फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियाने ‘बॉक्सिंग डे’ टेस्टमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयानंतरही टीम इंडियाला दुहेरी झटका (India Slow Over-Rate) बसला. त्यामुळे सरत्या वर्षाचा शेवट गोड करूनही शेवटच्या घासात कडवटपणा आल्यासारखी गत टीम इंडियाची झाली.

सेंच्युरियनच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. 29 वर्षानंतर पहिल्यांदाच टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये बाजी मारली. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा केएल राहुल (KL Rahul) या विजयाचा नायक ठरला आणि त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा अवॉर्ड देण्यात आला.

दुहेरी धक्का

दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाला सेंच्युरियमधील विजयाचा आनंद जास्त काळ उपभोगता आला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टीम इंडियाला दुहेरी धक्का दिला. सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतरही स्लो ओव्हर रेटमुळे (India Slow Over-Rate) टीम इंडियाचा एक पॉईंट कमी झाला आहे. तसेच आयसीसीने टीम इंडियाच्या खेळाडूंना मॅच फीमधील 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे फर्मानही सोडले.

नववर्षातील पहिली सेंच्युरी झळकली, चौथीच टेस्ट खेळणाऱ्याला मिळाला मान

स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पाईंट टॅलीमध्ये एका पॉईंटचे नुकसान झाले आहे, असे आयसीसीने सांगितले. एमिरेट्स आयसीसी एलीट पॅनेलचे मॅच रेफरी अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांनी मर्यादित वेळेपेभा एक ओव्हर कमी टाकल्यामुळे टीम इंडियाला हा दंड (India Slow Over-Rate) ठोठावण्यात आल्याचे सांगितले. कॅप्टन विराट कोहली यानेही आयसीसीचा हा आरोप मान्य केला, त्यामुळे यावरील औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही.

दुसऱ्यांदा दंड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दुसरे पर्व सुरू झाल्यापासून टीम इंडियाला दुसऱ्यांदा पॉईंट्स गमवावे लागले आहेत. याआधी 4 ते 8 ऑगस्टदरम्यान नॉटिंगहमच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध (India vs England) झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचे दोन पॉईंट्स कमी झाले होते. टीम इंडियासह इंग्लंडचेही दोन पॉईंट्स आयसीसीने कमी केले होते. तसेच दोन्ही टीमला मॅच फीच्या 40 टक्के रक्कम दंड ठोठावला होता. आयसीसीचे मॅच रेफ्ररी ख्रिस ब्रॉड यांनी ही कारवाई केली होती.

पॉईंट्सचा फरक का?

टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये दोन आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्टमध्ये (India vs South Africa) एक पॉईंट्स कमी करण्यात आला. पॉईंट्समधील हा फरक का असा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु आयसीसीची आचारसंहिता अनुच्छेद 2.22 नुसार निर्धारित वेळेपेक्षा एक ओव्हर कमी टाकल्यास एक पॉईंट्स आणि मॅच फीच्या 20 टक्के रक्कम, तर दोन ओव्हर कमी टाकल्यास दोन पॉईंट्स आणि मॅच फीच्या 40 टक्के रक्कम दंड ठोठावण्यात येते.

टीम इंडियाला मिळाला रोहित शर्माचा वारसदार, 24 वर्षांचा खेळाडू संपवणार सर्वांचं टेन्शन

विजयानंतरही 11 पॉईंट्स मिळाले

सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) जिंकल्यानंतरही टीम इंडियाला 11 पॉईंट्स मिळाले. त्यामुळे टीम इंडियाचे चार विजय, एक पराभव आणि दोन ड्रॉच्या मदतीने 54 पॉईंट्स झाले. परंतु आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे एक पॉईंट्स कमी केल्याने टीम इंडियाचे नुकसान झाले. त्यामुळे टीम इंडियाचे पॉईंट्स 53 झाले, तसेच विजयाची टक्केवारीही 64.28 टक्क्यावरून 63.09 झाली.

फायनलमध्ये चुका भारी पडतील

आयसीसीच्या नियमानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मॅच जिंकल्यास विजयी संघाला 12 पॉईंट्स मिळतात. तर मॅच ड्रॉ झाल्यास दोन्ही टीमला प्रत्येकी 4 पॉईंट्स मिळतात, तर पराभव होणाऱ्या टीमला पॉईंट्स मिळत नाहीत. मॅच टाय झाल्यास दोन्ही टीमला प्रत्येकी 6 पॉईंट्स मिळतात. या पॉईंट्सच्या आधारावर टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या दोन टीम फायनलमध्ये पोहोचतात. परंतु टीम इंडियाने आतापर्यंत तीन पॉईंट्स स्लो ओव्हर रेटमुळे (India Slow Over-Rate) गमावले आहेत. त्यामुळे या चुका सलग दुसऱ्यांदा फायनल गाठण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: