फोटो- ट्विटर, बीसीसीआय

T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता टीम इंडियाची लढत न्यूझीलंडची होणार आहे. 3 T20 आणि 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs New Zealand Series 2021) न्यूझीलंडची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे. या सीरिजमधील पहिली T20 मॅच बुधवारी (17 नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहे. महान क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) पूर्णवेळ हेड कोच झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे. त्यामुळे या सीरिजची सर्वांना उत्सुकता आहे. न्यूझीलंड विरुद्धची सीरिज सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या सर्व प्रकारातील क्रिकेट कल्चरवर द्रविडनं महत्त्वाची घोषणा (Dravid On Different Formats) केली आहे.

काय म्हणाला द्रविड?

न्यूझीलंड सीरिज सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविड आणि T20 टीमचा नवा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी द्रविडनं टीम इंडियाचे 3 तुकडे होणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे. राहुल द्रविडनं हे स्पष्टीकरण क्रिकेटच्या तीन फॉर्मेटसाठी वेगळ्या टीम करण्याच्या चर्चेवर दिलं आहे. प्रत्येक फॉर्मेटसाठी वेगळी टीम करण्याचा विचार नसल्याचं द्रविडनं यावेळी स्पष्ट केले.

SWOT Analysis: रोहित-द्रविड युगातील पहिल्या टीममध्ये काय आहे विशेष?

द्रविडनं यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, ‘मला प्रत्येक फॉर्मेटसाठी वेगळी टीम करण्याचा विचार मान्य नाही. आम्ही हे करणार नाहीत. आम्हाला खेळाडूंशी चर्चा करावी लागेल. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. एखाद्याच सीरिजमध्ये सर्व फॉर्मेटमधील खेळाडू खेळू शकणार नाहीत. वेगवेगळी टीम तयार करण्याचा माझा कोणताही विचार नाही. फॉर्मेटप्रमाणे काही खेळाडूंमध्ये बदल होऊ शकतो.’

द्रविडच्या कार्यकाळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship 2021-23), T20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) आणि वन-डे वर्ल्ड (One Day World Cup 2023) या तीन स्पर्धा होणार आहेत. तीन वेगवेळ्या फॉर्मेटमधील या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. यापैकी कोणत्याही एका फॉर्मेटला (Dravid On Different Formats) झुकतं माप देणार नसल्याचं द्रविडनं यावेळी जाहीर केलं. ‘आम्ही कोणत्याही एका फॉर्मेटला जास्त महत्त्व देणार नाहीत. माझ्यासाठी सर्व फॉर्मेट महत्त्वाचे आहेत. T20 वर्ल्ड कप, वन-डे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या सर्वांना समान महत्त्व आहे,’ असं द्रविडनं स्पष्ट केलं.


 खेळाडूंसाठी काय महत्त्वाचे?

राहुल द्रविड यावेळी म्हणाला की, टीमचा विजय महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर खेळाडूंचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. ‘आम्हाला योग्य समतोल साधावा लागेल. आम्हाला जिंकायचं आहे, पण ते खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं नाही. खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करावे लागेल. फुटबॉलमध्ये सर्व मोठे खेळाडू प्रत्येक मॅच (Dravid On Different Formats)  खेळत नाहीत. आम्ही आमच्या खेळाडूंना असं तयार करू की प्रत्येक जण मोठ्या मॅच खेळण्यासाठी तयार असेल.’ असं द्रविडनं यावेळी जाहीर केलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading