फोटो – ट्विटर, ब्लॅककॅप्स

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला दोन वेळा 3 धक्के बसले. सर्वप्रथम अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा हे 3 जण दुखापतीमुळे टीममधून आऊट झाले. त्यानंतर शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे तीन जण एकापाठोपाठ आऊट झाले. त्यावेळी वानखेडेच्या पिचवर न्यूझीलंडचा एजाज पटेल (Ajaz Patel) हा भारतीय टीमसाठी मॉन्टी पानेसर ठरणार असं वाटत होतं. त्याचवेळी द्रविडच्या गावातील सेहवाग म्हणजेच मयांक अग्रवालने (Mayank Agarwal) वीरूची आठवण यावी असा खेळ केला. त्याच्या दमदार सेंच्युरीमुळे (Mayank Agarwal Century) टीम इंडियाची पहिल्या दिवशी वाचली आहे.

2 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स!

मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. विराट कोहलीनं टॉस जिंकला. त्यानंतर शुभमन गिल (Shubman Gill) आणि मयांकने चांगली सुरूवात केली. कानपूर टेस्टमधील पहिल्या इनिंगप्रमाणे मुंबईतही शुभमन सहज सुंदर फटकेबाजी करत होता. त्यानं मोठ्या खेळीचं स्वप्न दाखवलं आणि लगेच टाचणी टोचून जागं केलं. तो 44 रन काढून आऊट झाला.

गिल आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हजेरी लावून परतला. सध्या दबावातील पुजाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट थर्ड अंपायरनं घेतली. विराटही शून्यावर परतला. एजाज पटेलनं 2 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचे 3 प्रमुख बॅटर आऊट केले होते.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमममध्ये इंग्लंडच्या मॉन्टी पानेसरनं (Monty Panesar) त्याच्या स्पिन बॉलिंगवर भारतीय बॅटर्सना नाचवले होते. 9 वर्षांपूर्वी झालेली ती टेस्ट टीम इंडियानं गमावली होती. पटेलच्या त्या 2 ओव्हर्समुळे पानेसरची आठवण झाली. या टेस्टमधील सर्वात अनुभवी असे 2 बॅटर शून्यावर आऊट झाले होते. आता मैदानात एक टेस्ट जुना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हकालपट्टीपासून 1 टेस्ट दूर असलेला मयांक अग्रवाल एकत्र (Mayank Agarwal Century) होते.

राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा!

…आणि झाली वीरुची आठवण!

मुंबई टेस्टपूर्वी मयांक अग्रवालला ड्रॉप करण्याची जोरदार चर्चा होती. अजिंक्य न खेळल्यानं मयांकला आणखी एक चान्स मिळाला. मयांकनं तो ‘लास्ट डान्स’ असल्याच्या थाटात खेळ केला. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट घेणार एजाज पटेल तिसरी ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा मयांक त्याच्या ओव्हरमध्ये 1 सिक्स आणि 1 फोर लगावत दबाव झुगारून लावला. मयांकची ही बेधडक स्टाईल ही थेट वीरेंद्र सेहवागची आठवण देणारी होती.

मयांकनं टी टाईमपूर्वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. टी टाईमनंतर कानपूर टेस्टचा हिरो श्रेयस अय्यरला एजाज पटेलनंच आऊट केलं. तरीही मयांकच्या सकारात्मक खेळावर परिणाम झाला नाही. त्यानं सेहवागप्रमाणेच न्यूझीलंडच्या स्पिनर्सना डोईजड होऊ दिलं नाही.

दबावात सेंच्युरी

डॅरेल मिचेलच्या बॉलवर कव्हर ड्राईव्ह लगावत त्यानं टेस्ट क्रिकेटमधील चौथी सेंच्युरी (Mayank Agarwal Century) पूर्ण केली. 14 इनिंगनंतर त्यानं ही सेंच्युरी झळकावली असून ही सेंच्युरी त्याच्या कारकिर्दीला जीवदान देणारी ठरणार आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा टीममध्ये परतल्यानंतर मयांकला बाहेर बसावे लागेल अशी चर्चा होती. पण मयांकनं स्वत: आणि टीमही दबावात सेंच्युरी झळकावत त्याची उपयुक्तता दाखवली आहे.

अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा टीममध्ये नसल्यानं जयंत यादव सातव्या क्रमांकावर बॅटींग करणार आहे. त्यावेळी सिनिअर बॅटर म्हणून मुंबई टेस्टच्या पहिल्या दिवशी मयांकनं जबाबादारी स्वत: च्या खांद्यावर घेतली. 14 फोर आणि 4 सिक्ससह नाबाद 120 रनसह स्वत:वरील सर्व टार्गेट फेल करत ती जबाबदारी पूर्ण केली (Mayank Agarwal Century) आहे.

आयपीएल गाजवणाऱ्या 4 जोड्या तुटल्या, तुम्ही कुणाला सर्वात जास्त मिस करणार?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: