फोटो – ट्विटर, आयसीसी

T20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरी आणि न्यूझीलंड विरुद्धची T20 सीरिज अपेक्षेप्रमाणे जिंकल्यानंतर टीम इंडिया तब्बल अडीच महिन्यांनी टेस्ट सीरज खेळण्यासाठी उतरणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand Test Series 2021) यांच्यातील पहिली टेस्ट कानपूरमध्ये होत आहे. या टेस्टपासून न्यूझीलंडची टीम त्यांच्या विजेतेपद राखण्याच्या मोहिमेची (World Test Championship) सुरूवात करणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा ‘क्रायसिस मॅन’ अजिंक्य रहाणेसाठी ही सीरिज शेवटची (Last Chance For Ajinkya Rahane) संधी आहे.

टीम मॅनचा बॅड फॉर्म

माझं काम हे टीमसाठी योगदान देणे आहे. याचा अर्थ मी प्रत्येक मॅचमध्ये सेंच्युरी झळकावणे हा नाही. 30-40-70 अशी असे टीमला उपयुक्त असे रन काढणे आहे, असे अजिंक्यनं कानपूर टेस्टच्या आदल्या दिवशी सांगितले आहे.

अजिंक्य टीम मॅन आहे, यात कोणतीही शंका नाही. त्याचा आजवरचा खेळ हा त्याची साक्ष आहे. बंगळुरू टेस्ट जिंकल्यानंतर अफगाणिस्तानला सेलिब्रेशनसाठी बोलवाणे किंवा ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यात टीम जखमी वॉर्ड झालेला असताना शिल्लक सैन्याशी सीरिज जिंकण्याचा अवघड गड सर करणे यासारखी काम अजिंक्यनं केली आहेत. त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये नेहमीच टीमला प्राधान्य दिलं आहे. यामध्ये कोणतीही शंका नाही.

छोट्या गोष्टीमागे मोठा विचार, अजिंक्य रहाणेनं जिंकली सर्वांची मनं!

अजिंक्यच्या सर्व चांगुलपणाचा, परिपक्वपणाचा, मैदानातील वर्तनाचा आदर आहे. पण तो ज्या टीमसाठी हे सर्व करतोय त्या टीममधील त्याची जागा धोक्यात आली आहे. न्यूझीलंडची टीमनं प्रतिस्पर्ध्यांशी चांगलं वागत होती त्यापेक्षाही त्यांनी सगळीकडं जिंकण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. हे अजिंक्यला चांगलं माहिती (Last Chance For Ajinkya Rahane) असेल.

अजिंक्यनं सांगितल्याप्रमाणे त्यानं सातत्यानं सेंच्युरी झळकावलेली नाही. त्याचबरोबर 30-40-70 रन देखील काढलेले नाहीत. त्याची 2021 मधील कानपूर टेस्टच्या पूर्वीपर्यंतची सरासरी ही 19.6 आहे. 21 व्या शतकात टॉप 6 मधील इंडियन बॅटर्समध्ये यापेक्षा कमी सरासरी ही मुरली विजयची (Murali Vijay) 2018 साली होती. विजय 2018 नंतर पुन्हा कधीही टेस्ट मॅच खेळलेला नाही.   

नावइनिंगरनसरासरीवर्ष
मुरली विजय1528218.82018
अजिंक्य रहाणे1937219.62021
सौरव गांगुली2344422.22001
KL राहुल2246822.32018
21 व्या शतकात टीम इंडियाच्या टॉप 6 बॅटर्सचा खराब फॉर्म

अजिंक्यला आणखी एक संधी

अजिंक्य रहाणे एकेकाळी VVS लक्ष्मणचा टेस्ट टीममधील वारसदार समजला जात असे. पण, 2017 पासून फक्त एकाच कॅलेंडर वर्षात (2019) अजिंक्यची टेस्टमधील सरासरी ही 40 पेक्षा जास्त आहे. गेल्या 15 टेस्टमध्ये एका सेंच्युरीसह त्याची सरासरी ही 25 पेक्षा देखील कमी आहे. भारतामध्ये झालेल्या 4 टेस्टमध्ये तर ती 18 पेक्षा देखील कमी आहे.

इंग्लंड दौऱ्यात त्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 49 रन काढले. तर लॉर्ड्स टेस्टमध्ये एक हाफ सेंच्युरी झळकावली. अन्य सर्व इनिंगमध्ये तो फेल गेला. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाचवी टेस्ट झाली असती तर अजिंक्य त्यामध्ये खेळला असता हे कुणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. या सर्व अपयशानंतरही अजिंक्य टीममध्ये आहे. इतकंच नाही तर विराट कोहलीसह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करणार आहे. अजिंक्यला आणखी एक संधी या सीरिजच्या रूपाने मिळाली (Last Chance For Ajinkya Rahane) आहे.

पर्याय तयार आहेत

अजिंक्यची या सीरिजमधील दोन टेस्टमधील जागा पक्की आहे. या संधीचा त्यानं फायदा घेतला नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो वगळला जाण्याची दाट शक्यता आहे. सिडनी टेस्टची एक खिंड एका पायानं लढवणाऱ्या हनुमा विहारीवर (Hanuma Vihari) या सीरिजमध्ये अन्याय झाला आहे. त्याची टीम इंडियात निवड करण्यात आली नाही.

श्रेयस अय्यर (Shreys Iyer) हा आणखी एक मिडल ऑर्ड़रचा बॅटर कानपूर टेस्टमध्ये पदार्पण करत आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टेस्ट पदार्पणासाठी विंगेत तयार आहे. इतकच नाही तर सध्या टेस्टमध्ये ओपनर म्हणून खेळत असलेल्या शुभमन गिलला (Shubman Gill) देखील मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्याबात टीम मॅनेजमेंट गांभिर्यानं विचार करत आहे. हे सर्व पर्याय असल्यानं रहाणेकडे या सीरिजमध्ये मोठी खेळी करण्याखेरीज कोणताही Last Chance For Ajinkya Rahane) पर्याय नाही.

क्रायसिस मॅन

भारतापेक्षा विदेशातील टेस्टमध्ये जास्त सरासरी असणाऱ्या मोजक्या भारतीय बॅटरमध्ये अजिंक्यचा समावेश आहे. प्रत्येक विदेश दौऱ्यात मोक्याच्या क्षणी एक तरी इनिंग खेळण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. दक्षिण आफ्रिकेतील 2017 साली झालेल्या मागील दौऱ्यात त्याला पहिल्या दोन टेस्टमध्ये न खेळवण्याचा फटका टीम इंडियाला बसला. तिसऱ्या टेस्टमध्ये त्यानं निर्णायक इनिंग खेळत टीमला विजय मिळवून दिला. अगदी इंग्लंड दौऱ्यात अजिबात फॉर्ममध्ये नसताना लॉर्ड्सवर हाफ सेंच्युरी झळकावत त्यानंच त्या टेस्टमध्ये विजयाची संधी निर्माण करुन दिली होती.

अजिंक्यसाठी एक चांगली बाब म्हणजे या सीरिजमध्ये त्याच्या आयपीएल टीमचा कॅप्टन आणि मेंटॉर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा हेड कोच आहे. अजिंक्य आणि द्रविडमधील नातं हे घट्ट आहे. द्रविडकडून त्याला बॅटींगमधील चुकांवर सल्ला मिळेल. त्याचबरोबर या अवघड परिस्थितीमध्ये हवा असलेला विश्वासही मिळणार आहे.

राहुल द्रविडचा 13 वर्षांपूर्वीचा एक सल्ला आणि रहाणे बनला रन मशिन!

अजिंक्यसाठी आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे न्यूझीलंडच्या टीमविरुद्ध त्यानं यापूर्वी चांगला खेळ केला आहे. न्यूझीलंडनं 2016 साली केलेल्या भारत दौऱ्यातील 3 टेस्टमध्ये त्यानं 347 रन केले होते. अजिंक्यचा टेस्ट करिअरमधील आजवरचा सर्वोच्च स्कोअर देखील याच सीरिजमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत त्यानं 5 पैकी 4 इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत टचमध्ये पुन्हा परतत असल्याची आशा निर्माण केली आहे. या आशेचं रुपांतर अजिंक्यनं मोठ्या खेळीत करावं आणि टीम इंडियाचा हा ‘क्रायसिस मॅन’ पुन्हा एकदा जुन्या टचमध्ये यावा हीच सर्वांची अपेक्षा (Last Chance For Ajinkya Rahane) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: