फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाच्याच नाही तर जगातील सध्याच्या सर्वोत्तम फास्ट बॉलरमध्ये जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश होतो. किंग्स्टन ते मेलबर्नपर्यंत पसरलेल्या क्रिकेट विश्वातील ज्या देशात बुमराह खेळला त्या ठिकाणी त्यानं त्याच्या बॉलिंगची छाप पाडली आहे. टीम इंडियाच्या विदेशातील टेस्ट विजयातील तो महत्त्वाचा शिल्पकार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट केपटाऊनमध्ये होणार आहे. बुमराहसाठी केपटाऊनचे मैदान (Bumrah In Cape Town) खूप खास आहे.

… इथे सुरू झाला प्रवास

बुमराह आयपीएलच्या माध्यमातून लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आला. त्या प्रकारात तो स्थिरावला. टीम इंडियाला विदेशात टेस्ट जिंकण्यासाठी बुमराह उपयोगी आहे, हे तत्कालीन कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ओळखले होते. त्यामुळेच बुमराहला त्यांनी 4 वर्षांपूर्वी झालेल्या आफ्रिका दौऱ्यासाठी राखून ठेवले होते.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया भारताबाहेर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत खेळली. त्या दौऱ्यातील पहिली टेस्ट केपटाऊनमध्ये झाली होती. त्याच टेस्टमध्ये बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण (Bumrah In Cape Town) केले.

3 भारतीय ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत केले दमदार पदार्पण

बुमराह भावुक

केपटाऊनमध्ये 4 वर्षांनी दाखल झाल्यानंतर बुमराह भावुक झाला. त्याने खास ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘केपटाऊन जानेवारी 2018 – इथेच माझ्या टेस्ट क्रिकेटची सुरूवात झाली. चार वर्षात एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून माझा विकास झाला आहे. या मैदानात परतल्यानंतर खास आठवणी ताज्या झाल्या आहेत.’ असे ट्विट बुमराहने केले आहे.

बुमराहने 5 जानेवारी 2018 रोजी केपटाऊनमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅटर एबी डिव्हिलियर्स ही त्याची पहिली विकेट होता. पहिल्या टेस्टमध्ये बुमराहनं 4 विकेट्स घेतल्या (Bumrah In Cape Town) होत्या. त्यानंतर त्या सीरिजमधील जोहान्सबर्ग टेस्टमध्ये बुमराहनं 5 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात योगदान दिले होते.

बुमराहनं आजवर 26 टेस्टमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच जिंकण्यात त्याची बॉलिंग निर्णायक ठरली आहे. विशेष म्हणजे त्याने यापैकी फक्त 2 टेस्ट भारतामध्ये खेळल्या आहेत.

अर्धवट काम करणार पूर्ण

जसप्रीत बुमराहाला पदार्पणातील टेस्टमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देता आला नव्हता. बुमराहनं चार विकेट्स घेतल्यानंतरही टीम इंडियाने ती टेस्ट गमावली. टीम इंडियाला केपटाऊनचा किल्ला मागच्या 30 वर्षांमध्ये आजवर कधीही भेदता आलेला नाही.

केपटाऊन आणि दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिज जिंकण्याचे टीम इंडियाचे काम आजवर अपूर्ण राहिले आहे. आता सीरिजमधील तिसऱ्या टेस्टमध्ये हे काम पूर्ण करण्याची संधी बुमराहाल आहे. ती पूर्ण करण्यासाठी तो सर्वस्वाची बाजी लावणार (Bumrah In Cape Town) आहे.

‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: