
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील T20 सीरिजसाठी (India vs New Zealand T20 Series 2021) टीम इंडियाची निवड झाली आहे. 16 सदस्यांच्या टीममध्ये 3 नवे चेहरे असून 3 जणांचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच झाल्यानंर टीम इंडियाची ही पहिलीच टीम आहे. त्यामुळे या टीममध्ये कुणाला संधी मिळते याकडं सर्वांचं लक्ष होतं. या टीममध्ये अपेक्षेप्रमाणे तरुण चेहऱ्यांना तसंच आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र तरुण आणि आयपीएल गाजवणारा राहुल द्रविडचा शिष्य संजू सॅमसनकडं (No Sanju Samson) दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
संजू जबरदस्त फॉर्ममध्ये
संजू सॅमसनचा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएल सिझनपूर्वी (IPL 2021) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कॅप्टन म्हणून त्याला जबाबदारी देण्यात आली होती. राजस्थानची टीम आयपीएल प्ले ऑफमध्ये जाऊ शकली नाही. पण, संजूनं या आयपीएलमध्ये कॅप्टनपदाच्या जबाबदारीला पूर्ण न्याय देत त्याचा सर्वोत्तम खेळ केला.
संजूनं आयपीएलमधील 14 मॅचमध्ये 40. 33 च्या सरासरीनं 484 रन काढले. हा संजूचा एका आयपीएल सिझनमधील सर्वोत्तम स्कोअर आहे. बेन स्टोक्स एक मॅचनंतर आऊट झाला. जोस बटलर निम्मा सिझन खेळला नाही. या दोन प्रमुख बॅटर्सच्या अनुपस्थितीमध्ये संजूनं कॅप्टनपदाची आणि टीमच्या बॅटींगची जबाबदारी त्यानं सांभाळली.
सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेतही (Syed Mushtaq Ali Trophy 2021) तो केरळचा कॅप्टन आहे. त्यानं पहिल्या 5 मॅचमध्ये 87.50 च्या सरासरीनं आणि 147.05 च्या स्ट्राईक रेटनं 175 रन काढले आहे. संजू हा ओपनिंग आणि मिडल ऑर्डर दोन्हीकडंही बॅटींग करू शकतो. तो एक चांगला विकेट किपर आणि ग्राऊंड फिल्डर देखील आहे. त्याचबरोबर सध्या सातत्यानं रनही करतोय.
SWOT Analysis: रोहित-द्रविड युगातील पहिल्या टीममध्ये काय आहे विशेष?
काही खेळाडूंची एका आयपीएल सिझनच्या आधारे टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचं दार ठोठावत असलेल्या आणि सध्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनकडं निवड समितीनं दुर्लक्ष (No Sanju Samson) केलं आहे. त्याबद्दल सोशल मीडियावर देखील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. #JusticeForSanjuSamson हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
राहुल द्रविडचा शिष्य
संजू सॅमसननं 2013 साली वयाच्या 18 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. संजू सॅमसनला आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात राहुल द्रविडच्या कॅप्टनसीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर द्रविड राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा मेंटॉर असताना संजू त्या टीममध्ये होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संजू इंडिया A च्या टीममध्ये खेळला आहे.
द्रविडनं नेहमीच संजूच्या गुणवत्तेचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर द्रविड सरांच्या शिकवणीचा आपल्याला फायदा झाल्याची कबुलीही संजूनं (No Sanju Samson) अनेकदा दिली आहे.
का मिळाली नाही संधी?
टीम इंडिया यावर्षी जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर वन-डे आणि T20 सीरिज खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी प्रमुख खेळाडू इंग्लंडला होते. त्यामुळे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली नव्या दमाची टीम श्रीलंकेत गेली होती. त्या टीममध्ये संजूचाही समावेश होता. या दौऱ्यात संजूला अपेक्षापूर्ती करता आली नाही. ही गोष्ट त्याच्या निवडीत अडथळा ठरली.
श्रीलंका दौऱ्यात संजू एकमेव वन-डे मॅच खेळला. त्यामध्ये त्यानं 46 रनची समाधानकारक खेळी केली होती. पण त्यानंतर झालेल्या T20 सीरिजमध्ये संजू अपयशी ठरला. त्यानं 3 मॅचमध्ये 34 रन काढले. फक्त श्रीलंका दौरा नाही तर आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीत संजू अपयशी ठरला आहे. त्यानं 10 T20 इंटरनॅशनलमध्ये 11.70 च्या सरासरीनं 117 रन काढले आहेत. 27 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर असून त्यानं एकदाही 30 रनचा टप्पा ओलांडला नाही.
T20 World Cup 2021 Explained: टीम इंडियाच्या खराब कामगिरीला IPL जबाबदार आहे का?
श्रीलंका दौऱ्यातील T20 सीरिज दरम्यान टीम इंडियातील अनेक खेळाडू क्वारंटाईन झाले होते. त्यावेळी संजूकडून टीमला मोठ्या अपेक्षा होत्या. पण संजू त्यात अपयशी ठरला. त्याच्या या कामगिरीवर राहुल द्रविडनं निराशा व्यक्त केली होती.
न्यूझीलंड दौऱ्यातील टीम इंडियात ऋषभ पंतची (Rishabh Pant) फर्स्ट चॉईस विकेट किपर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर त्याचा डेप्युटी म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये फार संधी न मिळालेल्या इशान किशनवर (Ishan Kishan) विश्वास दाखवण्यात आला आहे. हे दोन्ही विकेट किपर चांगले बॅटर देखील आहेत. त्यामुळे देखील संजू सॅमसनचं नाव (No Sanju Samson) मागं पडलं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.