फोटो – ट्विटर, जसप्रीत बुमराह

रोहित शर्मा दुखापतीतून सावरला नसल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी वन डे (India vs South Africa) सीरिजसाठी केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन, तर फास्ट बॉ़लर जसप्रीत बुमराहला व्हाईस कॅप्टन करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. जसप्रीत बुमराहला व्हाईस कॅप्टन (Jasprit Bumrah Vice Captain) करण्याचा निर्णय अचंबित करणारा आहे. परंतु क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भरीव योगदान देणाऱ्या बुमराहसाठी हा एक अवॉर्डच म्हणावा लागेल.

फास्ट बॉलरवर विश्वास

चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याच्या निर्णयाने प्रेरित होऊन फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहवर विश्वास दाखवला आहे. टीम पेन ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनपदावरून पायउतार झाल्यानंत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला कॅप्टन केले. कमिन्सच्याच नेतृत्वाखाली अॅशस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

‘धोनीला BCCI ने नेहमी पाठीशी घातले,’ हरभजन सिंगचा गौप्यस्फोट

2016 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बुमराह टीम इंडियाचा सध्याच्या घडीला सर्वोत्तम फास्ट बॉलर आहे. 25 टेस्ट, 67 वन डे आणि 55 T20 मॅचचा अनुभव बुमराहकडे आहे. भारतासह जगभरातील पिचवर त्याने आपल्या बॉलिंगची ताकद दाखवली आहे. त्यामुळेच निवड समितीने अन्य खेळाडूंना डावलून बुमराहच्या नावावर शिक्कोमोर्तब केल्याचे दिसते.

पंत-अय्यरला इशारा

बुमराहला व्हाईस कॅप्टन (Jasprit Bumrah Vice Captain) करून निवड समितीने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंतला (Rishabh Pant) सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा इशारा दिल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. तसेच हे फक्त एका सीरिजपुरते असून श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होम ग्राउंडवर होणाऱ्या सीरिजमध्ये रोहित शर्मा कमबॅक करेन हे नक्की आहे. तेव्हा केएल राहुल व्हाईस कॅप्टन असेल, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी (BCCI) सांगितले.

आयपीएलमध्ये अय्यर आणि पंतने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे नेतृत्व केले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीची टीम 2020 च्या आयपीएल सीझनमध्ये (IPL 2020) फायनलपर्यंत पोहोचली होती, तर 2021 च्या सीझनमध्ये (IPL 2021) पंतने दिल्लीच्या टीमला सेमीफायनलपर्यंत पोहोचवले होते.

माजी अध्यक्षांचा पाठिंबा

निवड समितीने जस्सीला क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षिस दिले आहे. त्यामुळे पंत आणि अय्यरच्याही आधी त्याच्या नावाचा विचार करण्यात आला, असे निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) म्हणाले. तसेच त्याला एका सीरिजपुरता व्हाईस कॅप्टन करण्यात आले असून त्यामुळे हा निर्णय घेणे निवड समितीसाठी सोपे होते, असेही ते म्हणाले.

अश्विननं सांगितली ‘ती’ त्रासदायक आठवण, पडत्या काळातील अनुभव वाचून व्हाल सुन्न

बुमराह एक समजूतदार प्लेअर आहे. बुमराहला व्हाईस कॅप्टन (Jasprit Bumrah Vice Captain) करण्याच्या निर्णयावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना एमके प्रसाद यांनी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या फास्ट बॉलरला कॅप्टन करू शकत नाही का? असा प्रतिप्रश्न केला आहे. तसेच जोपर्यंत तुम्ही त्याला नेतृत्वाची संधी देत नाही तोपर्यंत त्याच्याकडून काय अपेक्षा कराव्यात हे तुम्हालाही कळणार नाही, असेही ते म्हणाले. यासह आयपीएलचे नेतृत्व राष्ट्रीय टीमचे नेतृत्व करण्यापेक्षा वेगळे असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.

श्रेयस अय्यरने शस्त्रक्रियेनंतर टीम इंडियात कमबॅक केलेय. तर रिषभ पंतला मर्यादित षटकांच्या क्रिकेटला अधिक गांभीर्याने घेऊन सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची आवश्यकता आहे, असेही प्रसाद म्हणाले. तसेच 2023 पर्यंत रोहित शर्मा कॅप्टन (Rohit Sharma) आणि राहुल व्हाईस कॅप्टन असेल असे मतही प्रसाद यांनी व्यक्त केले.

टीम इंडियाला मिळाला रोहित शर्माचा वारसदार, 24 वर्षांचा खेळाडू संपवणार सर्वांचं टेन्शन

माजी प्लेअर आमनेसामने

दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्लेअर सबा करीम (Saba Karim) यांना बुमराहला व्हाईस कॅप्टन (Jasprit Bumrah Vice Captain) करण्याचा निर्णय पटलेला नाही. बुमराहआधी श्रेयस अय्यर किंवा रिषभ पंतकडे व्हाईस कॅप्टनपद द्यायला हवे होते, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे रितेंदर सिंग सोढी (Reetinder Singh Sodhi) यांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. फास्ट बॉलर कॅप्टन बनू शकत नाही हे मिथक असल्याचे ते म्हणाले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: