फोटो – ट्विटर

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी आता प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. श्रीलंकेविरूद्ध सुरू झालेल्या मोहाली टेस्टमध्ये (India vs Sri Lanka, Mohali Test) भारतीय टीमनं सकारात्मक खेळ करत 6 आऊट 357 अशी भक्कम सुरूवात केली आहे. ऋषभ पंतचे दमदार 96 रन (Rishabh Pant Special 96) हे पहिल्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले.

श्रीलंकेचा डाव उधळला

श्रीलंकेनं टॉस गमावल्यानंतर भारतीय टीमवर वर्चस्व गाजवलं नसलं तरी त्यांना वरचढही होऊ दिले नव्हते. चांगली सुरूवात केलेल्या रोहित आणि मयांकला त्यांनी आऊट केले. विराट कोहलीला (Virat Kohli) 100 व्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 45 रनवर रोखले. हनुमा विहारीला (Hanuma Vihari) हाफ सेंच्युरीनंतर लगेच आऊट केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरलाही आऊट करत निम्मी भारतीय टीम परत पाठवली.

श्रेयस आऊट झाल्यानंतर टीम इंडियाला पहिल्या दिवसअखेर 300 रनच्या आत रोखण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न होता. ऋषभ पंतनं (Rishbah Pant) तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पंतला T20 सीरिजमध्ये (India vs Sri Lanka T20 Series) ब्रेक मिळाला होता. या ब्रेकनंतर फ्रेश होऊन परतल्यानंतर पंतनं पहिल्या दिवशी (Rishabh Pant Special 96) श्रीलंकेचा डाव उधळला.

Virat Kohli 100th Test: विराट कोहलीला ‘किंग’ बनवणाऱ्या 5 बेस्ट इनिंग   

शेवटच्या सेशनमध्ये धुलाई

पंतनं त्याची हाफ सेंच्युरी 73 बॉलमध्ये पूर्ण केली. त्यानंतर त्याने पुढील 24 बॉलमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 46 रन काढले. विराट आणि श्रेयसला आऊट करणारा श्रीलंकन स्पिनर लसिथ एंबेलडुनियाला त्याने विशेष लक्ष्य केले. त्याच्या एका ओव्हरमध्ये त्यानं 22 रन काढले.

ऋषभनं 97 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 96 रन काढले. पाचव्या टेस्ट सेंच्युरीच्या दिशेनं सुरू असलेली त्याची वाटचाल श्रीलंकन फास्ट बॉलर सुरंगा लकमलनं ब्रेक केली. नव्या बॉलवर त्याला खेळण्याचा पंतचा प्रयत्न फसला आणि तो आऊट झाला. ऋषभ पंत, टीम इंडियाची ड्रेसिंग रूम आणि सर्व फॅन्ससाठी तो दिवसातील त्रासदायक प्रसंग होता.

पंत त्याच्या टेस्ट करिअरमध्ये पाचव्यांदा 90 ते 100 रनच्या दरम्यान आऊट झाला आहे. तो यापूर्वी वेस्ट इंडिज विरूद्ध 2018 साली दोन वेळा 92 रनवर आऊट झाला होता. ऐतिहासिक सिडनी टेस्टमध्ये त्याची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. तर त्यानंतर मागच्या वर्षी इंग्लंड विरूद्ध चेन्नईत झालेल्या टेस्टमध्ये तो 91 रन काढून आऊट झाला होता.

टीम इंडियाची भक्कम स्थिती

ऋषभ पंतची सेंच्युरी हुकली असली तरी त्याच्या फटकेबाजीनं (Rishabh Pant Special 96)  भारतीय टीमनं साधारण दीड दिवसाचा स्कोअर एका दिवसामध्ये केला आहे. टीम इंडियाचे टॉप 4 बॅटर चांगल्या सुरूवातीनंतर आऊट झाले. श्रेयसलाही मोठा स्कोअर करण्यात अपयश आले.

ऋषभ पंतनं बॅटींगमध्ये मिळालेल्या प्रमोशनचा फायदा घेतला. त्यानं रवींद्र जडेजासोबत दिवसभरातील सर्वात मोठी पार्टनरशिप केली. जडेजानंही पहिल्या दिवसाच्या अखेरीस नाबाद 45 रन केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

 

error: