फोटो – ट्विटर

गेल्या दोन वर्षांमध्ये जग झपाट्यानं बदललं आहे. दोन वर्षांपूर्वी कधीही न ऐकलेल्या शब्दांनी संपूर्ण जगाला व्यापून टाकलं. त्या सर्व धक्क्यातून, त्यामध्ये बसलेल्या फटक्यातून अजूनही जग संपूर्ण सावरलेलं नाही. अनेक देशात सत्तांतर झाली. राजकीय उलथापालथी झाल्या. खेळाच्या मैदानातही बऱ्याच घडामोडी झाल्या. जुन्या दिग्गजांनी मैदानाचा निरोप घेतला. नवे विजेते उदयाला आले. या सर्व उलथापाथीमध्ये टीम इंडियाच्या फॅन्सची सुरू असलेल्या प्रतीक्षेला (Indian fans eagerly waiting) आता दोन वर्ष झाली आहेत.

होय, 2 वर्ष झाली!

टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) आयुष्यातही गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. तो बाबा झाला. विराट आणि अनुष्काला मुलगी झाली. हा सर्वोच्च आनंदाचा क्षण त्याच्या आयुष्यात आला. पण, क्रिकेट करिअरमध्ये अनेक उलधापालथ झाली आहे.

टीम इंडियानं इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टेस्ट सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) तर टीम इंडियाला सेमी फायनलही गाठता आली नाही. कोणत्याही ICC स्पर्धांच्या इतिहासात 2012 नंतर पहिल्यांदाच हे घडलं. या दोन्ही स्पर्धेत विराट कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन (Indian fans eagerly waiting) होता.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या अपयशाची 5 मुख्य कारणं

कॅप्टन म्हणून आरसीबीसाठी (RCB) आयपीएल ट्रॉफी  जिंकण्याचं विराटचं स्वप्न देखील अपूर्ण राहिलं. मागील दोन आयपीएल सिझनमध्ये ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केल्यानंतरही आरसीबी विजेतेपदापासून दूर राहिली. आता विराटनं आरसीबीची आणि टीम इंडियाच्या T20 टीमची कॅप्टनसी सोडली आहे.

विराट कोहलीच्या करिअरमधील एका मोठ्या गोष्टीला आज दोन वर्ष झाली आहेत. आजपासून 2 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2019 रोजी विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावली होती. बांगलादेश विरुद्ध कोलकातामध्ये झालेल्या टेस्टमध्ये विराटने 136 रन काढले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षात विराटला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावता आलेली (Indian fans eagerly waiting) नाही.

विराट कोहलीला जागं होण्याचा इशारा देणारा पराभव, अन्यथा….

50 मॅच आणि 20 संधी

विराट कोहलीनं शेवटची सेंच्युरी झळकावल्यापासून 12 टेस्ट, 15 वन-डे आणि 23 T20  अशा 50 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 20 हाफ सेंच्युरी (टेस्ट 5, वन-डे 8, आणि T20 – 7) झळकावल्या आहेत. याचाच अर्थ त्याला एकूण 20 वेळा सेंच्युरी झळकावण्याची संधी होती. त्या संधींचं सेंच्युरीमध्ये रूपांतर करण्यात विराटला अपयश आलं आहे.

यापूर्वी सातत्यानं सेंच्युरी झळकावणाऱ्या विराटकडून प्रत्येक वेळी सेंच्युरीची अपेक्षा करणे चूक आहे, हे मान्य आहे. पण, 20 पैकी एकदाही त्याला सेंच्युरी झळकावता आलेली नाही. ही खंत टीम इंडियाच्या फॅन्सला आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये विराटनं भारत ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ते इंग्लंड अशा जगातील वेगवेगळ्या भागात क्रिकेट खेळलं आहे. तरीही त्याला शंभरी पार करता आलेली (Indian fans eagerly waiting) नाही.

मुंबईत काय होणार?

विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) होणारी कानपूर टेस्ट खेळणार नाही. तो थेट मुंबईतील टेस्टमध्ये खेळेल. विराटसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विराटचा रेकॉर्ड चांगला आहे.वानखेडेवर विराटनं आजवर 12 आंतरराष्ट्रीय मॅच खेळे असून यामध्ये 81.36 च्या सरासरीनं 895 रन केले आहेत. त्यामध्ये 2 सेंच्युरींचाही समावोश असून 1 टेस्ट सेंच्युरी आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच भारतीय क्रिकेट फॅन्सची 28 वर्षांची प्रतीक्षा संपली होती. 1983 नंतर 2011 साली टीम इंडियानं वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकला होता. आता विराटचीही 2 वर्ष आणि 50 मॅचची प्रतीक्षादेखील मुंबईत संपेल (Indian fans eagerly waiting) अशी भारतीय फॅन्सची अपेक्षा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: