पाचव्या दिवशी लंचनंतर भारतीय स्पिनर्सनी दमदार कमबॅक करत मॅच जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, त्यांना शेवटची विकेट घेण्यात अपयश आले. त्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (World Test Championship) 8 पॉईंट्सचं नुकसान झालं आहे. तर न्यूझीलंडनं वर्ल्ड चॅम्पियनला साजेसा दमदार खेळ करत भारतामध्ये टेस्ट ड्रॉ करण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं ते पाहूया

फास्ट बॉलर्सची भेदकता

न्यूझीलंडनं कानपूर टेस्टमध्ये तीन स्पिनर्स खेळवले. पण, त्यांना मॅचमध्ये ठेवण्याचं काम दोन फास्ट बॉलर्सनं केलं. टीम साऊदी (Tim Southee) आणि कायले जेमीसन (Kyle Jamieson) या फास्ट बॉलर्सनी दोन्ही इनिंगमध्ये जोरदार बॉलिंग केली. साऊदीनं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात टीम इंडियाला धक्के दिले. 4 आऊट 258 या पहिल्या दिवसाच्या स्कोअरमध्ये टीम इंडियाला 100 रनचीही भर टाकता आली नाही. चौथ्या दिवशीही साऊदीनं सकाळच्या सत्रात एकाच ओव्हरमध्ये मयांक आणि जडेजाला आऊट केले.

जेमीसननं न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट 50 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड या टेस्टमध्ये केला आहे. तो या रेकॉर्डसाठी का पात्र आहे हे त्यानं कानपूर टेस्टमध्ये दाखवून दिलं. तो भारतामध्ये पहिल्यांदाच टेस्ट खेळत होता. बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता, पण त्याचा परिणाम त्याच्या बॉलिंगवर झाला नाही. पहिल्या इनिंगमध्ये मयांक, गिल आणि अजिंक्य तर दुसऱ्या इनिंगमध्ये गिल, पुजारा आणि अश्विन या टीम इंडियाच्या महत्त्वाच्या विकेट्स (Kanpur Test Draw) त्यानं घेतल्या.

WTC 2021: न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होण्याची 5 मुख्य कारणं

टॉप ऑर्डर्सची झुंजार वृत्ती

भारतीय टॉप ऑर्डरनं दोन्ही इनिंगमध्ये निराशा केली. शुभमन गिलनं पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली, पण त्यानंतर तो लगेच आऊट झाला. पाचव्या क्रमांकावर बॅटींगसाठी आलेल्या श्रेयसनं त्याच्या नंतर येणाऱ्या बॅटर्सच्या मदतीनं टीम इंडियाला दोन्ही इनिंगमध्ये अडचणीतून वाचवलं.

न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरनं दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सना दमवलं. विल यंग (Will Young) आणि टॉम लॅथम (Tom Latham) या जोडीनं दुसऱ्या दिवशी 57 ओव्हर्स खेळ केला. त्या दिवशी टीम इंडियाच्या एकाही बॉलरला विकेट मिळाली नाही. अश्विन, जडेजा आणि अक्षर हे तीन्ही अव्वल स्पिनर्स टीममध्ये होते, तरीही त्यांना विकेट घेता आली नाही. न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला झटपट यश मिळालं असतं तर कदाचित मॅचचं चित्रं (Kanpur Test Draw) वेगळं असतं.

पाचव्या दिवशी सकाळी तर टॉम लॅथम सोबत विल्यम समरविले या नाईट वॉचमननं भारतीय बॉलर्सना विकेट दिली नाही. पाचव्या दिवशी लंचपर्यंत टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतरचे दोन सेशन वर्चस्व गाजवल्यानं टीम इंडियाचा निर्णायक विजय एका विकेटनं निसटला. त्याचं मोठं कारण हे पाचव्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये एकही विकेट न मिळणे हे देखील आहे. विशेषत: 24 तासांपूर्वी न्यूझीलंडच्या बॉलर्सनी त्याच पिचवर जशी बॉलिंग केली होती त्याची पुनरावृत्ती भारतीय बॉलर्सना होम ग्राऊंडवर करता आली नाही.

निर्णायक खिळा ठोकण्यात अपयश

कानपूर टेस्टमध्ये पदार्पण करणारा रचिन रविंद्र (Rachin Ravindra) आणि 11 व्या क्रमांकावर बॅटींगला आलेला एजाज पटेल (Ajaz Patel) या जोडीनं 52 बॉल खेळून काढत न्यूझीलंडची शेवटची विकेट जाऊ दिली नाही आणि टीमचा पराभव टाळला. हे उदाहरण न्यूझीलंड टीम वर्ल्ड चॅम्पियन का आहे? हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.

पाचवा दिवस, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कमी अनुभव, भारतासारखा आव्हानात्मक देश, जडेजा, अश्विन आणि अक्षर हे तीन अव्वल स्पिनर्स, त्यांना साथ देण्यासाठी भारतीय कॅप्टननं लावलेली आक्रमक फिल्डिंग या सर्वांना न्यूझीलंडची ही शेवटची जोडी पुरुन उरली. सर्व अनुभवी खेळाडू आऊट झाले होते. पण, या नवोदीतांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी न्यूझीलंडचा पराभव टाळला.

IND vs NZ: कॅप्टन आणि कोच बदलले, आता खेळाची पद्धतही लवकर बदला

जी टेस्ट तीन ते साडेतीन दिवसांमध्ये संपेल अशी सुरू होण्यापूर्वी चर्चा होती. ती पाच दिवस पूर्ण चालली. न्यूझीलंडनं ती टेस्ट शेवटपर्यंत खेचली. काही काळ टीम इंडियावर वर्चस्व राखलं. तर शेवटच्या क्षणी कडेलोटाच्या टोकावरही संतुलन साधत पराभव वाचवला. कोणत्याही मैदानात, कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही बड्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध सहज हार न स्वीकारणे हेच वर्ल्ड चॅम्पियचे लक्षण असते. न्यूझीलंडच्या टीमनं ते दाखवत कानपूर टेस्ट ड्रॉ (Kanpur Test Draw) केली आहे. कानपूरमधील खेळाचा आत्मविश्वास त्यांना मुंबई टेस्टमध्ये उपयोगाला येणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: