फोटो – ट्विटर

नॉन स्टॉप क्रिकेटच्या युगात एका सीरिजमधून खेळाडूंनी मोकळा श्वास घेण्यापूर्वी दुसरी सीरिजची तयारी सुरू होते. टीम इंडिया असेल तर मग विचारायलाच नको. क्रिकेटपटू 12 महिने सतत क्रिकेट खेळतील याची खबरदारी BCCI घेत असतं. T20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या सर्व मॅच संपल्यानंतर 24 तासांच्या आत भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) T20 सीरिजसाठी टीमची घोषणा झाली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) T20 टीमचा कॅप्टन झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे. भारतीय क्रिकेटमधील नव्या युगाला (Rohit-Dravid Era) या सीरिजपासून सुरूवात होत आहे.

टीम इंडियाची Strength

T20 वर्ल्ड कपनंतर लगेच होणाऱ्या या सीरिजमध्ये महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या चार प्रमुख खेळाडूंना या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अतिक्रिकेटमुळे थकलेल्या या सर्वांना थोडा आराम घेण्यासाठी हा ब्रेक फायदेशीर ठरेल.

चार प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्येही ही टीम न्यूझीलंडला हरवू शकते. याचं मुख्य कारण म्हणजे टीम इंडियाची बॅटींग. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या नव्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची जोडी T20 वर्ल्ड कपमधील शेवटच्या टप्प्यात फॉर्मात आली होती. रोहित आणि राहुल या दोघांच्या मिळून T20 इंटरनॅशनलमध्ये 6 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरी आहेत. भारतीय पिचवर ही जोडी आणखी धोकादायक (Rohit-Dravid Era) आहे.

टीम इंडियाची Weakness

न्यूझीलंड विरुद्ध निवडण्यात आलेल्या टीम इंडियात रोहित आणि राहुलसह ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर हे ओपनर्स आहेत. तर टॉप ऑर्डरमधील श्रेयस अय्यर, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे बॅटर्स आहेत. त्यामुळे फिनिशरची जबाबादारी ही फक्त ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खांद्यावर आहे.हार्दिक पांड्या फिटनेस आणि फॉर्ममुळे बाहेर आहे. तर रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. त्या परिस्थितीमध्ये पंतवर फिनिर्शर्सची जबाबदारी वाढली आहे.

या टीममध्ये ऑल राऊंडर म्हणून व्यंकटेश अय्यर हे एकच नाव आहे. पण, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षर पटेलकडं ऑल राऊंडर म्हणून पाहिलं जात असलं तरी त्याची बॅटींग अजून इंटरनॅशनल T20 मध्ये फारशी टेस्ट झालेली नाही. हुकमी ऑल राऊंडर्सची कमतरता ही रोहित-द्रविड युगातील (Rohit-Dravid Era) पहिल्या टीमची कच्ची बाजू आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम

टीम इंडियासाठी Opportunity

गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मात असलेले ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि हर्षल पटेल या सर्वांना ही स्पर्धा मोठी संधी आहे. या खेळाडूंना Playing11 मध्ये संधी मिळाली तर स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी त्यांना आहे. त्यातूनच भविष्यातील एखादा हुकमी खेळाडू टीम इंडियाला मिळू शकतो.

T20 वर्ल्ड कपमधील राखीव श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर यांना ही सीरिज मोठी संधी आहे. श्रेयसची दुखापतीमुळे वर्ल्ड कप खेळण्याची संधी गेली. मिडल ऑर्डरमधील मोठ्या स्पर्धेत स्वत:ची जागा राखण्यासाठी मोठी खेळी खेळण्यासाठी तो उत्सुक असेल. तर जडेजाची अनुपस्थिती टीमला जाणवणार नाही, हे दाखवून देण्याची संधी अक्षरकडे आहे.

भुवनेश्वरचा वारसदार म्हणून दीपक चहरकडं पाहिलं जात आहे. त्याला हा टॅग या दौऱ्यात सिद्ध करता येईल. तसंच त्याला बॅटींगमध्येही सातव्या किंवा आठव्या नंबरवर उपयुक्तता दाखवण्याची संधी आहे. युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. आगामी वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्यांना प्रत्येक संधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अनुभवी आर. अश्विनलाही हीच गोष्ट लागू आहे.

दीपक चहरचे करिअर ‘प्रकाश’मान करणारी इनिंग!

Team India साठी Threats

T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये झालं त्याप्रमाणे रोहित आणि राहुल ही जोडी लवकर परतली तर मिडल ऑर्डरवर प्रेशर वाढणार आहे. न्यूझीलंडच्या टीमला प्रत्येक मॅचमध्ये चांगला होम वर्क करून उतरण्याची सवय आहे. ते रोहित-राहुलला टार्गेट करण्यासाठी विशेष अभ्यास करू शकतात. त्यातच विराट कोहली देखील या दौऱ्यात नसल्यानं मिडल ऑर्डरवरील प्रेशर आणखी जास्त आहे.  

भुवनेश्वर कुमार या टीम इंडियातील सिनिअर बॉलरचा फॉर्म हा देखील टीमसाठी अडचणीचा विषय आहे. बुमराह आणि शमीला विश्रांती देण्यात आल्यानं भुवनेश्वरची टीममधील जागा वाचली आहे. तसंच तो तिन्ही मॅच खेळणार हे देखील जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या अनुभवी बॉलरनं फॉर्ममध्ये येणं ही सीरिज जिंकण्यासाठी (Rohit-Dravid Era) आवश्यक आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाईस कॅप्टन), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, आणि हर्षल पटेल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: