फोटो – ट्विटर, बीसीसीआय

जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) दुसरी टेस्ट रंगणार आहे. सेंच्युरियनमध्ये यजमान संघाचा मोठ्या फरकाने पराभव केल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला मात देत सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल. या टेस्टसाठी टीम इंडिया Playing 11 (Umesh Yadav Replace Shardul) मध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

विराट भूमिका बदलणार

सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियानं सफाईदार विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयानंतर 3 दिवसांनीच दुसरी टेस्ट सुरू होत आहे. सामान्य परिस्थितीमध्ये कोणताही कॅप्टन आपली प्लेईंग 11 कायम ठेवण्याला पसंती देईल. पण विराट कोहली त्याला अपवाद ठरू शकतो. याला जोहान्सबर्गचे पिच (Johannesburg Test 2022) कारणीभूत आहे.

बुमराह व्हाईस कॅप्टन का झाला? निवड समितीकडून एका दगडात दोघांची शिकार

दुसरी टेस्ट ज्या मैदानावर होणार आहे त्या जोहान्सबर्ग मैदानावरील पिच फास्ट बॉलर्ससाठी पोषक आहे. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने याच मैदानावर यजमान संघाचा 63 रनने पराभव केला होता. या मॅचमध्ये टीम इंडियाने पाच फॉस्ट बॉलर्स खेळवले होते.

विदर्भ एक्सप्रेस’ धावणार

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्यावर सध्या टांगती तलवार आहे. शार्दुलच्या जागी फास्ट बॉलर आणि ‘विदर्भ एक्सप्रेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या उमेश यादवचा (Umesh Yadav Replace Shardul) टीममध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. उमेशच्या नावावर 51 टेस्टमध्ये दीडशेहून जास्त विकेट्स आहेत.

असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

सेंच्युरियनमध्ये झालेली पहिली टेस्ट शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) खेळला होता. परंतु बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याने 14 रन केल्या आणि बॉलिंगमध्येही फक्त 2 विकेट्स घेऊ शकला. स्वैर बॉलिंग आणि जोहान्सबर्गची पिच यामुळे त्याला हटवून उमेश यादवची Playing 11 मध्ये (Umesh Yadav Replace Shardul) निवड होऊ शकते.

अर्थात एका टेस्टच्या कामगिरीवरून शार्दुलला वगळण्याबाबत विराटला गांभीर्याने विचार करावा लागेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये त्याने ज्या प्रकारे ऑलराउंड खेळ केला ते पाहता त्याला एक संधी दिली जावू शकते. तसेच आघाडीचे सहाही बॅटर बॉलिंग करत नाहीत आणि विराट कोहलीला (Virat Kohli) देखील पेसर ऑलराउंडर टीममध्ये हवा असतो.

बॅटर की पेसरवर डाव खेळणार?

शार्दुलप्रमाणे आर. अश्विन याचाही पत्ता कट होऊ शकतो. त्याच्या जागी हनुमा विहारीला (Hanuma Vihari) टीममध्ये घेऊन बॅटिंग अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न विराटचा असेल. ‘दक्षिण आफ्रिका अ’ टीम विरुद्ध नुकत्याच खेळलेल्या सीरिजमध्ये त्याने तीन हाफ सेंच्युरीच्या मदतीने 227 रन केल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियात टेस्ट वाचवण्यासाठी त्याने दुखापत झाल्यानंतरही किल्ला लढवली होता.

अश्विनला पर्याय म्हणून उमेश यादव किंवा इशांत शर्माचेही टीममध्ये (Umesh Yadav Replace Shardul) येऊ शकतात. अशावेळी टीम इंडिया 2018 प्रमाणे चार फास्ट बॉलर आणि एक पेसर ऑलराउंडर घेऊन मैदानात उतरेल.

संभाव्य प्लेइंग 11 –

केएल राहुल (व्हाईस कॅप्टन), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकिपर), आर. अश्विन (हनुमा विहारी/इशांत शर्मा), शार्दुल ठाकूर किंवा उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: