फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली साठी (Virat Kohli) एक खेळाडू म्हणून गेली दोन वर्ष निराशानजक गेली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये विराटने एकही सेंच्युरी झळकावली नाही. त्याने शेवटची सेंच्युरी 23 नोव्हेंबर 2019 ला बांगलादेशविरुद्ध (Virat Last Century) ठोकली होती. या सेंच्युरीला आता तब्बल 769 दिवस उलटून गेली आहेत. या दरम्यान त्याने टेस्ट, वन डे आणि टी-20 मॅचही खेळल्या. परंतु यातील एकाही फॉर्मेटमध्ये त्याला सेंच्युरी झळकावता आली नाही. खेळाडू म्हणून भलेही त्याच्यासाठी ही दोन वर्ष चांगली गेली नसली तरी कॅप्टन म्हणून त्याने बऱ्याच गोष्टी मिळवल्या आहेत. नव्या वर्षातही धमाकेदार रेकॉर्ड्स (Virat Kohli Records 2022) विराटची वाट पाहात आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) फायनलपर्यंत मजल मारली. मात्र इंग्लंडच्या लॉर्डस मैदानावर झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडने (WTC IND vs NZ) पराभूत केले. असे असले तरी कोहलीने कॅप्टन्सीमध्ये जगभरात छाप उमटवली आहे. या जोरावरच तो टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार झाला आहे. आता त्याची वाटचाल जगातील सर्वश्रेष्ठ कॅप्टन बनण्याकडे असून 2022 हे नवे वर्ष त्याच्यासाठी त्यामुळेच खास (Virat Kohli Records 2022) असणार आहे.

विराट कोहलीनं कुणाचंही ऐकलं नाही, निवड समिती अध्यक्षांचा खळबळजनक दावा

प्रतीक्षा संपणार

विराट कोहली याला 2021 मध्येही सेंच्युरीचा दुष्काळ संपवता आला नाही. गेल्या वर्षी विराटने 11 टेस्टमध्ये 28.21 च्या सरासरीने फक्त 536 धावा केल्या. या दरम्यान त्याने वेळा हाफ सेंच्युरी केली, मात्र सेंच्युरी झळकावू शकला नाही. त्याची टेस्टमधील सरासरी 50.34 आहे, या सरासरीच्या आसपासही त्याला पोहोचता आले नाही. आता 2022 मध्ये विराट ही प्रतीक्षा नक्की संपवेल अशी फॅन्सना आशा आहे.

टेस्टमध्ये बेस्ट

टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 67 टेस्ट खेळल्या आहेत. यात 20 जिंकल्या असून 16 मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. तर 11 मॅचचा निकाल लागला नाही. अझहरुद्दीन, गांगुली आणि धोनीलाही वरचढ ठरलेल्या विराट कोहलीच्या निशाण्यावर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याचा रेकॉर्ड असणार आहे.

खेळाडूमॅचविजयपराभव
विराट कोहली674016
महेंद्रसिंग धोनी602718
सौरव गांगुली492113
मोहम्मद अझहरुद्दीन471414

स्टीव्ह वॉच्या कॅप्टन्सीमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम 57 पैकी 41 टेस्ट मॅच जिंकली, तर 9 मॅचमध्ये पराभूत झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) चालू सीरिजमध्ये विराटला स्टीव्ह वॉ याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश दिल्यास स्टीव वॉ याचा रेकॉर्ड तुटेल. असे झाल्यास टीम इंडिया आणि विराटसाठी नववर्षाची सुरुवात (Virat Kohli Records 2022) धमाकेदार होईल.

पॉन्टिंग आणि स्मिथही निशाण्यावर

कोहलीला स्टीव वॉ याला मागे सोडण्याची संधी मिळणार आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांना मागे सोडण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागेल. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाची टीम 77 पैकी 48 मॅच जिंकल्या आहेत, तर स्मिथच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेची टीम 109 मॅचमध्ये 53 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

2022 मध्ये झळकली पहिली सेंच्युरी, चौथीच टेस्ट खेळणाऱ्या बॅटरची कमाल

पॉन्टिंगला मागे टाकण्यासाठी 9 आणि स्मिथला मागे टाकण्यासाठी 14 मॅच जिंकाव्या लागतील. परंतु आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार 2022 मध्ये टीम इंडियाला फक्त 5 टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. यातील दोन मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa), दोन श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) आणि एक इंग्लंडविरुद्ध (India vs England) खेळायची आहे. त्यामुळे 2022 मध्ये विराटला (Virat Kohli Records 2022) पॉन्टिंग आणि स्मिथचा रेकॉर्ड मोडण्याची संधी नाही.

सर्वाधिक मॅच जिंकणारे कॅप्टन

ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – 109 मॅचमध्ये 53 विजय आणि 29 पराभव
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 77 मॅचमध्ये 48 विजय आणि 16 पराभव
स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) – 57 मॅचमध्ये 41 विजय आणि 9 पराभव
विराट कोहली (भारत) – 67 मॅचमध्ये 40 विजय आणि 16 पराभव

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: