
आर. अश्विननं (R. Ashwin) एका मुलाखतीमध्ये दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) ‘माझा आयडॉल’ असं वर्णन केलं आहे. अश्विन आणि कार्तिक हे दोघंही चेन्नईचे. कार्तिक अश्विनला 1 वर्ष सिनिअर. ‘आम्ही दिनेश कार्तिकचा खेळ पाहण्यास जात असू. आमच्यासाठी तो सुरूवातीपासून मोठा खेळाडू होता. तो भविष्यात टीम इंडियाचा सुपरस्टार होणार असल्याची आम्हाला अगदी सुरूवातीपासून खात्री होती.’ असं अश्विननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 -03 च्या सिझनमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कार्तिक आजही टीम इंडियाचा ‘पोस्टर बॉय’ होण्याच्या वेटींगमध्ये उभा आहे. आता वयाच्या 37 व्या वर्षी त्यानं पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक केलं (Dinesh Karthik Returns) आहे.
नेक्स्ट बिग स्टार
ग्रेग चॅपेल कोच आणि राहुल द्रविड कॅप्टन अशी जोडी टीम इंडियाची जबाबदारी सांभाळत होती त्यावेळी वयाच्या 19 व्या वर्षी कार्तिक टीम इंडियात आला. त्यानं अगदी सुरूवातीपासून त्याच्या खेळानं चॅपेल-द्रविडसह सर्वांना प्रभावित केलं. कार्तिक येण्यापूर्वी भारतीय टीम विकेट किपरसाठी चाचपडत होती. 2003 मधील वर्ल्ड कपमध्ये तर द्रविडनंही विकेट किपिंग केली.
दिनेश कार्तिक आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनी या दोघांनी ही परिस्थिती बदलली. हे दोघंही विकेट किपरसह फक्त बॅटर म्हणून देखील अंतिम 11 मध्ये खेळण्यासाठी योग्य होते. कार्तिकचा खेळ ऑन-ऑफ सुरू होता. तर धोनीनं त्याच्या पॉवर गेमनं वन-डे क्रिकेटमध्ये मोठी खेळी करत टीममधील जागा नक्की केली.
T20 क्रिकेटचं आगमन
2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 हा प्रकार प्रचलित होऊ लागला. टीम इंडियानं त्याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिली आंतरराष्ट्रीय T20 खेळली. क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटनं खेळाची व्याख्या बदलली. सुरूवातीला विकेट सांभाळून खेळण्याची पद्धत या प्रकारात उपयोगी नव्हती.
या फॉर्मेटमध्ये दर ओव्हरमध्ये नवी परिस्थिती आणि नवं आव्हान आहे. टीम इंडियानं पहिल्या T20 इंटरनॅशनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या मॅचमध्ये कार्तिक ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. त्या मॅचमध्ये पाचव्या क्रमांकावर आलेल्या कार्तिकचा स्मार्ट खेळ (Dinesh Karthik Returns) पाहून तो याच प्रकारासाठी बनला आहे, ही अनेकांना खात्री होती.
In-Out, In- Out! दिनेश कार्तिकच्या करिअरची गोलाकार गोष्ट
ऑन – ऑफ खेळ
दिनेश कार्तिकनं 2004 साली टीम इंडियात पदार्पण केलं. तो टीममध्ये आला तेव्हा द्रविड कॅप्टन होता. आज तो कोच आहे. त्याच्या टीममधील सर्व सहकारी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हाच बाजूला झाले. कार्तिक आजही उभा आहे.
गेल्या 18 वर्षात इंग्लंडमधील टेस्टमध्ये ओपनिंग करण्यापासून ते T20 क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर येऊन हाणामारी करण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या कार्तिकनं पार पाडल्या आहेत. त्यानंतरही 26 टेस्ट, 94 वन-डे आणि 32 T20 इंटरनॅशनल ही संख्या त्याच्या गुणवत्तेला न्याय देणारी नाही.
गेल्या 18 वर्षातील प्रत्येक निवड समितीनं त्याची निवड (Dinesh Karthik Returns) केली त्याचबरोबर त्याला वगळलं देखील आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेण्यात आलेलं अपयश हे याचं मुख्य कारण आहे. कार्तिकला दुर्दैवानं त्याच्याक़डून असलेल्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. 2006 साली पहिली T20 गाजवणारा कार्तिक वर्षभरानी टीम इंडियानं पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला त्या टीममधील प्लेईंग 11 मध्ये नव्हता. 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याला त्याचा टीममध्ये येण्यापूर्वीचा फॉर्म स्पर्धेत दाखवण्यात अपयश आले होते.
आता पुन्हा संधी
निदाहास ट्रॉफीच्या फायनलमधील अफाट इनिंगनंतर कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आहे. या आयपीएल सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूनं (RCB) मिळवलेल्या यशात त्याचा सर्वात मोठा वाटा आहे. तो फिनिशर्सचं काम चोख पार पाडतोय. T20 क्रिकेटवर वाढलेल्या आणि वेगवेगळ्या डेटा पुरवठ्यानं संपन्न असलेल्या जगभरातील बॉलर्सना त्याची क्लिन हिटींग भारी पडली आहे.
कार्तिकची ही क्लिन हिटींग टीम इंडियासाठी अतिशय आवश्यक आहे. त्याचा फॉर्म कायम राहिला तर तो आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. कार्तिक टीम इंडियात आला तेव्हा इशान किशन 6 वर्षांचा होता. आज इशान आणि कार्तिकची दुसऱ्या विकेट किपरच्या जागेसाठी स्पर्धा आहे. त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या आणि त्याच्यासारखाचं टॅलेंट असलेल्या संजू सॅमसनची जागा त्यानं मिळवलीय.
दिनेश कार्तिकनं उलट फिरवलं कालचक्र, सनसनाटी विजयानंतर सांगितले यशाचे रहस्य!
गेल्या 2 दशकांपासून टीम इंडियाचा पोस्टर बॉय होण्यासाठी कार्तिक वेटींगवर आहे. तो पोस्टर बॉय होण्यासाठी त्याला येत्या 5 महिन्यांमध्ये मोठी संधी (Dinesh Karthik Returns) आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.