फोटो – ट्विटर, बीसीसीआय

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) दमदार पदार्पण केले आहे. श्रेयसनं टेस्ट पदार्पणातील पहिल्याच इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस 75 ऱन काढून नाबाद होता. श्रेयसच्या संपूर्ण कुटुंबासाठी 25 नोव्हेंबर 2021 हा आनंदाचा दिवस आहे. गेल्या 4 वर्षांपासून श्रेयसच्या वडिलांची (Shreyas Iyer Father) असलेली इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.

कानपूर टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नसल्यानं मिडल ऑर्डरमधील एक जागा रिकामी होती. विराटच्या जागेवर श्रेयस खेळणार असल्याचं कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) आदल्या दिवशीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे श्रेयसला टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टेस्ट टीमची कॅप दिली. श्रेयस टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 303 नंबरचा खेळाडू बनला.

प्रेरणा देणारा एक फोटो

श्रेयस अय्यरचे वडील (Shreyas Iyer Father) संतोष अय्यर यांनी ‘मिड डे’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलाच्या पदार्पणानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष यांच्या व्हॉट्सअप डीपीवर एक फोटो गेल्या चार वर्षांपासून कायम होता. तो फोटो त्यांनी कधीही बदलला नाही. तो फोटो दाखवून त्यांनी श्रेयसला टेस्ट क्रिकेटसाठी स्वत:ला तयार करण्याची प्रेरणा दिली.

2017 साली ऑस्ट्रेलिया विरुद्धची धरमशाला टेस्ट मॅच जिंकल्यानंतर श्रेयसच्या हातातील ट्रॉफीचा तो फोटो होता. त्या टेस्टपूर्वी विराट कोहली जखमी झाल्यानं श्रेयसचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनसीमधील ती टीम इंडियाची पहिलीच टेस्ट होती. श्रेयस त्या टीमचा सदस्य होता. पण त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. धसमशाला टेस्टनंतर श्रेयसला टीममधून वगळण्यात आले. आता चार वर्षांनी त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.  टीम इंडियाचे 3 तुकडे होणार नाहीत, हेड कोच होताच राहुल द्रविडची घोषणा, VIDEO

श्रेयसचे वडील काय म्हणाले

संतोष अय्यर यांनी या मुलाखतीमध्ये सांगिततले की, ‘टेस्ट क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. श्रेयसला टेस्ट क्रिकेट खेळताना पाहण्याची माझी तीव्र इच्छा होती. आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. मी आणि माझी पत्नी खूप खूश आहोत.

गेल्या 4 वर्षांपासून श्रेयसनं ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकल्यानंतरचा फोटो हा माझ्या व्हॉट्सअपचा डीपी होता. मी तो डीपी बदलला नाही, कारण तो फोटो पाहून श्रेयसनं प्रेरणा द्यावी असा माझा उद्देश होता.’ श्रेयस टेस्ट क्रिकेट खेळेल हा विश्वास होता. पण, कानपूर टेस्टमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, असं संतोष अय्यर यांनी (Shreyas Iyer Father) यावेळी सांगितले.

कसा खेळला श्रेयस?

श्रेयस अय्यरनं पहिल्या दिवशी केलेल्या खेळातून आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचं दाखवून दिलं आहे. श्रेयस बॅटींगला आल्यानंतर लगेच एजाज पटेलनं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकत त्याला मोठा फटका मारण्याचं आव्हान दिलं होतं. श्रेयसनं ते आव्हान स्विकारलं आणि त्या बॉलवर 2 रन काढले. टेस्ट क्रिकेटमध्ये आक्रमक सुरूवात केल्यानंतर तो दिवसभर थांबला नाही.

रविंद्र जडेजासोबत पाचव्या विकेट्ससाठी नाबाद शतकी पार्टनरशिप त्यानं केली. प्रवीण आम्रे, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ या टीम इंडियाच्या बॅटर्सच्या यादीत नाव नोंदवण्याची संधी त्याला आहे.

वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी सोडलं घर, कारण वाचून तुम्ही म्हणाल ‘बाप असाच असतो’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: