सौजन्य- ट्विटर

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या दरम्यान बेंगलुरूमच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर डे-नाईट टेस्ट (Day Night Test) झाली. फक्त 3 दिवस झालेल्या या टेस्टमध्ये भारताने श्रीलंकेचा 238 रननं पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं ही सीरिज 2-0 अशी जिंकली. या सीरिजमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवले. लंकेला 4 इनिंगमध्ये फक्त एकदा 200 रनचा टप्पा ओलांडता आला. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) बेंगळुरू टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेनला मागे (Ashwin overtakes Steyn) टाकले. त्याचबरोबर एक खास सेंच्युरी देखील पूर्ण केली.

अश्विनची सेंच्युरी

बेंगळुरू टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला सेंच्युरी करता आली नाही. पण श्रीलंकेच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं एक खास सेंच्युरी पूर्ण केली. अश्विननं रन्सची नाही तर विकेट्सची सेंच्युरी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 100 विकेट्स घेणारा ( Ashwin completed 100 wickets in World Test Championship) तो पहिला बॉलर ठरला. विश्व फर्नांडोची विकेट घेत त्याने ही कामगिरी केली. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) 93 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IND vs SL: टीम इंडियानं रचला 28 वर्षांनी इतिहास, 3 दिवसांमध्ये पाडला श्रीलंकेचा फडशा

डेल स्टेनला केलं ओव्हरटेक

टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सातत्याने सर्वोत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या आर अश्विनने दोन टेस्टच्या सिरीजमध्ये 12 विकेट्स घेतल्या. या सिरीजमध्ये त्याने कपिल देव, रंगना हेराथ रिचर्ड हेडली या मातब्बर बॉलर्सना मागे टाकले. बेंगलुरू टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी एक दिग्गज फास्ट बॉलर डेल स्टेनला आर अश्विनने ओव्हरटेक (Ashwin overtakes Steyn) केलं आहे.

अश्विननं धनंजय डि सिल्वाची विकेट घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने याच टेस्ट मॅचमध्ये महान ऑल राऊंडर कपिल देव (Kapil Dev) यांचा 434 विकेट्सचा रेकॉर्ड मोडत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सचा यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

अश्विननं आजवर 86 टेस्टमध्ये 442 विकेट्स घेतल्या आहेत. एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं तब्बल 30 वेळा केली आहे. तर एका टेस्टमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया 7 वेळा (Ashwin overtakes Steyn) केली आहे. टीम इंडियाच्या या अनुभवी खेळाडूनं टेस्ट क्रिकेटमध्ये 5 सेंच्युरीही झळकावल्या असून उपयुक्त ऑल राऊंडर असल्याचं सिद्ध केलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: