वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा बॉल टप्प्यात आला की तो बाऊंड्रीच्या बाहेर मारण्यासाठी प्रसिद्ध होता. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात त्याचा ‘बॉल पाहा आणि बॉल मारा’ हाच मंत्र होता. सेहवागनं त्याच्या वन-डे करियरमध्ये 136 सिक्स लगावले आणि 15 सेंच्युरी केल्या. या  दोन्ही आकडेवारीत आज एकाची भर नक्की झाली असती. एका वन-डेमध्ये सेहवागनं 99 रन वर असताना सिक्स मारुनही त्याची त्याला सहा रन मिळाले नाहीत आणि सेंच्युरी झाली नाही. टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या निमित्तीने श्रीलंकेच्या टीमनं केलेल्या कटामुळे सेहवागच्या न झालेल्या सेंच्युरीची आठवण (Sehwag Century denied) पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

कोणती होती मॅच?

श्रीलंकेत 2010 साली झालेल्या तिरंगी सीरिजमधील मॅचमध्ये हा प्रकार घडला होता. त्या मॅचमध्ये श्रीलंकेची टीम पहिल्यांदा बॅटींग करताना 170 रनवरच ऑल आऊट झाली. 171 रनचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातही चांगली झाली नाही.

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) 10  तर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघे जण शून्यावर आऊट झाले. एका बाजूने विकेट्स पडत असतानाही सेहवागच्या मनस्थितीवर काही परिणाम झाला नव्हता. त्याने सुरेश रैना (Suresh Raina) सोबत चौथ्या विकेटसाठी 59 रनची पार्टनरशिप केली. रैना 21 रन काढून आऊट झाला.

रैना आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) सेहवागला स्ट्राईक देण्याचं काम केलं. त्याचा पूर्ण फायदा घेत सेहवागनं फटकेबाजी केली. 11 फोर आणि 2 सिक्स लगावत सेहवाग सेंच्युरीच्या अगदी उंबरठ्यावर म्हणजेच 99 रनवर पोहचला होता.

IND vs SL: विराट कोहलीच्या जुन्या सहकाऱ्यासाठी श्रीलंका सीरिज ही शेवटची संधी

श्रीलंकेचा रडीचा डाव

35 वी ओव्हर सुरू झाली त्यावेळी टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी 5 तर सेहवागला सेंच्युरी करण्यासाठी 1 रनची आवश्यकता होती. श्रीलंकेचा स्पिनर सुरज रणदीव (Suraj Randiv)  ती ओव्हर टाकण्यासाठी आला होता.

रणदीवचा पहिला बॉल सेहवाग आणि विकेट किपर कुमार संगकारा (Kumar Sangakkra) यांना चकवून बाऊंड्रीच्या बाहेर गेली. त्यामुळे भारताला 4 अतिरिक्त रन मिळाले. आता स्कोअर बरोबरीत झाला होता. आता टीम इंडियाला जिंकण्यासाठी आणि सेहवागला सेंच्युरीसाठी एक रन हवा होता. त्यानंतरच्या दोन बॉलवर रन काढण्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

रणदीवच्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सेहवागने पुढे येऊन सिक्स लगावला. त्याने सेंच्युरी झाल्याच्या आनंदामध्ये बॅट वर केली. पण रणदीवनं तो नो बॉल टाकल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे क्रिकेटच्या नियमामुळे सेहवागचा सिक्स आणि सेंच्युरी नाकारण्यात (Sehwag Century denied) आली. एक अतिरिक्त रन टीम इंडियाला मिळाला आणि भारताने ती मॅच 6 विकेट्सनं जिंकली.

सुरज रणदीवनं जाणीवपूर्वक मोठा नो बॉल टाकल्याचं स्पष्ट झालं. वीरेंद्र सेहवागनं त्या मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीलंकेच्या या रडीच्या डावावर नाराजी व्यक्त केली. त्याने श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकाराकडेही याची तक्रार केली. सुरज रणदीवनं हा प्रकार (Sehwag Century denied) श्रीलंका टीममधील सीनियर प्लेयर तिलकरत्ने दिलशान (Tillakaratne Dilshan) याच्या सूचनेवरुन केल्याचं चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकाराबद्दल श्रीलंका क्रिकेट बोर्डाने रणदीवला एका वन-डे साठी निलंबित केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: