फोटो – ट्विटर, बीसीसीआय

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये (Pink Ball Test) दुसऱ्याच दिवशी टीम इंडियानं भक्कम वर्चस्व मिळवलं आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 143 रनची आघाडी घेत हे वर्चस्व मिळवलं. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) भेदक बॉलिंगमुळे टीम इंडियाला वर्चस्वाची संधी मिळाली. बुमराहनं बेंगळुरू टेस्टमध्ये 5 विकेट्स घेत श्रीलंकेची कंबर तोडली. त्याचबरोबर महान ऑल राऊंडर कपिल देव यांची बरोबरी (Bumrah Equals Kapil Dev) केली.

पहिल्यांदाच कमाल

बुमराहनं बेंगलुरू टेस्टमधील श्रीलंकेच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त 24 रन 5 विकेट्स घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची बुमराहची ही आठवी वेळ आहे. बुमराहनं इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरूद्ध प्रत्येकी 2 तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरूद्ध प्रत्येकी 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. फक्त न्यूझीलंड विरूद्ध त्याने आजवर 5 विकेट्स घेतलेल्या नाहीत.

बुमराहनं आठवेळा इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. पण भारतामध्ये ही कामगिरी करण्याची त्याची पहिलीच वेळ आहे. बुमराहाची भारतामधील ही चौथीच टेस्ट मॅच आहे. 2018 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहनं त्याच्या आजवरच्या 29 टेस्टच्या कारकिर्दीमध्ये फक्त 4 टेस्ट भारतामध्ये खेळल्या आहेत.

IND vs SL: जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा पुढील कॅप्टन, रोहित शर्मानं दिले स्पष्ट संकेत!

कपिल यांची बरोबरी

बुमराहनं 29 टेस्टमध्ये 8 वेळा 5 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. भारतीय फास्ट बॉलर्समध्ये  इतक्या टेस्टमध्ये फक्त कपिल देव यांनी इतक्या  टेस्टमध्ये ही कामगिरी केली (Bumrah Equals Kapil Dev) होती. पिंक बॉल टेस्टमधील इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणारा बुमराह हा चौथा भारतीय बॉलर आहे. यापूर्वी अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी ही कामगिरी केलीय.  

बुमराहच्या नावावर आता 29 टेस्टमध्ये 120 विकेट्स असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या  भारतीय बॉलरच्या यादीमध्ये तो 18 व्या क्रमांकावर आहे.

श्रीलंकेची घसरण

भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकन टीमची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. या टीमनं सुरूवातीला T20 सीरिजमधील सर्व तीन मॅच गमावल्या. त्यानंतर त्यांनी मोहाली टेस्टमध्ये 3 दिवसांमध्ये शरणागती पत्कारली. आता बेंगलुरू टेस्टमध्येही श्रीलंकेची त्याच दिशेनं वाटचाल सुरू आहे.

दुसऱ्या दिवशी 6 आऊट 86 या स्कोअरवरून श्रीलंकेनं पुढे खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर बुमराह-अश्विन जोडीनं (Bumrah Equals Kapil Dev) फक्त 27 मिनिटांमध्ये श्रीलंकेच्या उर्वरित 4 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेची पहिली इनिंग 109 रनवर संपुष्टात आणली. श्रीलंकेचा या सीरिजमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: