फोटो – PTI

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये श्रीलंकेत गेलेली टीम इंडिया (India Tour Of Sri Lanka) कशी कामगिरी करणार याकडं सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दौऱ्यात कॅप्टन शिखर धवनसह (Shikhar Dhawan) पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे खेळाडू कशी कामगिरी करणार याकडं सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू मनिष पांडे (Manish Pandey) सध्या क्रिकेट फॅन्सच्या रडारवर नाही. टीम इंडियाच्या सातत्यानं आत-बाहेर करणाऱ्या मनिषसाठी श्रीलंका दौरा हा लिमिटेड ओव्हरच्या टीममध्ये कमबॅक करण्याची शेवटची संधी (Manish Pandey Last Chance) ठरू शकतो.

विराटचा जुना सहकारी

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं 2008 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप टीममध्ये मनिष हा विराटचा सहकारी होता. त्या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये तो मिडल ऑर्डरमध्ये खेळला. मनिष त्यानंतर विराट सोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचाही सदस्य होता. आयपीएल स्पर्धेत सेंच्युरी झळकावणारा पहिला भारतीय हा रेकॉर्ड देखील मनिषच्याच नावावर आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सिझनमधील (IPL 2009) शेवटच्या लीग मॅचमध्ये त्याने डेक्कन चार्जर्स विरुद्ध 73 बॉलमध्ये नाबाद 114 रनची खेळी केली होती.   

159 रन करुनही विराट कोहलीच्या टीमनं जिंकला होता वर्ल्ड कप, VIDEO

वन-डे क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण

मनिष पांडेचे T20 वर्ल्ड कपमधील सहकारी विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना टीम इंडियाकडून लवकर संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी आणि आयपीएल गाजवल्यानंतर मनिषला अखेर 2015 साली झिम्बाब्वे दौऱ्यावर टीममध्ये संधी मिळाली.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली (Ajinkya Rahane) झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या त्या टीममध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्या दौऱ्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये मनिषने पदार्पण केले. त्या मॅचमध्ये पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या मनिषनं 86 बॉलमध्ये 71 रनची दमदार खेळी करत टीमच्या विजयात हातभार लावला.

ऑस्ट्रेलियात सेंच्युरी

मनिष पांडेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील आजवरचा सर्वोच्च क्षण त्याने पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांनी आला. सिडनीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतील शेवटच्या वन-डेमध्ये 331 रनचा पाठलाग करताना मनिषनं नाबाद 104 रनची खेळी करत टीम इंडियाचा त्या सीरिजमधील व्हाईट वॉश टाळला. विशेष म्हणजे मनिषची वन-डे क्रिकेटमधील ती तिसरीच इनिंग होती.

न्यूझीलंड विरुद्ध 2016 साली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017 साली झालेल्या सीरिजमध्ये त्याला मिळालेल्या संधीमध्ये फार कमाल करता आली नाही. त्यामुळे तो टीम इंडियाच्या शर्यतीमध्ये मागे पडला, असे मानले जाते. मात्र त्याला फार संधी देखील मिळाली नाही. कॅप्टन कोहलीनं त्याच्या या जुन्या सहकाऱ्याला सातत्याने संधी दिलीच नाही. त्याला कमी वन-डेमध्ये कमी बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यातच 2017 मध्ये चांगल्या फॉर्मात असताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे मनिषला इंग्लंडमध्ये जाण्याची संधी हुकली. या हुकलेल्या संधीचाही त्याच्या करियरवर मोठा परिणाम (Manish Pandey Last Chance) झाला.

क्रिकेटमधील अनेक ‘स्टेशन’ पार करणाऱ्या विनय कुमारच्या ‘दावणगिरी एक्स्प्रेस’ची विश्रांती!

स्लो स्ट्रईक रेटचा दोष

मनिष पांडेच्या टीममध्ये निवड न होण्याचा अडथळा हा त्याचा स्लो स्ट्राईक रेट आहे. मनिषकडं सर्व प्रकारचे फटके मारण्याची क्षमता आहे. तो एकहाती टीमला मॅच जिंकून देऊ शकतो. पण स्लो स्ट्राईक रेट ही मनिषची मोठी समस्या आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट हा 124.89 आहे. जो टीम इंडियाच्या मिडल ऑर्डर बॅट्समनला साजेसा नाही.

मनिषने आजवर 39 आंतरराष्ट्रीय T20 पैकी 25 T20 मध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर बॅटींग केली आहे. या क्रमांकावर त्याचा स्ट्राईक रेट हा अनुक्रमे 122.79 आणि 122.26 आहे. T20 क्रिकेटमधील महत्त्वाच्या क्रमांकावर बॅटींगला येऊनही मोठे फटके मारणे त्याला जमलेलं नाही. त्याच्या या खेळामुळे निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया अडचणीत आली होती. अगदी यावर्षी झालेल्या आयपीएल सिझनच्या पूर्वार्धात (IPL 2021) मनिषला स्लो बॅटींगमुळेच सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं होतं. त्याचबरोबर काही मॅचमध्ये बाहेरही बसावं (Manish Pandey Last Chance) लागलं.

श्रीलंका दौरा शेवटची संधी

टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी किती स्पर्धा आहे, हे मनिषपेक्षा जास्त कुणीही सांगू शकत नाही. त्याने करियरच्या सुरुवातीला मिडल ऑर्डरमधील जागेसाठी युवराज सिंह, सुरेश रैना, केदार जाधव,. दिनेश कार्तिक, अंबाती रायडू यांच्याशी स्पर्धा केली. आता त्याची स्पर्धा ही सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन यांच्याशी आहे. सूर्या, संजू आणि इशान हे तिघेही श्रीलंका दौऱ्यात मनिषसोबत खेळणार आहेत. आता सलग दोन वर्ष दोन वर्ल्ड कप असल्यानं या चौघांच्याही कामगिरीकडं निवड समितीचं लक्ष असेल. त्यामुळे या शर्यतीमध्ये चांगली कामगिरी करुन निवड समितीसमोर भक्कम दावेदारी सादर करण्याची शेवटची संधी (Manish Pandey Last Chance) मनिषला या दौऱ्यात आहे.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: