फोटो – ट्विटर, क्रिकेट आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेची टीम होम ग्राउंडवर टीम इंडियाविरुद्ध तीन टेस्ट मॅचची सीरिज (India vs South Africa) खेळत आहे. सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये यजमान संघाला 113 रनने पराभव स्वीकारावा लागला. सेंच्युरियन टेस्टच्या पराभवास 24 तास होत नाही तोच दक्षिण आफ्रिकेच्या टीमला आणखी एक धक्का बसला. विकेटकिपर बॅटर क्विंटन डीकॉकने तडकाफडकी निर्णय (Dean Elgar Boucher React) घेत टेस्ट क्रिकेट यापुढे न खेळण्याचा निर्णय घेतला.

कौटुंबिक कारण

क्विंटन डीकॉक (Quinton de Kock) याने सेंच्युरियन टेस्ट संपल्यानंतर ‘आपण यापुढे टेस्ट क्रिकेट खेळणार’ हा निर्णय जाहीर केला. कौटुंबिक कारणांचा हवाला देत डिकॉकने टेस्ट क्रिकेटला रामराम केला. डिकॉकची पत्नी साशा लवकरच बाळाला जन्म देणार आहे. वाढत्या कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे डिकॉकने म्हटले होते.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील दुष्टचक्र कधी सुटणार?

29 वर्षीय डीकॉकने 54 टेस्ट खेळल्या आहेत. यात त्याने 38 च्या सरासरीने 3330 रन केल्या. 6 सेच्युरींची नोंद त्याच्या नावापुढे आहे. डीकॉकसारखा चपळ आणि आक्रमक बॅटरने अचानक निवृत्ती घेतल्याने क्रिकेट फॅन्ससह आफ्रिकन क्रिकेट टीमचा कॅप्टन डिन एल्गरलाही (Dean Elgar Boucher React) शॉक बसला आहे. त्याच्या या निर्णयावर डिन एल्गर आणि कोच मार्क बाउचर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

शॉक बसला

डिकॉकने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने मला शॉक बसल्याची प्रांजळ कबुली डिन एल्गरने दिली आहे. डिकॉक निवृत्ती घेणार आहे याबाबत मला काहीही माहिती नव्हते. परंतु त्या संध्याकाळी डिकॉकने या निर्णयामागील कारणे आम्हाला सांगितली. मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो, असेही एल्गर म्हणाला.

विराटनं फक्त सचिनच्या ‘त्या’ इनिंगपासून शिकावं, बाकी सर्व आपोआप होईल

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना निवृत्त होताना (Dean Elgar Boucher React) पाहण्याचे भाग्य मला लाभले. पण क्रिकेटचा खेळ सुरुच राहतो, कोणासाठी थांबत नाही, हे आपल्या लक्षात आल्याचे एल्गर म्हणाला. एल्गरने 2012 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला. तेव्हापासून ग्रॅमी स्मिथ, हाशिम आमला, फाफ डू प्लेसिस, जेपी ड्यूमिनी, डेल स्टेन, मार्क बाऊचर, व्हर्नेन फिलँडर यासारखे प्रमुख क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली.

निर्णयाचा आदर

दक्षिण आफ्रिकेचा हेड कोच मार्क बाऊचर (Head Coach Mark Boucher) यानेही डिकॉकच्या तत्काळ निवृत्तीमुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. या वयात कोणी निवृत्ती घेईल याची तुम्ही अपेक्षा करू शकत नाहीत. मात्र आफ्रिकन टीम आणि सपोर्ट स्टाफ त्याच्या निर्णयाचा आदर करत असल्याचेही ते म्हणाले.

क्विटन डिकॉकच्या निवृत्ती (Dean Elgar Boucher React) दु:खद असली तरी आम्हाला पुढे जावेच लागेल. कारण आम्ही सध्या टेस्ट सीरिजच्या मध्यावर असून त्याच्या जागी येणाऱ्या नव्या प्लेअरवर आम्हाला लक्ष केंद्रीत करावे लागेल. डिकॉकने ज्या प्रकारे योगदान दिले तसेच नवा प्लेअरही देईल अशी आशा असल्याचेही मार्क बाऊचर म्हणाले. दरम्यान, दुसऱ्या टेस्टमध्ये डिकॉकच्या जागी काइल व्हेरेइन (Kyle Verreynne) खेळले असेही त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: