फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडिया जी मॅच किमान 2 ओव्हर राखून जिंकेल असं बॅटींग ‘पॉवर प्ले’ मध्ये वाटत होतं, ती अखेर 2 बॉल राखून जिंकण्यात भारतीय टीमला यश आलं आहे. टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पूर्णवेळ जबाबदारी घेतल्यापासूनची ही पहिलीच T20 होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील (T20 World Cup 2021) अपयशानंतर रोहित-द्रविड जोडीवर भारतीय फॅन्सच्या मोठ्या आशा आहेत. टीमचे कॅप्टन आणि कोच बदलले की लगेच सर्व काही बदलेल या अपेक्षेत असणाऱ्या आणि तसा भास निर्माण करण्यात आघाडीवर असणाऱ्या सर्वांनाच वास्तवाची जाणीव करून देणारी मॅच जयपूरमध्ये झाली (New Era, Old Problems) आहे.  

टीम निवडीवर प्रश्न

टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये (India vs New Zealand T20 Series 2021) निवडलेली टीम ही आश्चर्यकारक होती. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज हे तीन फास्ट बॉलर पहिल्या मॅचमध्ये खेळले. या तिघांचाही T20 मध्ये सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट्स घेण्याचा अलिकडच्या काळातील रेकॉर्ड आहे.

हर्षल पटेल (Harshal Patel) हा आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) मिडल ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग करणारा आणि डेथ ओव्हर्स गाजवणारा पर्याय होता, पण त्याला संधी देण्यात आली नाही. हर्षलनंतरचा आयपीएल स्पर्धेतील यशस्वी बॉलर आवेश खानला (Avesh Khan) खेळवण्याचा प्रयोग करणेही नव्या मॅनेजमेंटनं (New Era, Old Problems) टाळलं.

तीन फास्ट बॉलर्समध्ये आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांचा समावेश केल्यास टीम इंडियाचे सर्व पाच बॉलर्स हे सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये बॉलिंग करणारे स्पेशालिस्ट होते. तरीही या पाच बॉलर्सना मिळून पहिल्या 13 ओव्हर्समध्ये फक्त 1 विकेटच घेता आली.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या अपयशाची 5 मुख्य कारणं

अश्विननं वाढवली डोकेदुखी

T20 वर्ल्ड कपपूर्वी वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्यानं आर. अश्विनचा (Ravichandran Ashwin) टीम इंडियात समावेश करण्यात आला. चार वर्षानंतर टीम इंडियात परतलेल्या अश्विननं घड्याळाची चक्र उलटी फिरवली आहेत. त्यानं T20 वर्ल्ड कपमध्ये चांगली बॉलिंग केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध जयपूरच्या मैदानातही आक्रमक खेळ केला.

चांगला क्वालिटी बॉलर काय करू शकतो हे अश्विन सध्या सिद्ध करत आहे. न्यूझीलंडच्या इनिंगमधील 14 व्या ओव्हरमध्येही त्यानं ते सिद्ध केलं. त्यानं बचावात्मक खेळ न करता स्वत:च्या बॉलिंग स्किलवर विश्वास ठेवला. भारतीय बॉलर्सवर तोपर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या मार्क चॅम्पमनला त्यानं चकवलं. तर सिक्स मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्लेन फिलिप्सलाही मैदानात स्थिर होऊ दिलं नाही.

अश्विननं 14 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला पुन्हा मॅचमध्ये आणलं. मॅच संपल्यानंतर ‘आम्हाला 10 रन कमी पडले’ असं मार्टीन गप्टील म्हणाला. हे 10 रन कमी होण्यात अश्विनच्या त्या ओव्हरचा महत्त्वाचा वाटा होता. अश्विनच्या या फॉर्ममुळे टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली आहे. अन्य बॉलर्स अडकल्यावर विकेट घेण्यासाठी अश्विन हाच पर्याय टीम इंडियाकडं आहे. त्यामुळे भविष्यातील प्लेईंग 11 मध्ये जडेजासोबत अन्य स्पिनर म्हणून अश्विनला खेळवायचं की अन्य खेळाडूंचा विचार करायचा याचं उत्तर टीम मॅनेजमेंटला शोधावं (New Era, Old Problems) लागेल.

ऋषभ पंतला काय झालंय?

ऋषभ पंतनं (Rishabh Pant) शेवटच्या ओव्हरमध्ये फोर लगावत टीम इंडियाला या सीरिजमध्ये आघाडी मिळवून दिली. पंतमुळेच  रोहित-राहुल पर्वाची सुरूवात विजयानं झाली. पण त्याचा संथ झालेला खेळ हा आता दुर्लक्ष करण्याचा नाही तर काळजीचा विषय बनला आहे. तो टीममध्ये आला तेव्हा आक्रमक बॅटींगचा चेहरा म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात होते. 150, 175, 200 च्या स्ट्राईक रेटनं तो T20 मध्ये खेळेल अशीच सर्वांची अपेक्षा होती. पंतनं 2017 आणि 18 च्या आयपीएलमध्ये त्याच पद्धतीनं खेळ केला होता.

टीम इंडियाच्या Next Generation चा सुपरस्टार, भविष्यातील कॅप्टन

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज सकारात्मक बॅटींगनं गाजवणाऱ्या पंतचा T20 इंटरनॅशनलमधील स्ट्राईक रेट हा सध्या 100 ते 120 च्या घरात आहे. 2020 पासून झालेल्या 13 मॅचमध्ये फक्त 2 वेळा त्यानं 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन काढले आहेत. अगदी जयपूरमध्येही त्यानं 17 रन काढण्यासाठी 17 बॉल घेतले.

रोहित, राहुल आणि विराट हे एकाच पद्धतीनं अँकर रोलमध्ये बॅटींग करणारे टॉप थ्री खेळाडू टीम इंडियात आहेत. त्याचबरोबर हार्दिक पांड्याही टीमच्या रडारमधून आता मागे पडत चालला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये पंतनं अधिक आक्रमक खेळण्याची आणि मिडल ऑर्डरची जबाबदारी घेण्याची गरज आहे. तो हे काम करू शकतो हे त्यानं यापूर्वी दाखवलं आहे. 2018 सालातला पंत परत आला तर टीम इंडियाच्या T20 बॅटींगमधील बरेच प्रश्न सुटणार आहेत. हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आता रोहित-राहुल जोडीवर (New Era, Old Problems) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: